top of page

नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात

म्हणतात,

नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे नाम घेते म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनात सतत भगवंताचे स्मरण असते त्या व्यक्तीच्या जीवनात लक्ष्मीवल्लभ म्हणजे नारायण सतत सोबत असतात. पर्यायाने त्या व्यक्तीच्या जीवनात कायम समृद्धी असते आणि त्यामुळे त्याचे जीवन सतत आनंदाचे आणि सुखाचे असते.


हा झाला या अभंगाचा शब्दार्थ. परंतु याचा गुह्यार्थ

लक्षात घेतला तर असं लक्षात येईल की, कोणतेही कर्म करत असताना ते कर्म हे देवस्वरूपच आहे असे समजून कर्म *नित्यनेमाने* केले तर त्या कर्मात समर्पणाचा भाव दृढ होतो. त्यामुळे कर्मात एकाग्रता येते. आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक विचार व सकारात्मक कृती घडून निस्वार्थ कर्म होते. कर्माचा अहंकार निर्माण होत नाही त्यामुळे कर्माची शुद्धता टिकून राहते व त्यामुळे त्या कर्माच्या फळाविषयी मनात आसक्ती निर्माण होत नाही व हाती घेतलेल्या कामात संपूर्ण यश प्राप्त होते.


येथे *नित्यनेमाने कर्म करणे* हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नित्यनेमाने जे काही कर्म आपण करतो त्याचा आपल्या अंतर्मनात ठसा तयार होतो ज्याला आपण अंतर्मनाचा पॅटर्न म्हणतो. हा अंतर्मनाचा पॅटर्न म्हणजे आपल्या सवयी. आपले बाह्यमन म्हणजे जागरूक मन हे आपल्या जीवनातील केवळ ५% घटनांना प्रतिसाद देत असते ९५% वेळा आपले जागृत मन हे भूतकाळात आणि भविष्यकाळातच रममाण असते, आणि अशावेळी ऑटो पायलट पद्धतीने आपले अंतर्मनच कार्य करते. आणि त्या कार्याच्या पाठीमागे पूर्वानुभव आणि सवयींचा भाग असतो. अंतर्मन हे केवळ वर्तमानतच कार्य करते ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवली पाहिजे. माईंडफुलनेस म्हणजे वर्तमानात जागृत असणे होय.


नित्यनेमाच्या कर्मातून सवयी निर्माण होतात हे आपल्या पूर्वजांना ऋषीमुनींच्या तत्त्वज्ञानातून आणि शिकवणुकीतून पक्के माहीत झालेले होते. म्हणून आपल्या पूर्वजांनी आपल्या जीवनशैलीत नित्यनेमाला सर्वोच्च स्थान दिलेले होते. नित्यनेम पाळायचा तर अंगी शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे.


*खालील गोष्टीचे मनन*

*चिंतन करा.*


*३०० पेक्षाही जास्त*

*शोधांना प्रेरणा देणारा*

*अद्भुत विधी*


आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक जणच निकोला टेस्ला यांना ओळखत असणार. इलेक्ट्रिसिटीच्या प्रांतात अभूतपूर्व कार्य करणारी व्यक्ती म्हणजे निकोला टेस्टला. असं असलं तरी मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला कोणालाही या व्यक्तीच्या अभूतपूर्व यशाच्या पाठीमागे प्रेरणा देणाऱ्या अद्भुत विधी विषयी माहिती नसणार.


रात्री उशिराची वेळ आहे, आणि एक तेजस्वी

शोधकर्ता झोपण्याची तयारी करत आहे. पण झोपण्या पूर्वी तो एक विचित्र वाटेल अशी गोष्ट करतो. तो अनवाणी पायाने उभा राहतो, डोळे मिटतो आणि पायाची बोटे दाबायला लागतो. फक्त एकदा दोनदा नव्हे तर प्रत्येक पायाची १००/१०० वेळा. आहे ना अद्भुत विधी.


