मानव धर्म / Human Dharm
- ME Holistic Centre
- 5 days ago
- 7 min read
*मानव धर्म*
सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,
"माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच खरा मानव धर्म आहे."
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे काय?
उत्तर सोपे आहे, आपल्याशी इतरांनी जसे प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागावे, इतरांनी आपले कौतुक करावे असे आपल्याला वाटते की नाही? बस, मग आपण देखील याच भावनांनी इतरांबरोबर वागावे, म्हणजेच माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे होय. ९०% लोक आपण त्यांच्याशी कसे वागतो यावर त्यांनी आपल्याशी कसे वागायचे ते ठरवितात. थोडक्यात इतरांनी आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असल्यास प्रथम आपण इतरांशी चांगले वागले पाहिजे.
सद्गुरु दुसऱ्या एका अमृत तुषारात म्हणतात,
"कोणती व्यक्ती कोणाला, कुठे, कधी, कशी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवाला देखील सांगता येणार नाही." म्हणून प्रत्येकाने आपल्या संपर्कात, सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर सहानुभूतीने आणि चांगले वागले पाहिजे.
या विचारांचा गाभा हा आहे की, आपण एकमेकांशी वागताना माणूस म्हणून आपल्यातील करुणा, आदर, समजूतदारपणा आणि क्षमाक्षिलता जपली पाहिजे. याचा अर्थ असा की :-
१. *करुणा*
करुणा म्हणजे काय तर एखाद्याच्या परिस्थितीला समजून घेऊन त्याला आधार देणे.करूणा अशी भावना आहे की जी इतरांच्या दुःखाबद्दलची सहानुभूती आणि ती कमी करण्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा दर्शविते. करुणा ही केवळ भावना नसते तर त्यामध्ये कृती करण्याची प्रेरणा असते. सहानुभूती म्हणजे सह-अनुभूती म्हणजे जणू काही त्याचा आनंद आणि त्याचे दुःख हे माझेच स्वतःचे दुःख आहे किंवा त्याला जितका आनंद झालेला आहे तितकाच आनंद मला देखील झालेला आहे असा अनुभव करणे. दया आणि करुणा यात महदंतर आहे.
आय ओ एम या अमेरिकन वैद्यकीय आस्थापनाच्या लेखापरीक्षण संस्थेने २०१० च्या बैठकीत आरोग्याची नवीन व्याख्या स्वीकारली आहे. ती अशी "Enthusiasm to work and enthusiasm to compassionate"
आरोग्य म्हणजे काम करण्याचा उत्साह आणि करुणा, सहानुभूतीचा उत्साह. डॉक्टर बी एम हेगडे म्हणतात, "जोपर्यंत तुमच्यात काम करण्याचा उत्साह आहे आणि इतरांप्रती तुमचा करुणा भाव जागृत आहे तोपर्यंत तुम्ही एकदम ठणठणीत म्हणजे आरोग्यवान राहाल" आहे की नाही गंमत? आनंदी, सुखी आणि आरोग्यवान होण्याचा किती सोपा मार्ग आहे नां? सतत कार्यरत राहा, काम कोणतेही असो ते उत्साहाने करा आणि इतरांप्रती करुणामय भावना ठेवा.
२. *आदर राखणे*
जीवन जगत असताना आपला संबंध भिन्न भिन्न स्वभावाच्या, भिन्न विचारांच्या, भिन्न संस्कृतीच्या, भिन्न आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या आणि वयोगटांच्या लोकांशी येतो, या सर्वांशी वागताना सर्वांप्रती समान आदरभाव ठेवता आला पाहिजे.
३. *समजूतदारपणा*
एखादी व्यक्ती चुकीचे वागत असल्यास त्याच्या त्या वागणुकी पाठीमागचे कारणांचा विचार करा. त्याला समजून घ्या. आणि शक्य असल्यास त्याला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करा.
४. *सहानुभूतीने संवाद साधा*
लक्षात ठेवा संवादामध्ये केवळ शब्द महत्त्वाचे नसतात तर त्या शब्दाचा धन्वयार्थ अत्यंत महत्त्वाचा असतो. जी गोष्ट रागावून संतापून सांगता येते तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सौम्य शब्दात देखील परिणामकारकरीत्या सांगता येते. शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात. तुमचे काहीही म्हणणे असले तरी त्या शब्दांमधून तुमचा त्या व्यक्तीप्रतीचा आदर आपुलकी आणि प्रेम व्यक्त व्हावयास हवे.
