top of page

भक्तीयोग / Bhakti Yog


*श्रद्धावान लभते*

*ज्ञानम.*


भक्ती म्हणजे काय?

भक्ती म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे संपूर्ण समर्पण. भक्ती म्हणजे आत्मानंद अनुभवण्याचा मार्ग - स्वतःच्या अंतर्मनाशी जोडून परमेश्वराशी किंवा उच्च शक्तीशी एकरूप होणे. भक्ती शब्द हा संस्कृत *भज* या धातूपासून आलेला आहे. ज्याचा अर्थ आहे सेवा करणे किंवा विनम्रतेने समर्पण करणे. भक्तीचे सगुण आणि निर्गुण भक्ती असे प्रकार असले तरी भक्तीचे वर्गीकरण सख्य

भक्ति, दास्यभक्ती, माधुर्य भक्ती असेही केलेले आहे. संत नवविधा भक्तीचे प्रकार सांगतात. भक्ती ही दैवी शक्तीची, व्यक्तीची किंवा मूल्यांची असू शकते. भक्ती म्हणजे शुद्ध प्रेम, श्रद्धा आणि आत्मसमर्पण. भक्ती ही केवळ एक भावना नाही तर जीवन जगण्याची एक मार्गदर्शक पद्धत आहे.


आनंदाचे डोही आनंद तरंग या लेखात आपण संत तुकारामांची भक्ती किती पराकोटीची होती ते बघितले.

भक्ती म्हणजे :

"कायेन वाचेन मनसेंद्रियैर्वा

बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात

करोमी यद्दत्सकलं परस्मै नारायणायेती समर्पयामी."


थोडक्यात शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी किंवा आत्म्याद्वारे किंवा स्वाभाविक प्रवृत्तीने माझ्याकडून जे जे कार्य होईल ते सर्व कार्य नारायणाला म्हणजे इतर सर्वांना आनंदी करण्यासाठी समर्पित करणे. संत तुकारामांनी भक्ती म्हणजे मानवतेची सेवा कशी महत्त्वाची आहे हेच आपल्या अभंगांमधून सांगितलेले आहे.


सध्याच्या आपल्या जीवनात आपल्याला फक्त आपले शरीर, मन आणि भावना यांचाच अनुभव आहे. शरीर मन आणि भावना याद्वारे आपले जीवन जसे घडत आहे तसे घडण्यासाठी आवश्यकता असते ती ऊर्जेची. ऊर्जे शिवाय कोणतेही कार्य होऊच शकत नाही. या विश्वातील प्रत्येक कार्य म्हणजे ऊर्जेचे प्रगटीकरण आहे. विश्वात सर्वत्र ऊर्जा म्हणजे चैतन्य भरून राहिलेले आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

*"चैतन्य असे सर्वगत"* या चैतन्याशी सर्वार्थाने जोडले जाणे म्हणजेच भक्ती.


शरीर, मन, भावना आणि ऊर्जा हे चार मानवी जीवनाचे वास्तव आहेत. आपल्याला आपल्या जीवनात जे काही करावयाचे आहे ते या चार पातळ्यांवरच असले पाहिजे आणि ते या चार पातळ्यांवरच असते. जेव्हा आपण शरीराचा म्हणजेच शारीरिक क्रियांचा वापर करून परमतत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला *कर्मयोग कर्ममार्ग* म्हणतात.

जेव्हा आपण मनाचा म्हणजेच भावनांचा वापर करून परमतत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला

*भक्ती मार्ग भक्तीयोग* म्हणतात.

जेव्हा आपण बुद्धीचा वापर करून परमतत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला

*ज्ञानमार्ग ज्ञानयोग* म्हणतात.

जेव्हा आपण आपल्या शक्तीचे रूपांतर करून परमतत्त्वाशी जोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला *राजमार्ग राजयोग किंवा क्रियायोग* म्हणतात.


भक्ती योग म्हणजे काय?