निकोला टेस्टला यांनी हा विचित्र वाटणारा विधी नित्यनेमाने करण्याची शपथच घेतलेली होती. टेस्ला यांचा असा दृढ विश्वास होता की या साध्या सोप्या कृतीमुळे त्यांच्या मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात आणि मन तीक्ष्ण राहते आणि त्यांची सर्जनशीलता प्रवाहित राहते. प्रत्येक रात्री न चुकता टेस्ला हा विधी पार पाडत असत.


निकोला टेस्टला यांच्या जीवनात सातत्यपूर्ण दिनचर्यैला खूपच महत्त्व होते. काळजीपूर्वक रोज वेळेवर जेवण करण्यापासून ते दैनंदिन पायी फिरण्यापर्यंत प्रत्येक काम टेस्टला शक्यतो घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे करण्याची कोशिश करीत.


या सगळ्या दैनंदिन नित्यनेमाने कर्म करण्याचा परिणाम म्हणजे या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने 300 पेक्षा जास्त शोधांचे पेटंट घेतले आणि आधुनिक जगाला उपकार ठरलेल्या विद्युत जगाची पायाभरणी केली. आज आपण सुखनैव आधुनिक जगातील सुख-सुविधा, आनंद उपभोगत आहोत ही निकोला टेस्टला यांची देणगी आहे.


*निकोला टेस्टला यांची*

*थोडक्यात माहिती:*


१. निकोला टेस्टला यांचा जन्म १० जुलै १८५६ रोजी एका विजांच्या कडकडातील वादळात झाला. त्यावेळी तेथील एका प्रसुती सेविकेने याला अपशकुन म्हटले. पण टेस्लाच्या आईने सांगितले, "तो प्रकाशाचा म्हणजेच ऊर्जेचा मुलगा असेल" तेच पुढे वास्तवात आले.


२. दूरदृष्टी: सन १९०१ मध्ये म्हणजे जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी टेस्लाने वायरलेस कम्युनिकेशन आणि स्मार्टफोन सारख्या तंत्रज्ञानाची कल्पना केली होती.


३. कर्मनिष्ठा: टेस्ला हे अत्यंत कर्मनिष्ठ होते. आपल्या शोध कार्यात विवाह हा आपल्या सर्जनशीलतेला अडथळा ठरेल असे वाटल्याने त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

४. पक्षांबद्दल प्रेम: आयुष्याच्या उत्तरार्धात टेस्टला यांना कबुतरांविषयी विशेष प्रेम होते. ते जखमी कबुतरांची काळजी घेत.


५. टेस्ला कॉइल: त्यांनी टेस्टला कॉइलचा शोध लावला, जो आजही रेडिओ तंत्रज्ञानासाठी वापरला जातो.


निकोला टेस्ला हे बुद्धिमत्ता, विचित्रता आणि शोधांच्या मिश्रणाने भरलेले व्यक्तिमत्व होते.


*निकोला टेस्ला यांच्या जीवन गाथेवरून आम्ही काय शिकले पाहिजे.*


१. मला काही तुम्हाला असे सुचवायचे नाही की तुम्ही आजपासून रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायाची बोटे १००/ १०० वेळा दाबा. आणि हो, जर तुम्हाला त्यात काही तथ्य वाटत असेल तर तसं करायला देखील काहीच हरकत नाही. मला तुमच्या एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की नित्यनेमाने आपण एखादी चांगली गोष्ट करत राहिलो तर त्याचे आपल्या सवयीत रुपांतर होते. अंतर्मनाचा विशिष्ट पॅटर्न तयार होतो, जो तुमच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतो. चांगल्या सवयी नित्यनेमाने करा, त्या आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा. स्वतःची काळजी घेणाऱ्या छोट्या छोट्या कृती नित्यनेमाने केल्या तर जीवनात त्या कृती प्रचंड सकारात्मक शक्ती निर्माण करतात.


२. आपले जीवन म्हणजे जबाबदाऱ्या आणि कामे पूर्ण करण्याची डेडलाईन यांचे चक्रीवादळ आहे. या गोंधळात आपल्या स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या छोट्या गोष्टींच्या सवयीतूनच जीवनात मोठे यश मिळते हे लक्षात ठेवा. नित्यनेमाने चांगल्या गोष्टी करण्यावर भर द्या. शिस्त पाळा.