५. *क्षमाशीलता*
जर एखाद्या व्यक्तीने आपल्या बरोबर काही चुकीचे केले असेल तर त्याच्याबद्दल मनात राग ठेवू नका. सुडाची आणि तिरस्कारची भावना तर बिलकुल बाळगू नका. कोणाचाही कोणत्याही कारणास्तव मत्सर करू नका. संत तुकाराम महाराज म्हणतात, "कोणाही जीवाचा न घडो मत्सर" तुकाराम महाराज न करावा मत्सर असे म्हणत नाहीत तर न घडावा मत्सर असे म्हणतात. म्हणजे जाणतेपणी किंवा अजाणतेपणे देखील कोणाचाही मत्सर करू नका. आधुनिक आरोग्य विज्ञान सांगते, कर्करोगाची जी अनेक कारणे आहेत त्यापैकी मत्सर हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
६. खऱ्या मानवधर्माचाअर्थ म्हणजे नात्यांमध्ये मग ते कोणतेही नाते असो स्वार्थ बाजूला ठेवून माणसाच्या माणूसपणाला प्राधान्य देणे. यामुळे जीवनात प्रेम शांतता आणि सलोखा निर्माण होतो.
भारतीय संस्कृती आणि परंपरेत माणूस म्हणून वागण्याची आदर्श तत्त्वे आणि शाश्वत मूल्ये प्रस्थापित आहेत. ज्याला सद्गुरु जीवनमूल्ये असेही म्हणतात. आणि ही जीवनमूल्ये कालातीत आहेत म्हणजे ती कोणत्याही काळासाठी लागू होतात ती म्हणजे:-
१. *सत्यनिष्ठा*
कायम खरे बोलणे आणि सत्याची साथ देणे. सत्यनिष्ठा हा विश्वास निर्माण करणारा गुण आहे. आपल्या संवादात नेहमी प्रामाणिकपणा असला पाहिजे मग तो संवाद कामातील असो किंवा कुटुंबातील सदस्यांबरोबर असो. आणि तो दिसला आणि जाणवला पाहिजे. कृत्रिमता नको. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सत्याची पाठ राखण केली पाहिजे. आपली चूक झाली असल्यास ती प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे.
२. *अहिंसा*
अहिंसा म्हणजे कोणालाही शारीरिक मानसिक किंवा भावनात्मक स्वरूपात न दुखावणे. कठोर शब्द आणि कठोर कृती टाळावी. वाद न वाढवता, सहमतीने, सामंजस्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३. *कर्तव्यनिष्ठा*
स्वतःच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडणे. कर्तव्यनिष्ठा म्हणजे स्वधर्माचे पालन. ज्ञानेश्वर माऊली पसायदानात मागणी मागतात, *स्वधर्मे सूर्ये पाहतो* येथे स्वधर्म म्हणजे आपण ज्या भूमिकेत आहोत ती भूमिका कर्तव्यनिष्ठतेने पार पाडणे. इतर लोक कसे वागतात याची तुलना करून माझे वागणे न ठरविता माझे कर्तव्य काय आहे ते विचारात घेऊन कार्य करणे.
४. *समता आणि न्याय*
सर्वांप्रती समभाव ठेवणे. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे हक्क आणि सन्मान देणे. हा मानवी जीवनाचा मोठा आधार आहे. अन्यायाला साथ देऊ नका. अन्याय सहन करू नका.
५. *स्वयंशिस्त आणि संयम*
आपले विचार, आपले शब्द आणि उच्चार आणि कृती यावर नियंत्रण ठेवून सकारात्मक जीवनशैली स्वीकारणे. सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा.
६. *पर्यावरणाचे संवर्धन*
निसर्गाचे रक्षण करणे ही आपली मूलभूत जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून नैसर्गिक संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करणे. आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे.
७. *ज्ञानप्राप्ती*
क्षणाक्षणाला शिकणे. वाचन आणि लिखाणासाठी रोज थोडा तरी वेळ द्या. स्वतःमध्ये व इतरांमध्ये जिज्ञासा निर्माण करा.
८. *ध्यान आणि आत्मनिरीक्षण*
मन:शांतीसाठी नियमित आत्मचिंतन करा.
९. *आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा जपणे*
आपल्या पारंपारिक मूल्यांची जाणीव ठेवून आधुनिकतेला समर्पक रीतीने आत्मसात करणे.