मानवी जीवनाच्या प्रवासातील एक काळ असा होता की मानवी जीवनात भावना हा घटक सगळ्यात जास्त प्रबळ आणि प्रभावी होता. म्हणजेच मानवी जीवन व्यवहारात भावनेला महत्त्वाचे स्थान होते. आजच्या या विज्ञान युगातील मानवी जीवनात भावना हा तेवढा प्रबळ भाग राहिलेला नाही. तरी देखील वैयक्तिक जीवनात मात्र आजही भावना हा सर्वात तीव्र घटक आहे. आजही वैयक्तिक जीवनातील बहुतांश कार्यै ही भावनात्मकच होत असतात.


बहुतांश लोकांचे भौतिक शरीर हे तीव्रतेच्या उच्चतम पातळीवर कार्य करण्यासाठी सक्षम नसते. शरीर प्रफुल्लित ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आपण आपल्या मनाला तीव्र ठेवू शकतो पण तीव्र मन टिकवून ठेवण्यास फारच कमी लोक सक्षम असतात. मनाची स्थिरता आपण टिकवून ठेवू शकत नाही. स्थिर मन म्हणजेच आनंदाचा डोह. ऊर्जेच्या म्हणजे शक्तीच्या, चैतन्याच्या बाबतीत तर सहसा लोक अजिबातच तीव्र नसतात. त्यांना तीव्रतेचे ठराविक क्षणच माहीत असतात. तीव्रतेची स्थिर अवस्था लोक अनुभवतच नाहीत.


परंतु लोकांच्या भावना मात्र तीव्र स्वरूपाच्या असू शकतात. प्रेमात नाही तर रागात लोक प्रखर असतात. काही काही भावनेतच लोक प्रखर होण्यास सक्षम असतात. आपण इतरांना प्रेमाने किंवा आनंदाने तीव्र म्हणजे प्रभावित करू शकत नसलो तरी आपण शिवीगाळ करून इतरांना रागाने तीव्र करू शकतो. राग ही भावना इतकी तीव्र होते की तुम्ही रात्रभर झोपू शकत नाही. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या कामासाठी जागायला सांगितलं तर तुम्ही झोपी जाल. पण जर भांडण झालं तर मात्र रात्र जागून काढाल. रागावलेल्या लोकांना झोप येतच नाही. थोडक्यात भावना हाच मानवी जीवनात नेहमीच प्रमुख घटक ठरत आलेला आहे. *आपल्या जीवनाचे नंदनवन करायचे की वाळवंट करायचे हे आपल्या भावनाच ठरवितात.*


*भक्तीयोग म्हणजे*

*भावनेच्या तीव्रतेचा*

*वापर*

भावना ही अशी एक गोष्ट आहे की जी वेगवेगळ्या रूपात प्रगट होते. भावना अतिशय सुंदर आणि आश्चर्यकारक रूप घेऊ शकते तसेच भावना अतिशय घृणास्पद आणि भयानक रुप देखील घेऊ शकते. भावनेला सुंदर आणि आनंददायक रूप देण्याचे प्रशिक्षण देणे हे कौशल्याचे आणि शहाणपणाचे काम आहे. आणि त्यासाठीचा योग्य मार्ग म्हणजेच

*भक्ती मार्ग*

भक्ती हा आपल्या भावनांना नकारात्मकते कडून रचनात्मक आणि सकारात्मकते कडे तर दुःखाला सुखात आणि आनंदात रूपांतरित करण्याचा सहज सोपा मार्ग आहे. जरा बघा प्रेमात पडलेल्या लोकांना जगात काय चाललंय, जगात काय घडतय याची पर्वा नसते. त्यांचं ते वागणं आपल्याला अवास्तव वाटतं, पण त्यांनी आपल्या भावना सुखद केलेल्या असतात. त्यामुळे त्यांचे जीवन सुंदर असतं. येथे प्रेमात याचा अर्थ शारीरिक प्रेम नाही तर सात्विक प्रेम जे भावाभावां मध्ये, मित्रा मित्रात, गुरु शिष्यात, पती-पत्नीत, बापलेकात, मायलेकीत असतं. कोणत्याही अपेक्षा विना, विनाअट प्रेम, ज्याला खऱ्या अर्थाने भाव असं म्हटलं जातं.

