top of page

ज्ञानं बंधनम / Knowledge is bondage

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

*"ज्ञानं बंधनम"*


*क्षणाक्षणाला शिकणे*

*या नावं शिक्षण*


सद्गुरु वामनराव पै म्हणतात,

*क्षणाक्षणाला शिकणे*

*म्हणजे शिक्षण*

प्रत्येक जण हा कायमच विद्यार्थी असतो. शिक्षणाला वयाची अट नाही. जीवनातील प्रत्येक क्षण,आपल्या संपर्कात आलेली प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही आपल्याला काही ना काही शिकवत असते. यासाठी मात्र प्रत्येक क्षणाला जागृत असणं महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक क्षणाला जागृत राहणं म्हणजेच वर्तमान काळात जगणे. भूत आणि भविष्य यांच्या चिंतेत आणि चिंतनात माणूस वर्तमान हरवून बसतो. जीवनाचा आनंद जीवनातील सुख हे केवळ आणि केवळ वर्तमानातच आहे. जर तुम्ही आत्ता या क्षणी सुखी आणि आनंदी नसाल, तर तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने सुखाची आणि आनंदाची अनुभूती घेऊ शकणार नाही आणि मग तुम्हाला सुखी आणि आनंदी करण्याचे सामर्थ्य ब्रह्मदेवातही नाही.


वास्तविक पाहता ज्ञानसागर हा अनंत आहे. या अनंत ज्ञानसागरातील फारच छोटासा टप्पा आम्ही पार केलेला असतो. आणि अस असलं तरी देखील तेवढ्यानेच मला सगळं काही समजतं असा खोटा अभिमान आमच्या ठायी निर्माण होतो, हाच आमच्या शिक्षणातील अडथळा ठरतो. म्हणूनच शिवसूत्रात म्हटलेलं आहे *ज्ञानं बंधनम*. माझं ज्ञान हेच माझ्या बंधनाचे कारण आहे. जोपर्यंत मला सर्वकाही समजतं असं आपण समजतो तोपर्यंत आम्ही नवीन काही शिकू शकत नाही. मला काहीही समजत नाही ही भावना असेल तरच आम्ही नवीन काही शिकू शकू. आणि नवीन काही शिकायचं असेल तर जीवनाकडे नव्याने पाहण्याची दृष्टी असली पाहिजे.


पंधराव्या शतकातील फ्लॉरेन्स मधील एका गजबजलेल्या कार्यशाळेत एक चाळिशी उलटलेला माणूस उभे राहून वितळलेले ब्रांझ साच्यात ओतणाऱ्या एका कुशल कारागिराकडे काळजीपूर्वक टक लावून पाहत आहे.


सन 1489 मध्ये लिओनार्दो याला ड्युक ऑफ मिलान साठी ब्रांझच्या घोड्याचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम मिळाले. पण लिओनार्दो पुढे एक छोटी समस्या होती त्याने यापूर्वी कधीही ब्रांझचे काम केलेले नव्हते. ब्रांझचे काम करण्याचे ज्ञान आणि कौशल्य त्याच्याजवळ नव्हते. अशा परिस्थितीत बहुतेक प्रस्थापित कलावंतांनी एकतर हे काम नाकारले असते किंवा कोणाची तरी मदत घेण्याचा अथवा इतर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता.


पण... ... लिओनार्दोने असं केलं नाही.


लिओनार्दो विंची हा पंधराव्या शतकातील बहुविद्या पारंगत कलाकार होता. तो चित्रकार, ड्राफ्ट्समन, अभियंता, शास्त्रज्ञ, सिद्धांतकार, शिल्पकार आणि वास्तु विशारद म्हणून सक्रिय होता. लिओनार्दो हा त्याच्या नोटबुक साठी देखील ओळखला जातो. ज्यात त्यांने शरीर रचना शास्त्र, खगोलशास्त्र, वनस्पतीशास्त्र, कार्टोग्राफी (Cartography is defined as the art, science and technology of making maps, plans, charts and other modes of graphical expression as well as their study and use. Thus, a cartographer is a person who makes maps. Cartographer typically do field work as they collect and verify data to create maps) चित्रकला आणि पुराविज्ञान यासह विविध विषयांवर रेखाचित्रे आणि नोट्स तयार केल्या आहेत.


