*निद्रा आराधना*
आज 14 मार्च. आज जागतिक झोप दिवस.
भारतीय वैद्यकशास्त्र सुदृढ आरोग्याचे लक्षण सांगताना म्हणते की, सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजे तवाने वाटते की अजून झोपावेसे वाटते. जर तुम्हाला ताजेतवाने वाटत असेल तर तुम्ही आरोग्यवान आहात आणि जर तुम्हाला अजून झोपावे असे वाटत असेल तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ठीक नाही.
यावर्षीच्या
*जागतिक झोप* दिवसाची थीम आहे झोपेच्या आरोग्यास प्राधान्य देणे आणि झोपेच्या आरोग्याबद्दल आणि झोपेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करणे.
चांगल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आणि जीवनाचा दर्जा चांगला राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप आवश्यक आहे. अपुरी झोप किंवा झोप न येणे ही आजच्या काळातील एक व्यापक आणि प्रमुख समस्या आहे.
जागतिक झोप दिनाच्या निमित्ताने भारतातील झोपेच्या पद्धतीवर आणि परिस्थितीवर नुकताच एक सर्वे करण्यात आला या सर्वेत असं आढळून आलं की 59% भारतीय सहा तासापेक्षा कमी अखंड झोपू शकतात.
भारतातील एका अग्रगण्य कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ४० हजार पेक्षा जास्त लोकांचा सर्वे केला ज्यात ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिला होत्या.
कमी झोप असण्याची अनेक कारणे आहेत परंतु त्यातील काही प्रमुख कारणे म्हणजे स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी उठणे, रात्री उशिरापर्यंतचे किंवा पहाटेचे कामाचे वेळापत्रक, बाह्य आवाज आणि अगदी डासांचा त्रास ही आहेत.
केवळ २ टक्के लोकच आठ ते दहा तास झोप घेण्यास सक्षम आहेत, तर २० टक्के लोक केवळ चार तास झोप घेतात.
*हे निष्कर्ष खरोखरच*
*चिंताजनक आहेत.*
का बर असं होत असावं?
सद्गुरु म्हणतात, निद्रा आणि जागृती या दोन्ही गोष्टी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत आणि त्या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत.
आजचे जीवनाचे चक्रच बदललेले आहे. आज सामान्यपणे रात्री ११च्या आधी कोणीच झोपत नाही. अनेक लोक असे आहेत की जे क्वचितच उगवता सूर्य कधीतरी बघतात.
आयुर्वेद चांगल्या आरोग्याची लक्षणे सांगताना विचारते,
१. रात्री दहा वाजता झोप येते का?
२. सकाळी ६ वाजता जाग येते का?
३. दुपारी १२ वाजता भूक लागते का?
का बरं वेळ महत्त्वाची आहे?
तर आपल्या शरीराची सर्व कार्ये ही बॉडी क्लॉक नुसार चालतात. ज्याला Circadian Clock किंवा Circadian Oscillator म्हणजेच जैविक घड्याळ म्हणतात. शरीरांतर्गत महत्त्वाच्या अवयवांचे कार्य या घड्याळानुसार चालते. रात्री दहा ते दोन या वेळात शरीरात Repair, Reset आणि Regeneration चे कार्य होते. आणि हीच आपली खरं म्हटलं तर गाढ झोपेची वेळ असते.
तुम्ही कधी विचार केला आहे का? की हृदयविकाराचा झटका बहुतांश वेळी पहाटेच का येतो? कारण रात्री दोन ते सकाळी सहा ही वेळ हृदयाची जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कार्य करण्याची वेळ असते.ही वेळ ही Rapid eye movement sleep असते REM and Non REM म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे आपण पुढे केव्हा तरी समजावून घेऊ.
हे Biological Clock म्हणजे शरीरांतर्गत घड्याळ हे २४ तासाच्या चक्रातील आपली झोप, जागृती आणि इतर शारीरिक कार्ये नियंत्रित करते. या घड्याळाचे कार्य हे प्रकाशावर चालते.
"लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे" अशी एक जुन्या काळातील म्हण आहे.
जुन्या काळातील लोक असेही म्हणत, रात्रीच्या पहिल्या प्रहारी सगळेच जागे असतात तर दुसऱ्या प्रहारी भोगी जागे असतात तिसऱ्या प्रहारी रोगी जागे असतात आणि चौथ्या प्रहारी योगी जागे असतात. आपण कोणत्या वर्गात मोडायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. कारण सद्गुरु म्हणतात,
*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.*
पुरेशी झोप म्हणजे किती!
प्रत्येक वयोगटाप्रमाणे हा कालावधी बदलतो. साधारणपणे सर्वसामान्य माणसाला चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने सात ते नऊ तास चांगली झोप असली पाहिजे.
झोपण्याची दिशा कोणती असावी?
आपण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहतो. आपल्याकडे पूर्वापार समज आहे की उत्तरेला डोके करून म्हणजेच दक्षिणेला पाय करून झोपू नये. याला विज्ञानही मान्यता देते. झोपण्यासाठी पूर्व पश्चिम अथवा पश्चिम पूर्व या सर्वात चांगल्या दिशा असल्या तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीचा विचार करता किमान दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये एवढे तरी पाळावे.