या मूल्यांचे पालन केले तर केवळ आपणच सुखी, आनंदी होणार नाही तर संपूर्ण समाज सुखी होईल आणि सद्गुरूंचे ध्येय, "हे जग सुखी व्हावे" हे निश्चितच पूर्ण होईल. लक्षात ठेवा, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागणे हे फार सोपे आहे. परंतु सद्गुरु म्हणतात, माणसाला नेहमीच अवघड गोष्टी करायला आवडतात. आणि तो आपले जीवनही अवघड करून घेतो. तेव्हा आता तुमचे तुम्हीच ठरवा सोपी गोष्ट करून आपले जीवन सहज आनंदी सुखी करायचे की अवघड करायचे. कारण, "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
धन्यवाद.🙏
सदगुरुनाथ महाराज की जय.🌷
जयंत जोशी
Human Dharma
Sadguru Shri Vamanrao Pai says,
"Treating humans with humanity is the true human dharma."
What does it mean to treat humans with humanity?
The answer is simple—don’t we all wish for others to treat us with love, respect, and care? Don’t we want them to appreciate us? If so, then we must also treat others with the same emotions. This is what it means to treat humans with humanity.
90% of people decide how to treat us based on how we treat them. In short, if we want others to treat us well, we must first treat them well.
In another discourse, Sadguru says,
"No one, not even Lord Brahma, can predict who will be helpful to whom, where, when, and how."
Therefore, we must treat every person we meet with kindness and compassion. The essence of this teaching is that when interacting with others, we must uphold our human values of compassion, respect, understanding, and forgiveness.
1. Compassion
Compassion means understanding someone’s situation and offering support. It is a feeling that not only empathizes with others' suffering but also inspires action to alleviate it. True empathy means experiencing others' joys and sorrows as our own.
The Institute of Medicine (IOM) in the USA redefined health in 2010 as "Enthusiasm to work and enthusiasm to be compassionate."
Dr. B.M. Hegde says, "As long as you have the enthusiasm to work and a compassionate heart, you will remain truly healthy." What a simple way to stay happy and healthy! Stay active, work enthusiastically, and maintain a heart full of compassion.
2. Respect
In life, we interact with people of different temperaments, thoughts, cultures, economic backgrounds, educational levels, and age groups. Regardless of these differences, we must treat everyone with equal respect.
3. Understanding
If someone behaves wrongly, try to understand the reasons behind their actions. If possible, guide them towards the right path.
4. Empathetic Communication
Words are not the only important part of communication; the emotions behind them matter even more. Any harsh message can be conveyed in a softer, more effective manner. Words should express respect, warmth, and love towards others.
5. Forgiveness
If someone has wronged you, do not hold onto resentment. Never harbor feelings of revenge or hatred. Avoid jealousy at all costs.
Sant Tukaram Maharaj says, "Let there be no envy towards any being."
He does not say, "Do not be envious," but rather, "Let envy never arise in you," meaning we should avoid it consciously and subconsciously.
Modern medicine states that envy is one of the significant causes of cancer.
The True Meaning of Human Dharma
Regardless of the type of relationship, prioritize human values over selfish interests. This leads to love, peace, and harmony in life.
Indian culture and traditions have established ideal principles and eternal values for human conduct, also known as Sadguru’s life values. These values transcend time and remain applicable in any era.
Core Human Values
1. Truthfulness
Always speak the truth and stand by it. Truthfulness builds trust. Be honest in all your communications, whether professional or personal. Integrity should be evident and genuine. Even in small matters, uphold the truth. Admit mistakes sincerely when they happen.
2. Non-Violence
Do not cause harm—physically, mentally, or emotionally. Avoid harsh words and actions. Instead of escalating conflicts, seek peaceful resolutions with understanding.
3. Dutifulness
Fulfill your responsibilities with dedication. Be committed to your duties without comparing yourself to others. As Sant Dnyaneshwar says in Pasaydan, "Let me see the Sun of righteousness in my own duty."
4. Justice and Equality
Treat everyone with fairness and grant them their due respect and rights. Never support injustice, nor tolerate it.
5. Self-Discipline and Restraint
Control your thoughts, speech, and actions to adopt a positive lifestyle. Avoid excessive use of social media.
6. Environmental Conservation
Protecting nature is our fundamental responsibility. Managing natural resources wisely and raising environmental awareness is essential in today’s world.
7. Pursuit of Knowledge
Keep learning at every moment. Set aside time daily for reading and writing. Encourage curiosity within yourself and others.
8. Meditation and Self-Reflection
Regular self-reflection brings mental peace and clarity.
9. Preserving Culture and Traditions
Embrace modernity while staying rooted in traditional values.
By following these principles, not only will we lead a happy and fulfilled life, but society as a whole will benefit. This will help fulfill the mission of Sadguru—"May the world be happy."
Remember, treating others with humanity is simple. However, as Sadguru says, people often complicate their lives by choosing the difficult path.
So, you must decide—do you want to make your life simple, joyful, and fulfilling, or unnecessarily complicated?
After all, "You are the sculptor of your own life."
Thank you.
Glory to Sadguru!
Comments