अत्यंत निरातिशय, विना अपेक्षा, विनाअट प्रेम असल्याशिवाय खरा भाव निर्माणच होत नाही.

ही अशी अत्यंत प्रेमभावाची अवस्था निर्माण होण्याची स्थिती म्हणजे भक्ती. ही प्रेमाची उच्चतम अवस्था होय. भक्त हा अखंड प्रेम स्वरूपात असतो. प्रेमात अपेक्षेप्रमाणे वागणे अथवा न वागणे हा भागच नसतो. भक्ती ही केवळ भक्तीच असते त्यात कोणत्याही प्रतिसादाची अपेक्षा नसते. जेव्हा अपेक्षा नसते तेव्हा ते सगळं प्रकरणच आनंदमय होऊन जातं. आणि

*आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे*

ही अवस्था प्राप्त होते. संपूर्ण जीवन सुंदर होतं. या जीवनाच्या गोडव्यातूनच माणसाची प्रगती आणि उन्नती होते. भक्ती हा बुद्धिमत्तेचा एक आयाम आहे. बुद्धीला सत्त्यावर विजय मिळवायचा असतो. तर भक्ती फक्त सत्याचा स्वीकार करते. भक्ती हा समजण्याचा विषय नाही तर भक्ती हा अनुभवण्याचा विषय आहे. बुद्धी समजू शकते पण अनुभवू शकत नाही. भक्ती समजू शकत नाही पण अनुभवता येते. बुद्धी की भक्ती याची निवड करावी लागते.

*:भक्ती:*

*एक व्यापक नवा*

*दृष्टिकोन.*


जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तिमत्त्वाने किंवा एखाद्या गोष्टीने भारावून जाते तेव्हा साहजिकच ती व्यक्ती त्या गोष्टीची अथवा त्या व्यक्तिमत्त्वाची भक्त बनते. पण खरी समस्या येथेच सुरू होते. कारण भक्ती ही भावनेतून निर्माण होते. तेथे बुद्धीचे काही चालत नाही. बुद्धी काम करत नाही. भक्ती आणि फसवणूक यातील सीमारेषा त्यामुळे अत्यंत अस्पष्ट असतात. याचा अनुभव अनेक लोकांना काही काळानंतर येतो. आपल्या देखील वाचनात, पाहण्यात अशा घटना वारंवार येतात. सुरुवातीच्या काळामध्ये भावनांमुळे लोकांमध्ये नाना प्रकारचे भ्रम निर्माण करण्यात काही लोक यशस्वी होतात. तुम्ही भक्तीचा सराव करू शकत नाही. पण भक्ती पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काही गोष्टी मात्र निश्चितच करू शकता.

तुम्ही जर एक गोष्ट ओळखली तर तुम्ही साहजिकच भक्त व्हाल. ही गोष्ट म्हणजे हे ब्रम्हांड. हे ब्रम्हांड खूप विशाल आहे. हे ब्रम्हांड प्रचंड आहे. या विश्वाची सुरुवात कोठे होते आणि हे विश्व संपते कुठे, हे अज्ञातच आहे. या विश्वात अनंत कोटी ब्रम्हांडे आहेत. येथे कोटी या शब्दाचा अर्थ संख्यात्मक नाही तर कोटी याचा अर्थ प्रकार असा आहे. या विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. अशा या विशाल ब्रम्हांडात आपली आकाशगंगा हा सौरमालेचा एक अत्यंत छोटासा भाग आहे. उद्या जर काही कारणाने आपल्या सौरमालेचा नाश झाला तर या विश्वात, ब्रम्हांडात त्याची दखल देखील घेतली जाणार नाही.