३. आपण गोष्टी पुढे ढकलण्यात धन्यता मानतो. हे नेहमीचच आहे. बघा, कोणतीही एखादी आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट करायची असेल तर आपण म्हणतो एकदा हा प्रोजेक्ट पूर्ण झाला की आपण व्यायामाला, योगाला किंवा फिरायला जाण्याची सुरुवात करू. अशी वेळ कधीच येत नाही की, आपल्या सर्व व्यावहारिक गोष्टींची पूर्तता झाली आहे आणि आपण निवांत झालो आहोत. हे सर्व मिथक आहे. जीवन आपल्यासाठी थांबत नाही. आपण चांगल्या गोष्टी करण्यासाठी वेळ देण्याऐवजी योग्य वेळेची वाट पाहत बसतो जी कधीच येत नाही. आपल्याकडे वेळ फार थोडा आहे. तेव्हा चांगली गोष्ट करण्यासाठी वेळ शोधत बसू नका. आत्ता या क्षणी सुरू करा. *देवाचीया द्वारी उभा क्षणभरी* तो क्षण म्हणजे आत्ताचा क्षण. भविष्याची चिंता करण्यात आणि भूतकाळाचे चिंतन करण्यात वर्तमानाचा क्षण हातातून निसटून जाऊ देऊ नका.


कायं पटतय का? मी काय म्हणतोय ते ... ...


मग काय करायचं?

याचे उत्तर सोप आहे.

छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. खरंच अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून.

१. स्वतःची काळजी घेण्याची एक छोटीशी कृती निवडा आणि काही झाले तरी ती दररोज करा. लक्षात ठेवा सातत्य महत्वाचे आहे. नित्यनेमनामी व्हा.

२. ती गोष्ट कोणतीही असू शकेल. कदाचित रोज पाच मिनिटे दीर्घ श्वास घेणे, २ सूर्यनमस्कार घालणे, सकाळी उठल्याबरोबर ताण देण्याचा व्यायाम करणे, रात्री झोपण्यापूर्वी शतपावली करणे. छोटी गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका. परिणाम मोठा होतो हे लक्षात ठेवा. कारण ही नकळत क्रांती होत असते.

३. रामदास स्वामी म्हणतात दिसामाजी काहीतरी लिहीत जावे. पाच ओळीतरी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिण्याची सवय लावा. कृतज्ञता जर्नल लिहा. कृतज्ञता भाव वाढीस लागेल.

४. काहीही करा. तुम्ही काय करता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती नियमितपणे सातत्याने गोष्टी करता ते महत्त्वाचे आहे. "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे."

५. यामुळे तुमच्या आत्मविश्वासाची आणि स्वाभिमानाची पायाभरणी होते. जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेले वचन पाळता तेव्हा तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करता. ही तुम्हीच तुमचे शिल्प घडविण्याची सुरुवात असते.


जेव्हा आपण नियमितपणा अंगीकारतो तेव्हा हळूहळू आपल्या प्रगतीला सुरुवात होते. पाच मिनिटाचा दीर्घ श्वसनाचा सराव हळूहळू पूर्ण ध्यान सत्रात बदलू शकतो. दोन सूर्यनमस्कार हळूहळू बारापर्यंत कसे पोहोचले ते आपल्या लक्षातही येणार नाही. पाच मिनिटांचा स्ट्रेचिंग चा व्यायाम पूर्ण योगाभ्यासात रूपांतरीत होईल. हळूहळू या सर्व गोष्टी तुमच्या जीवनशैलीचा भाग बनतील, ज्याने तुमचे जीवन समृद्ध होईल. कधी कधी आपल्याला आपली प्रगती संथ होत असल्याचे जाणवेल तरी सातत्य ठेवा. ही तुमची तुमच्या कल्याणकारी जीवनासाठी गुंतवणूक आहे. गुंतवणुकीवरील चक्रवाढ व्याजाचा विचार करा. तुम्हाला पाॅवर ऑफ कंपाउंडिंग माहितीच असेल. खरी जादू ही काळाच्या ओघातच घडते. त्यासाठी सातत्य महत्वाचे आहे. जीवनाची चांगली उभारणी करणे हे काही एका किंवा दोन आठवड्याचे किंवा एक दोन महिन्याचे काम नाही. एक दोन आणि पाच वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा आपण किती प्रगती केली आहे हे बघून तुमचे तुम्हालाच आश्चर्य वाटेल. यासाठी तांत्रिकदृष्ट्या परिपूर्णतेची किंवा खूप काही मोठे करण्याची आवश्यकता नाही. केवळ रोजच्या रोज छोट्या छोट्या आणि अर्थपूर्ण गोष्टी करण्याशी याचा संबंध आहे. चमत्कार रात्रीतून होत नाहीत, आणि असे चमत्कार घडतील अशी अपेक्षा पण ठेवू नका. केवळ श्रद्धा आणि विश्वास ठेवून नित्यनेमाने गोष्टी करत रहा.


