*राम नामाचा महिमा*
- ME Holistic Centre
- Apr 7
- 1 min read
हनुमानजी समुद्र पार करून गेले.
एकदा कोणीतरी तुलसीदासजींना विचारलं- "की किती आश्चर्याची गोष्ट आहे नाही कां,? कि, हनुमानजी एका छलांमध्ये शंभर योजनांचा समुद्र पार करून गेले."
तुलसीदास म्हणतात, यात आश्चर्य काहीच नाही. कारण हनुमानजी समुद्र पार करून गेले यात हनुमानाच सामर्थ्य नाही. तर, कमाल आहे जे दिसत नव्हतं त्याची.
कोण दिसत नव्हतं,
*प्रभू मुद्रिका मेलि मुख* *माहीं l*
*जलधि लाॅंघी*
*गये अचरज नाही ll*
हनुमानजी समुद्र पार करून गेले,यात हनुमानाचं सामर्थ्य नाही आणि आश्चर्य तर नाहीच नाही. कारण हनुमानाच्या मुखात अंगठी होती. तर सामर्थ्य अंगठीचं होतं का? तुलसीदास म्हणतात, सामर्थ्य अंगठीच पण नाही. अंगठी काही मुखात ठेवण्याची गोष्ट आहे कां?
हनुमानजी तर *बुद्धिमत्ताम वरिष्ठम* म्हणजे अत्यंत ज्ञानी होते. अंगठी काही तोंडात ठेवण्याची गोष्ट नाही हे हनुमानजींना निश्चितच माहिती होतं.
हनुमानजींना कोणीतरी विचारलं, आंगठी तोंडात कां ठेवली आहे? आंगठी काय तोंडात ठेवण्याची गोष्ट आहे कां ?
हनुमान जी म्हणतात, अंगठी तोंडात ठेवण्याची गोष्ट नाही पण अंगठीवर जे लिहिलं आहे ती मात्र तोंडातच ठेवण्याची गोष्ट आहे. ती तोंडा व्यतिरिक्त इतरत्र ठेवण्याची गोष्टच नाही.
*तब देखी मुद्रिका मनोहर l*
*राम नाम अंकित अतिसुंदर ll*
त्या अंगठीवर अतिशय सुंदर असे राम नाम लिहिलेले होते. हनुमानजींनी अंगठी म्हणजे राम नाम मुखात ठेवले तर हनुमानजी एका उडीत 100 योजने समुद्र पार करून गेले. किती छान नाही? एक राम नाम मुखात ठेवलं तर हनुमानजी समुद्र पार करून गेले.
ते नाम सोपे रे
"राम कृष्ण गोविंद"
जर आम्ही मुखात सतत *हरिनाम* ठेवले तर हा संसार-सागर किती सहज आम्ही पार करू शकू.नाही कां?
त्याकरिता *हरि नामावर* दृढ विश्वास पाहिजे.
*जय श्रीराम.*
जयंत जोशी
Comments