मोनालिसाचे जगप्रसिद्ध पेंटिंग हे लिओनार्दी विंची यांचे जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग आहे.


असा हा लिओनार्दी याने आव्हान स्वीकारले आणि विलक्षण कृत्य केले. तो पुन्हा एकदा ॲप्रेंटिस बनला. वयाची 40 वर्षे उलटून गेलेली असताना. कल्पना करा, एक जगप्रसिद्ध चित्रकार आपल्या बाह्या सरसावून किशोरवयीन मुलांबरोबर नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.

अनेक महिने लिओनार्दोने ब्रांझ कास्टिंगच्या दुनियेत स्वतःला झोकून दिले. त्याने नवीन तंत्राचा अभ्यास केला, शिक्षकांना विविध प्रश्न विचारले आणि काम करताना चुकाही केल्या. पण प्रत्येक चुकीबरोबर तो अधिकाधिक शिकत गेला, प्रगल्भ होत गेला आणि कलेत विकसित होत गेला.


परिणाम... ...


राजकीय उलथापालथीमुळे हा महाकाय घोड्याचा पुतळा कधीच पूर्ण होऊ शकला नाही.‌ पण लिओनार्दीच्या नवशिक्षणाच्या इच्छेने त्याच्यात एक जबरदस्त बदल घडवून आणला. त्यांनी आपले हे धातुशास्त्राचे नवीन ज्ञान यांचा आपल्या चित्रांमध्ये, शिल्पांमध्ये आणि अगदी उडत्या यंत्रांच्या डिझाईन मध्ये उपयोग करायला सुरुवात केली. त्यांनी त्यांचे स्वतःचे असे एक नवीन तंत्र विकसित केले. नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची नम्र वृत्ती, नवीन शिकण्याची उमेद ही त्यांच्या प्रतिमेची अदृश्य प्रेरणा ठरली.


लिओनार्दोने एकदा असं लिहून ठेवलं की,

*"शिकण्याने मन कधीच थकत नाही."*


झटपट यशस्वी होण्याची वृत्ती आणि आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत हायलाईट होण्याची आकांक्षा यामुळे आपण नवशिक्या होण्याची कला गमावून बसलो आहोत. आम्ही रातोरात तज्ञ होण्याची आणि श्रीमंत होण्याची अपेक्षा करतो. आम्ही मूर्ख बनू या भीतीने आव्हानांपासून दूर राहतो. आम्ही आमच्या तुटपुंजा ज्ञानाला चिकटून राहतो, कारण आम्हाला अकार्यक्षम किंवा अज्ञानी दिसण्याची भीती वाटते.


हे सगळं आपल्याला परिचित वाटते ना? कदाचित आपण मूर्ख ठरू नये म्हणून नवीन कौशल्य शिकण्याचे धाडस करायला भीत असाल ना? कदाचित आपण जिथे आहोत तिथेच थांबायचे ठरविले असेल. कारण नवीन काहीतरी करणे, नवीन शिकणे हा विचार खूप कठीण आहे.


मी कोणीतरी बनण्याचा लोभ, इच्छा आणि मोह आणि मी कुणीही नाही याची भीती हीच जीवनाची खरी शोकांतिका आहे. GREED to become someone and FEAR of nobody is the real tragedy of our life.


नवीन शिकण्याची मानसिक भीती. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पराकाष्ठेच्या प्रयत्नांचा अभाव हेच आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रगतीपासून मागे खेचण्याचे प्रमुख कारण आहे. आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मध्येच अडकून राहतो. हा कम्फर्ट झोन सोडण्याची आमची मानसिक तयारीच होत नाही.


मग, यावर काही उपाय आहे की नाही?