लक्षात ठेवा, तुम्ही केवळ या छोट्या छोट्या निरर्थक गोष्टी करत नाही आहात, तर तुम्ही तुमच्या मेंदूचे रिवायरींग करीत आहात. नवीन न्यूराल पाथवेज तयार करत आहात. ज्यायोगे न्यूनॉर्मल हे तुमच्या श्वासोच्छ्वासा इतके सहज घडणार आहे. तुम्ही कोण आहात हे तुमचा मेंदू काय आहे यावर ठरत असते.


एक ऊर्जावान, सर्जनशील, कल्याणकारी जीवनशिल्प घडविणे हे तुमच्याच हातात आहे. *तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार* लक्षात ठेवा, सातत्य हे प्रत्येक वेळी तीव्रतेवर मात करते.


धन्यवाद.

सदगुरुनाथ महाराज की जय


Jayant Joshi

जीवन विद्या मिशन


....


The Simple Way to Bring God into Your Life Daily"


---


What’s the one simple way to bring God into your life daily?


Do you know there’s a very simple way — one that requires no external resources, no spending, and no dependency on others — to truly bring God into your life?


That simple way is: Live every day with divine awareness.


That means:


Be aware of how you wake up.


Be aware of your breath, your thoughts, your words, your actions.


Be aware of your duties.


Be aware of what you eat, how you eat, how much you eat.


Be aware of what you’re saying, why you’re saying it.


Be aware of what you’re doing and how you’re doing it.



Even if you do just one task with full awareness, do it as a divine offering — it becomes worship in itself.


Saint Ramdas said:


> “The one who performs their worldly duties with full awareness — for them, even mundane work becomes spiritual practice.”





---


So how to start this awareness?


One simple tool is writing.


“Write something daily”

Even writing 5 lines a day in your own handwriting becomes a mirror of your self-awareness.

Because writing is a process that brings clarity to your thoughts, feelings, and intentions.


Want to take the first step?

Then do this:


Write daily what time you woke up and what your morning routine was.


What healthy thing did you do for your body, mind, and soul?


What was one beautiful or inspiring moment of your day?


What did you do that you’re proud of?


What did you learn today?


What will you do better tomorrow?



By doing this daily, you’ll start becoming your own observer.

You’ll start living consciously.

You’ll naturally begin to keep discipline in life.

And the inner joy that flows from this is priceless.



---


What will you get by doing all this?


You’ll begin to experience that the Divine is always with you.

Not outside of you, but within you.

In every breath, every heartbeat, every smile, every challenge — there will be a deep presence of divinity.


Then you’ll understand the essence of the abhang:


> "नाम घेता चित्त झाले प्रसन्न

हरपले हे तनु गेले मन्न

दाटून आले अंतःकरण

समाधान लाभले…"




("As I chanted the Divine Name, my heart felt serene,

The body vanished, the mind dissolved,

My inner being flooded with emotion—

And deep contentment was found…")



---


And so — to bring God into your life every day, just bring divine awareness into your everyday moments.

That’s enough.



 
 
 

Recent Posts

See All
स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना* *चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे ll* माणसाच आयुष्यमान - जीवन किती ? सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणूस एक दिवस...

 
 
 
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 

Comentarios


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page