आणि या सर्व प्रचंड विश्वाच्या पसाऱ्यात आपल्या पृथ्वीचे स्थान हे एखाद्या धुलीकणा समान आहे.‌ आणि अशा या धुलीकणात आपले शहर हे अत्यंत सूक्ष्म कण आहे. आणि अशा या सूक्ष्म कणात आपण आपले अस्तित्व मात्र खूप मोठे समजत असतो. वास्तविक पाहता आपण खूपच मर्यादित जगात वावरत असतो. आणि त्या मर्यादित जगातच आपण सतत "मी, मी" चा घोष करत असतो. आपल्या वर्तुळाबाहेर आपल्याला काहीच किंमत नसते. सद्गुरु म्हणतात,

"तुम्ही तुमचे सर्कल सोडून बाहेर जाऊन बघा, कुत्रे देखील तुम्हाला विचारणार नाही."

आपले जग हे शे-पाचशे लोकांचे असते, आणि अशा या छोट्याशा जगात देखील आपण आपल्या इच्छेने आपले जीवन जगत नाही. या जगात वावरत असताना सतत LKK Factor ( लोग क्या कहेंगे ? ) याच्याच दबावाखाली आपण जगत असतो. हा आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हीच खरी तर गंभीर समस्या आहे. याचे कारण म्हणजे आपल्यातील भक्तीचा अभाव.


या विश्वाच्या विशालतेची आणि या विशाल विश्वातील आपल्या सूक्ष्मतेची आपल्याला जाणीवच होत नाही. या विश्वाच्या विशालतेची आणि आपल्या सूक्ष्मतेची जेव्हा आपल्याला जाणीव होईल तेव्हा आपण या विश्वातील प्रत्येक गोष्टी पुढे नतमस्तक होऊ आणि तीच खऱ्या अर्थाने आपल्या भक्तीची सुरुवात असेल.

म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

"जे जे भेटेल भूत त्यासी मानिजे भगवंत"

याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या दृष्टिकोनात बदल करावा. आणि प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्राणिमात्र किंवा घटना यामध्ये ईश्वराचे अस्तित्व पहावे. या विश्वाच्या अपेक्षेत आपले स्वतःचे स्थान काय याची जाणीव नसल्यानेच लोक अहंकारी मूर्ख बनलेले आहेत.

प्रगत विज्ञानाने अनेक प्रकारचे शोध लावलेले असले तरी विज्ञान आजही एकाही अणूचा पूर्णपणे शोध लावू शकलेले नाही. आपल्याला गोष्टींची माहिती तुकड्या तुकड्यांमध्ये असते. त्यांचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत असते. परंतु ती गोष्ट समग्रतेने काय आहे याची आपल्याला काहीही कल्पना नसते. पान, फुल, पक्षी, प्राणी, मुंगी, कीटक या गोष्टींचे आपण निरीक्षण केलं तर कोणतीही एक गोष्ट आम्हाला पूर्णपणे समजू शकत नाही. जेव्हा आपल्याला आपल्या या ज्ञानाच्या मर्यादेची जाणीव होते. तेव्हा साहजिकच आपण त्या निर्मात्यापुढे नतमस्तक होतो. मग आपण त्या निर्मात्याचे भक्त झाल्याशिवाय कसे बरे राहू. आपल्याला जर खरा भक्त व्हायचे असेल तर आपण एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे या अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणे. आकाशातील तारे तर दूर आहेत पण रस्त्यावरील छोटासा दगड देखील आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे पाहण्याचा प्रयत्न करा. तो आपल्यापेक्षा जास्त कायमस्वरूपी आणि आपल्यापेक्षा अधिक स्थिर आहे. तो कायम शांत बसू शकतो.

या विश्वातील सर्वकाही आपल्या बुद्धिमत्तेच्या वर आहे प्रत्येक गोष्ट माझ्या स्वतःपेक्षा श्रेष्ठ आहे याची जाणीव झाली की तुम्ही भक्त झालातच. भक्ताला अशा गोष्टी माहीत असतात ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. ज्या गोष्टींशी आपल्याला संघर्ष करावा लागतो त्या गोष्टी भक्त सहज समजू शकतो, कारण तो *स्व* च्या पलीकडे गेलेला असतो.

जेव्हा तुमच्यामध्ये मीपणा पूर्णपणे भरलेला असतो तेव्हा तिथे आणखी काही उच्च दर्जाचे घडण्यासाठी जागाच शिल्लक नसते.