चांगली गाढ झोप यावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना:
१. रात्रीची झोपेची वेळ आणि संध्याकाळचे जेवण यात कमीत कमी तीन तासाचे अंतर असावे. रात्रीच्या जेवणात शक्यतो तळलेले मसालेदार पदार्थ टाळावेत.
२. झोपण्यापूर्वी एक तास सर्व प्रकारच्या स्क्रीनस पासून दूर राहावे.
३. जमल्यास रात्री वाचन करणे चांगले.
४. झोपण्यापूर्वी चार तास कोणतेही उत्तेजक पेय घेऊ नये.
५. नियमित व्यायाम करावा. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली अवश्य करावी.
६. चालणे हा सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.
७. व्यसनांपासून दूर राहावे.
८. झोपण्याची खोली हवेशीर असावी. खोलीतील सर्व प्रकारचे लाईट्स झोपण्यापूर्वी बंद करावेत.
९. झोपण्याच्या खोलीत पूर्ण अंधार असावा.
१०. विचार थांबल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून झोपण्यापूर्वी 108 वेळा विश्वप्रार्थना निश्चयाने नियमित म्हणावी.
चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. आरोग्य आणि झोप यांचा घनिष्ठ संबंध आहे. विचार करा आणि आपली जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा.
*आपले आरोग्य*
*आपल्याच हाती आहे.*
धन्यवाद.
सद्गुरुनाथ महाराज की जय.
Jayant Joshi
Jeevanvidya Mission
Worship of Sleep
Today is March 14, the World Sleep Day.
Indian medicine defines a key indicator of good health: When you wake up in the morning, do you feel fresh and energized, or do you feel like sleeping more? If you feel refreshed, you are healthy. If you feel like sleeping more, your physical and mental health may not be in good condition.
This year's World Sleep Day theme focuses on prioritizing sleep health and raising awareness about its importance.
Adequate and good-quality sleep is essential for maintaining both physical and mental health, as well as improving the quality of life. However, insufficient sleep or sleep disorders have become widespread and significant problems in today's world.
Survey on Sleep Habits in India
A recent survey conducted in India regarding sleep patterns revealed that 59% of Indians sleep for less than six uninterrupted hours.
A leading community social media platform surveyed over 40,000 people, comprising 61% men and 39% women.
Several factors contribute to insufficient sleep, including:
Waking up to use the restroom
Late-night or early-morning work schedules
External noise
Even mosquito disturbances
Only 2% of people manage to get 8 to 10 hours of sleep, while 20% sleep for just 4 hours.
These findings are truly alarming.
Why is this happening?
Sadhguru explains that both sleep and wakefulness are essential for human life, and they complement and nourish each other.
The modern lifestyle has significantly altered sleep cycles. Today, most people do not sleep before 11 PM, and many rarely witness the rising sun.
Ayurveda's Indicators of Good Health
Ayurveda defines good health by asking three questions:
1. Do you feel sleepy around 10 PM?
2. Do you wake up naturally around 6 AM?
3. Do you feel hungry around 12 noon?
Why is sleep timing important?
Our body's functions follow a biological clock, also known as the circadian clock or circadian oscillator. This internal clock regulates sleep, wakefulness, and vital bodily functions.
Between 10 PM and 2 AM, the body undergoes repair, reset, and regeneration—making this period the most crucial for deep sleep.
Have you ever wondered why heart attacks often occur in the early morning? Between 2 AM and 6 AM, the heart works at peak efficiency, coinciding with the REM (Rapid Eye Movement) sleep cycle. Understanding REM and Non-REM sleep is crucial, but we will discuss that another time.
This biological clock governs our 24-hour sleep-wake cycle and is primarily influenced by light exposure.
An old saying goes:
"Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy, and wise."
Ancient wisdom also categorizes sleep patterns as follows:
First quarter of the night – Everyone is awake
Second quarter – Pleasure-seekers stay awake
Third quarter – The sick remain awake
Fourth quarter – The yogis are awake
It is up to each individual to decide which category they belong to. As Sadhguru says:
"You are the architect of your own life."
How much sleep is enough?
The required sleep duration varies by age, but generally, an adult needs 7 to 9 hours of quality sleep for good health.
Best Sleeping Direction
Since we live in the Northern Hemisphere, traditional wisdom advises against sleeping with your head pointing north and feet pointing south. Science supports this belief.
The best sleeping directions are east-west or west-east. However, given modern apartment living, at the very least, avoid sleeping with your feet pointing south.
Tips for Deep and Restful Sleep
1. Maintain a gap of at least 3 hours between dinner and bedtime. Avoid spicy and fried foods at night.
2. Avoid screens (phones, TVs, computers) at least one hour before bed.
3. Reading before bed can be beneficial.
4. Avoid stimulants (like caffeine) four hours before sleeping.
5. Exercise regularly, and take a short walk after dinner.
6. Walking is one of the best exercises.
7. Avoid addictions like alcohol and smoking.
8. Ensure your bedroom is well-ventilated, and turn off all lights before sleeping.
9. Sleep in complete darkness for deeper rest.
10. Calm your mind before sleeping. Reciting a universal prayer 108 times with focus can help.
Final Thoughts
Good sleep is essential for both physical and mental well-being. There is a strong connection between health and sleep.
Think about it and try to change your lifestyle!
Your health is in your hands.
Thank you.
Sadhguru Nath Maharaj Ki Jai!
— Jayant Joshi
Jeevanvidya Mission
Comentarios