top of page

वस्तुस्थितीचा स्वीकार /Acceptance of Reality

वस्तुस्थितीचा स्वीकार


सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

वस्तुस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीला योग्य वळण देण्यातच शहाणपण असते.

वस्तुस्थितीचा स्वीकार म्हणजे काय?

वस्तुस्थितीचा स्वीकार करणे म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारणे. परिस्थिती बदलणे आपल्याला शक्य नसते, त्यामुळे त्या परिस्थितीबद्दल नकारात्मक भावना न ठेवता ती परिस्थिती स्वीकारली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रिय राहावे, परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करू नये. आलेल्या परिस्थितीला तटस्थतेने बघून जे जसे आहे ते तसेच मान्य करणे महत्त्वाचे आहे. यामागील मुख्य उद्देश असा आहे की, आपण सत्य परिस्थितीला स्वीकारल्याशिवाय योग्य आणि सकारात्मक कृती करता येत नाही.

उदाहरणार्थ:

  • जर एखादी अडचण निर्माण झाली असेल, एखादा प्रश्न उपस्थित झाला असेल तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रथम ती अडचण स्वीकारा, ती मान्य करा आणि मग त्यासाठी उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करा.

  • आयुष्यात काही काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. अशावेळी त्या गोष्टींशी संघर्ष करण्याऐवजी त्यांना स्वीकारून पुढे जाणे अधिक शहाणपणाचे असते.

  • ही विचारसरणी आत्मजागरूकता, मानसिक शांतता आणि जीवनातील अडचणींवर शहाणपणाने मार्ग काढण्यासाठी उपयुक्त ठरते.

सद्गुरु म्हणतात, जीवन जगणे एक कला आहे आणि वास्तव स्वीकारणे हा देखील जीवन जगण्याच्या कलेचा एक भाग आहे. वास्तव स्वीकारणे हे कौशल्य आहे. आपल्या दैनंदिन जीवनात ही कला कशी उपयुक्त ठरते बघा:

१. मन:शांती मिळते – ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, अशा गोष्टींचा स्वीकार केल्यास आपण त्याविषयी चिंता किंवा त्यातून निर्माण होणारा ताण टाळू शकतो. उदाहरणार्थ, हवामान. हवामानातील बदल आपण टाळू शकत नाही, पण आपण बदलत्या हवामानाला सामोरे जाण्याची तयारी करू शकतो.

२. समस्या सोडवण्याची क्षमता वाढते – जेव्हा आपण वास्तव स्वीकारतो, तेव्हा आपण आपल्या ऊर्जेचा अपव्यय टाळून त्या ऊर्जेचा उपयोग समस्येवरील उपाय शोधण्यासाठी करू शकतो. यामुळे आपण समस्या सोडविण्यासाठी अधिक परिणामकारक कार्य करू शकतो.

३. संबंध सुधारतात – इतर लोकांच्या स्वभावात किंवा विचारात अचानक बदल होईल असे मानण्याऐवजी त्यांच्या स्वभावाला समजून घेणे अधिक शहाणपणाचे ठरते. यामुळे आपले नातेसंबंध अधिक सामंजस्यपूर्ण होतात.

४. लवचिकता वाढते – वास्तव स्वीकारणे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानसिक तयारी. तडजोड करण्याची वृत्ती विकसित होते. सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "तडजोड करणे हे सुखी जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे." तसेच, "तोडफोड करायला अक्कल लागत नाही, पण तडजोड करायला शहाणपण लागते." यामुळे आपण वस्तुस्थितीला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतो व अनुकूल मन:स्थितीमुळे समस्येवर चांगला मार्ग निघू शकतो.

५. आत्मज्ञान होते – वास्तव स्वीकारल्याने आपल्याला आपल्या मर्यादा आणि सामर्थ्य यांची चांगली जाण होते, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते.

वास्तव स्वीकारणे ही एक कला आणि कौशल्याचे काम आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी आणि तिचा आपल्या दैनंदिन जीवनात समर्थपणे वापर करण्यासाठी:

  • साक्षीभाव जोपासा – साक्षीभाव म्हणजे निरपेक्ष निरीक्षण. वर्तमान क्षणात जागृत राहून विचार व भावना यात न अडकता निरीक्षण करा. यामुळे तुम्हाला वस्तुस्थिती जशी आहे तशी पाहता येईल.

  • नियंत्रण व प्रभाव यातील फरक ओळखा – ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टी शक्य नाहीत त्याचा आग्रह धरू नका. प्रतिसाद द्या, प्रतिकार करू नका. समस्येचा भाग बनू नका, तर समस्येच्या निराकरणाचा भाग बना. उदाहरणार्थ, इतरांच्या वर्तनावर तुमचे नियंत्रण नसले तरी तुमचा प्रतिसाद तुमच्या हातात असतो. तुमच्या प्रतिसादावर इतरांचा प्रतिसाद अवलंबून असतो. लक्षात ठेवा, "क्रिया तशी प्रतिक्रिया" हा निसर्गाचा महत्त्वाचा नियम आहे. म्हणूनच "Don't react, give response."

  • आव्हानांकडे संधी म्हणून पाहा – समस्येकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. समस्येला जीवनातील अडथळा न समजता कठीण प्रसंगाकडे शिकण्याची संधी म्हणून बघा. अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करा. "Don't become bitter, become better. Don't be a part of problem, be a part of solution."

  • भावनांना प्रतिसाद द्या – राग, दुःख, आनंद, संताप ज्या काही भावना समस्या निराकरणात निर्माण होतात, त्या भावनांना पूर्णपणे अनुभवण्याची मुभा द्या. त्यांना दडपण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करू नका.