भक्ती म्हणजे किंवा भक्त असणे म्हणजे काही देवळात जाऊन पूजा अर्चना करणे, भजन कीर्तन करणे, व्रतवैकल्य करणे, तीर्थयात्रा करणे, नारळ फोडणे, प्रसाद वाटणे नव्हे तर अस्तित्वातील आपले स्थान समजून त्याची जाणीव होणे व त्याप्रमाणे सर्वांप्रति वर्तन करणे. म्हणजेच खऱ्या अर्थाने भक्त होणे, भक्ती मार्ग, भक्ती योग साध्य करणे होय. भक्ती मार्गाला पर्याय नाही. भक्ती मार्ग हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे.

धन्यवाद.

ll सद्गुरु नाथ महाराज की जय ll

  • जयंत जोशी


...



"Bhakti Yoga"


"Shraddhavan labhate jnanam"

(The one with faith attains knowledge)


What is Bhakti?


Bhakti means complete surrender of body, mind, and soul. Bhakti is the path to experiencing inner bliss – to connect with one’s inner self and become one with the Supreme or higher power. The word Bhakti originates from the Sanskrit root bhaj, which means to serve or to surrender humbly. Although Bhakti is broadly classified into saguna (with form) and nirguna (without form), it is also further divided into types like sakhya bhakti (friendship), dasya bhakti (servitude), and madhurya bhakti (sweet/devotional love). Saints describe nine types of devotion. Bhakti can be towards divine energy, a person, or values. Bhakti is pure love, faith, and surrender. It is not just an emotion but a guiding principle of living.


In the article "Anandache dohi anand tarang" (Waves of joy in the ocean of joy), we saw the unparalleled devotion of Saint Tukaram.


Bhakti means:

"Kayena vachena manasendriyairva

Buddhyatmana va prakriti svabhavat

Karomi yadyatsakalam parasmai

Narayanaayeti samarpayaami"


In short, whatever actions I perform through my body, speech, mind, senses, intellect, soul, or by my inherent nature, I dedicate them all to Narayana – meaning, I dedicate them to the joy of others.


Saint Tukaram, through his abhangas (devotional verses), emphasized how service to humanity is the true essence of devotion.


In our current life, we only experience our body, mind, and emotions. The way our life unfolds through these elements requires energy. Without energy, no action is possible. Every action in this universe is an expression of energy. The universe is filled with consciousness. Saint Dnyaneshwar said:

"Chaitanya ase sarvagata" – meaning, consciousness pervades everything. Connecting wholly with this consciousness is Bhakti.


The body, mind, emotions, and energy are the four real aspects of human life. Whatever we want to do in life must exist on these four levels – and indeed, it does.


When we try to connect with the Supreme using the body and physical actions, it is called Karma Yoga or the path of action.

When we try to connect with the Supreme using the mind and emotions, it is called Bhakti Yoga or the path of devotion.

When we try to connect with the Supreme using intellect, it is called Jnana Yoga or the path of knowledge.

When we try to connect through transformation of energy, it is called Raja Yoga or Kriya Yoga.


What is Bhakti Yoga?


There was a time in the human journey when emotions were the most dominant and influential aspect of life. Emotions held a prime place in human affairs. Even today, in the age of science, emotions remain the most intense aspect of our personal lives. Most personal decisions and actions are still emotionally driven.


Most people's physical bodies are not capable of functioning at the highest intensity. To keep the body vibrant, a lot of effort is needed. We can make our minds intense, but very few can maintain that intensity. We lack mental stability. A stable mind is like a lake of joy. When it comes to energy and consciousness, most people are not intense at all. They only know momentary intensity, but not a sustained state of it.


However, emotions can be intensely powerful. People are intense either in love or in anger. Some can be intense only in certain emotions. Even if we can't deeply affect others with love or joy, we can easily do so through anger and cursing. Anger can become so intense that it can keep one awake all night. If you’re told to stay awake for a noble cause, you’ll sleep. But after a fight, you'll stay up all night. Angry people can’t sleep. So clearly, emotion has always been a dominant force in human life. Whether your life becomes a garden or a desert depends on your emotions.


