top of page

विचार म्हणजे काय?/ What is a Thought?

*विचार म्हणजे काय?*


सद्गुरु म्हणतात,


१. *विचार हा*

*विश्वाचा सम्राट*

*आहे*

२. *जसा विचार*

*तसा जीवनाला*

*आकार*

३. *विचार बदला*

*नशीब बदलेल*


सद्गुरूंच्या या क्रांतिकारी अमृतवाचनांमधून आपल्याला आपल्या जीवनात विचारांना किती महत्त्व आहे हे लक्षात येते. माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, जर आपले जीवन घडविण्यासाठी विचार एवढे महत्त्वाचे आहेत तर आपण विचारांचा विचार केला पाहिजे. विचार कसे केले पाहिजेत हे शिकले पाहिजे.

न्यूरो सायंटिस्ट असं म्हणतात,

Knowing How To Think is More Important Than What To Think.


सद्गुरूंनी या विचारांचा विचार करण्याची प्रक्रिया देखील वेळोवेळी ग्रंथांमधून आणि प्रवचनांच्या माध्यमातून सांगितलेली आहे.

सद्गुरु म्हणतात, प्रथम विचार पाहायला शिका मग विचारांचा विचार करा म्हणजेच विचारांना ओळखा आणि मग विचार बदलण्यासाठी विचारांना वळवायचे कसे ते शिका.


प्रथम आपण विचार म्हणजे काय ते पाहू:


जेव्हा इंद्रियांच्या द्वारे बाह्य किंवा अंतर्गत वातावरणाकडून प्रेरणा/ उत्तेजना मिळते तेव्हा पूर्वानुभवाच्या अथवा पूर्व ज्ञानाच्या आधारे त्याचा अर्थ लावण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्या प्रक्रियेला विचार संबोधले जाते. थोडक्यात इंद्रियांच्याद्वारे कोणतीही घटना घडली की त्या घटनेचा अर्थ लावण्याची प्रक्रिया होऊन निर्णयाप्रत येण्यासाठी आपल्या मेंदूत जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला विचार असे म्हणतात.


आपण विचार करतो म्हणजे काय करतो?

बघा, आपल्या नेहमीच्या जीवनात जेव्हा एखादी व्यक्ती आपणास एखादी गोष्ट विचारते तेव्हा आपण सांगतो की मी विचार करून सांगतो. हे विचार करून सांगतो म्हणजे काय तर, आपण आपल्या स्वतःशी संवाद साधत असतो. आणि असा हा संवाद २४ × ७ सतत चालू असतो. अगदी आत्ताच तुम्ही हा लेख वाचायला घेतला तेव्हा देखील तुमचा तुमच्या स्वतःशी संवाद झाला. तो इतका सूक्ष्म होता की ते तुमच्या लक्षात देखील आले नसेल. कदाचित ते मनातल्या मनात पुटपुटणे असेल. जसे,काय आहे बघू तर खरं, लेखाचा मथळा तर इंटरेस्टिंग वाटतोय. आहे की नाही हे आश्चर्यकारक? आणि हा अंतर संवाद प्रत्येकाचे बाबतीत वेगवेगळा असतो. आणि हे वेगळेपण हेच विचारांचं खरं सौंदर्य आहे. आपण प्रत्येक जण अद्वितीय आहोत.आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचे अंतर संवाद हे देखील वेगवेगळे असतात. आपल्या विचारांच्या मुळाशी हा स्वसंवादच असल्याने आपले जीवन घडविण्यात किंवा बिघडवण्यात देखील याचा फार मोठा वाटा असतो. तुमचे करिअर, तुमचे आर्थिक निर्णय, तुमचे आरोग्य, किंबहुना तुमचे नातेसंबंध हे बहुतांशी तुमच्या स्वसंवादावरती ठरतात. तर असा हा स्वसंवाद सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. पण बहुतांश वेळी हा स्वसंवाद नकारात्मकच असतो. असं होण्याचं कारण काय? तर त्यासाठी आपल्याला विचारांचा उगम कसा झाला ते पाहिले पाहिजे.


उद्याचे लेखात आपण विचारांचा उगम कसा झाला. विचार कसे ओळखायचे व विचारांना बदलायचे कसे ते पाहू.


सद्गुरु नाथ महाराज की जय


- जयंत जोशी

जीवनविद्या मिशन



*What is a Thought?


Sadhguru says:


1. A thought is the emperor of the universe.

2. As the thought, so is the shape of life.

3. Change your thoughts, and your destiny will change.


Through these revolutionary nectar-like words of Sadhguru, we realize how important thoughts are in shaping our lives. This raises a question in my mind: If thoughts are so crucial in crafting our lives, then shouldn't we think about thoughts themselves? We must learn how to think.


Neuroscientists say:

Knowing how to think is more important than what to think.


Sadhguru has also explained the process of contemplating thoughts through scriptures and discourses. He advises:


- First, learn to observe thoughts.

- Then, analyze your thoughts.

- Finally, learn how to redirect and transform your thoughts.


**What is a Thought?**


When our senses receive stimuli from the external or internal environment, our brain begins to interpret these stimuli based on past experiences and prior knowledge. This process of interpretation is called thinking.


Simply put, whenever an event occurs through our senses, our brain processes it, assigns meaning, and helps us reach a decision—this entire process is what we call a thought.


**What Happens When We Think?**


Observe this in daily life: When someone asks us a question, we often say, "Let me think and answer." What does this mean? It means we engage in an internal dialogue with ourselves.


This self-dialogue happens 24/7, even if we are not always aware of it. For example, when you started reading this article, you might have thought:

"Let me see what this is about. The title seems interesting!"

Surprising, isn’t it?


This internal dialogue differs from person to person, making each individual unique. Since self-dialogue forms the foundation of our thoughts, it plays a crucial role in shaping or disrupting our lives.


Your career, financial decisions, health, and relationships are largely influenced by your internal conversations. This self-dialogue can be positive or negative, but in most cases, it tends to be negative.


Why does this happen?

To understand that, we need to explore the origin of thoughts, how to recognize them, and how to transform them.


In tomorrow’s article, we will delve into these aspects.


Sadhguru Nath Maharaj Ki Jai!


Jayant Joshi

Jeevanvidya Mission

 
 
 

Recent Posts

See All
स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना* *चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे ll* माणसाच आयुष्यमान - जीवन किती ? सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणूस एक दिवस...

 
 
 
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page