  • वास्तववादी अपेक्षा ठेवा – तुमच्या उद्दिष्टांबाबत आणि मर्यादांबाबत प्रामाणिक राहा. अवास्तव अपेक्षा ठेवू नका. अवास्तव अपेक्षा निराशा आणतात, तर वास्तववादी अपेक्षा समाधान निर्माण करतात.

  • कृतज्ञतेची भावना अंगीकारा – जे तुमच्याकडे आहे त्याची कृतज्ञता बाळगा. याने गोष्टी वेगळ्या असाव्यात अशी इच्छा कमी होते आणि वर्तमान स्वीकारायला मानसिक बळ येते.

हिंदू तत्त्वज्ञानात वास्तव स्वीकारण्याची कल्पना समत्वभाव या संकल्पनेशी जोडलेली आहे. समत्वभाव म्हणजे सुखदुःख, यश-अपयश, विजय-पराजय याकडे तटस्थपणे पाहणे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "समत्वं योग उच्यते." समत्वभावाने अध्यात्मिक प्रगती होते, अधिक शहाणपण येते आणि आत्मज्ञान होते.

वास्तव स्वीकारल्याने आपल्याला जीवन अधिक परिणामकारक, शांत आणि समाधानकारक पद्धतीने जगायला बळ मिळते. आता वस्तुस्थितीचा स्वीकार करून जीवन सुखी-समाधानी करायचे की वस्तुस्थिती नाकारून जीवन दु:खी बनवायचे हे आपल्यालाच ठरवायचे आहे. म्हणूनच सद्गुरु म्हणतात,

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

धन्यवाद.

सद्गुरुनाथ महाराज की जय!

Jayant Joshi.



---


Acceptance of Reality


Sadguru Shri Vamanrao Pai says:


"Wisdom lies in accepting reality and guiding the situation in the right direction."


What does acceptance of reality mean?


Accepting reality means acknowledging the situation as it is. Since we cannot always change circumstances, we should not hold negative feelings about them but rather accept them. However, this does not mean we should remain passive or not attempt to improve the situation. The key is to observe the situation objectively and acknowledge it as it is. The primary purpose of acceptance is that only when we embrace reality can we take the right and positive actions.


Examples:


If a difficulty arises or a problem occurs, the first step to overcoming it is to accept and acknowledge it. Only then can we focus on finding solutions.


Some aspects of life are beyond our control. In such cases, instead of struggling against them, accepting them and moving forward is the wiser choice.


This mindset helps in self-awareness, mental peace, and wisely navigating life's challenges.



Sadguru says, "Living life is an art, and acceptance of reality is a part of that art. It is a skill."


How does the acceptance of reality help in daily life?


1. Brings Peace of Mind – When we accept things we cannot change, we avoid unnecessary stress and worry. For example, we cannot control the weather, but we can prepare ourselves to deal with changes.



2. Enhances Problem-Solving Ability – Acceptance helps us save energy from resisting the situation and instead directs it towards finding solutions. This leads to better problem-solving and efficiency.



3. Improves Relationships – Instead of expecting people to change suddenly, understanding and accepting them as they are helps create harmonious relationships.



4. Increases Flexibility – Accepting reality means being mentally prepared to adapt. It develops an attitude of compromise and adjustment.

Sadguru Shri Vamanrao Pai says:

"Compromise is an essential part of a happy life. Breaking things apart does not require intelligence, but making compromises requires wisdom."

With this mindset, we can face situations wisely and find better solutions.



5. Leads to Self-Realization – Accepting reality helps us understand our strengths and limitations, boosting our self-confidence and decision-making abilities.




How to Develop the Skill of Acceptance


Accepting reality is not always easy. It is an art and a skill that can be developed with practice:


Develop the Observer Mindset – Observe situations without getting emotionally involved. Stay present and analyze the situation neutrally. This helps in seeing reality as it is.


Understand the Difference Between Control and Influence – Focus on what you can control rather than stressing over things you cannot. Do not resist situations unnecessarily. Respond rather than react.

For example: You cannot control other people's behavior, but you can control your response to it. Remember, "Action equals reaction"—your response influences the outcome.


See Challenges as Opportunities – Change your perspective towards problems. Instead of viewing them as obstacles, consider them learning opportunities.

"Don't become bitter, become better."

"Don't be part of the problem; be part of the solution."


Acknowledge Your Emotions – Do not suppress or exaggerate your feelings of anger, sadness, or frustration. Experience them fully but do not let them control you.


Set Realistic Expectations – Be honest about your goals and limitations. Unrealistic expectations lead to disappointment, while realistic ones bring satisfaction.


Cultivate Gratitude – Appreciate what you already have. Gratitude reduces unnecessary desires and helps in mentally embracing the present.



Acceptance in Hindu Philosophy


In Hindu philosophy, acceptance of reality aligns with the concept of "Samattva Bhav" (Equanimity).


Lord Krishna says in the Bhagavad Gita:

"Samattvam Yoga Uchyate" – Equanimity is the true essence of Yoga.


Samattva Bhav (Equanimity) means:


Remaining balanced and composed in happiness and sorrow, success and failure, gain and loss.


Detachment – Accepting reality without excessive emotional involvement.


Inner Peace – Maintaining inner calm regardless of external circumstances.


Spiritual Growth – Developing wisdom and self-awareness through acceptance.



By accepting reality, we enhance our ability to live life effectively, peacefully, and satisfactorily.


Now, the choice is yours—

Will you accept reality and live a happy life, or deny reality and stay unhappy?


That is why Sadguru says:

"You are the sculptor of your own life."


Thank you.

Sadguru Nath Maharaj Ki Jai!


- Jayant Joshi








 
 
 

Recent Posts

See All
स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना* *चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे ll* माणसाच आयुष्यमान - जीवन किती ? सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणूस एक दिवस...

 
 
 
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे...

 
 
 

Comentarios


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page