Bhakti Yoga means

Harnessing the intensity of emotion


Emotion is something that manifests in various forms. It can take the most beautiful and wondrous shape, or it can become disgusting and terrifying. Training emotions to take a beautiful and joyful form is a skill – a sign of wisdom. And the right path for this is Bhakti Yoga.


Bhakti is a simple and effective way to transform our emotions from negativity to positivity, from sorrow to happiness and bliss. Look at people in love – they don’t care what’s happening in the world. Their behavior may seem irrational, but their emotions are blissful, and hence, their life feels beautiful. Here, love doesn’t mean physical love but pure, sattvic love that exists between friends, between a guru and disciple, between husband and wife, between parents and children. It is unconditional love, without any expectations – this is what is truly called bhava (deep emotion).


Without such selfless, unconditional love, real bhava cannot arise.

This highly loving emotional state is Bhakti – the highest form of love. A bhakta (devotee) exists in a constant state of love. In love, there is no question of expectation or reciprocation. Bhakti is pure devotion – there is no expectation of return. When there is no expectation, the whole experience becomes joyful. And then arises the state of:

"Anandache dohi anand tarang, anandachi anga anandache"

(A wave of joy in the ocean of joy, the body soaked in bliss)


Life becomes beautiful. This sweetness of life leads to human growth and elevation. Bhakti is a dimension of intelligence. Intelligence seeks power and control, while Bhakti simply accepts the truth. Bhakti is not something to be understood – it is something to be experienced. Intelligence can understand but not experience; Bhakti cannot be understood but can be experienced. One has to choose between intellect and Bhakti.


Bhakti: A vast, new perspective.


When someone is awed or inspired by a person or a phenomenon, they naturally become devoted to it. But this is where the real challenge begins – because Bhakti arises from emotion, not from intellect. The intellect has no role here. The boundary between Bhakti and deception can become very thin. Many realize this only later. We often hear of incidents where people fall into illusions due to emotional influence. While you cannot practice Bhakti directly, there are certain things you can do to reach Bhakti.


If you recognize one simple truth, you will naturally become a devotee. And that truth is this universe. This universe is vast. It is immense. We don’t know where it begins or ends. There are countless Brahmandas (cosmic universes) in existence. Here, crore (koṭi) doesn't just mean a number but type – meaning infinite varieties. There are billions of galaxies in the cosmos. Our own galaxy is just a tiny part of the solar system. If, for some reason, the solar system were to be destroyed tomorrow, it wouldn't even be noticed by the universe.


And in this grand expanse of creation, our Earth is like a mere speck of dust. And in that speck called the solar system.

In that solar system, there is one small dot – the planet Earth.

In that Earth, there is one continent called Asia.

In Asia, there is one small country – India.

In India, there is one small state – Maharashtra.

In Maharashtra, there is one city – Mumbai.

In Mumbai, there is a locality – say, Dadar.

In Dadar, there is one small building – say, XYZ.

In that building, there is one flat – say, No. 204.

In that flat, there is one room.

And in that room, you are standing.

And in that speck, you are just a dot.


In this vast creation, you are nothing – zero.


If this becomes your experience, you become a devotee.


Then your ego melts.

You bow down to the vastness.

You become capable of devotion.


This is called Bhakti Yoga.


When devotion arises,

Life transforms.

Emotions no longer run after likes and dislikes.

The mind becomes still.

Ego dissolves.

And you merge into the vastness.


Then what remains is bliss… peace… completeness…

You see God in everyone.


This is Bhakti Yoga.


Not ritualistic, but full of love.

Not binding, but liberating.

Not seeking, but becoming.

Not searching, but realising.


This is Bhakti Yoga.


श्रद्धावान लभते ज्ञानम्…

The faithful one attains knowledge…


Victory to the True Master!


- Jayant Joshi

Jeevanvidya Mission

 
 
 

Recent Posts

See All
स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना* *चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे ll* माणसाच आयुष्यमान - जीवन किती ? सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणूस एक दिवस...

 
 
 
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page