हो निश्चितच उपाय आहे आणि

याचे उत्तर सोपे आहे. नवशिके व्हा. मानसिकता बदला. आव्हानांना सामोरे जा. नवशिके होणे म्हणजे मोकळेपणाची मानसिक वृत्ती. यासाठी पूर्वकल्पनांचा त्याग करणे आवश्यक आहे. सद्गुरु म्हणतात To Learn new, you must unlearn previous learning and you should relearn.

आधीची गिचमीडीत लिहून भरलेली पाटी कोरी केल्याशिवाय नव्याने त्या पाटीवर काहीही लिहिता येणे शक्य नाही. आपली पाटी कोरी करा आणि नेटाने नवीन लिहिण्यास सुरुवात करा.


आता तुमच्या मनात विचार येत असेल हे कसे करायचे?

तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक युक्ती आहे. जी एक अनोखा दृष्टिकोन विकसित करेल. आणि ती आहे गेम म्हणजेच खेळ खेळणे. होय. खेळ. बोर्ड गेम्स, व्हिडिओ गेम्स, कोणताही खेळ त्याने काही फरक पडत नाही. अट मात्र एकच तो खेळ तुम्ही यापूर्वी कधीही खेळलेला नसला पाहिजे.


ही युक्ती कसे कार्य करते :

१. असा खेळ निवडा जो तुम्ही यापूर्वी कधीही खेळलेला नसेल. जेवढा अपरिचित गेम असेल तेवढे चांगले.

२. खेळाचे नियम अगोदर वाचू नका. कोऱ्या मनाने सामोरे जा.

३. ज्याला त्या खेळाची चांगली जाण आहे त्याच्यासोबत खेळा.

४. प्रश्न विचारा. आपण मूर्ख तर वाटणार नाही ना याची चिंता करू नका.

५. आपल्या चुका स्वीकारा. आपल्या चुकांना हसा. चुकांमधून शिकत जा.

६. खेळ संपल्यावर आपल्याला कसं काहीच माहित नव्हतं. कसं काहीच येत नव्हतं यावर विचार करा.


यामुळे दोन गोष्टी साध्य होतील :

१. प्रथम म्हणजे आपण नवशिके आहोत हे मनाने स्वीकारले जाईल.

२. दुसरे म्हणजे नवीन काहीतरी शिकणे किती आनंददायी असते याची जाणीव होईल.


नवीन काहीतरी शिकण्याच्या मानसिकतेमुळे आपण यापूर्वी दुर्लक्षित केलेले तपशील लक्षात येण्यास सुरुवात होईल. यापूर्वी आपण कधीही जे प्रश्न विचारण्याचे धाडस केले नसते ते प्रश्न विचारायला सुरुवात कराल. आणि आपला आपल्याशीच एक नवा संबंध प्रस्थापित होईल. याहीपेक्षा तुम्हाला शिकण्याचा आनंद नव्याने गवसेल. नवशिक्या मानसिकतेमुळे तुम्हाला शिकण्याचा पुन्हा आनंद सापडेल आणि बालपणी नवीन काहीतरी शिकल्यामुळे आश्चर्याची आणि कुतूहलाची जी भावना निर्माण होत असे ती नव्याने उदयास येईल.


कोणत्याही क्षेत्रातील सर्वात यशस्वी व्यक्ती या सतत शिकत असतात आणि प्रगल्भ होत असतात. त्यांना जे माहित नाही ते माहीत नाही हे सत्य ते मान्य करतात. कारण त्यांना त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर विश्वास असतो. ही असते नवशिक्या मनाची शक्ती. हे काही अज्ञानी असल्याचे ढोंग करणे नाही तर नवीन शक्यता निर्माण करून प्रश्न विचारणे आणि प्रगल्भ आणि अधिक प्रगत होण्यासाठी मूर्ख म्हणून घेण्यास देखील तयार असण्याची मानसिकता तयार करणे आहे. ही जीवनाकडे नवीन दमाने पाहण्याची दृष्टी आहे. जीवनातील नवनवीन आश्चर्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे.


मला माहित आहे हे थोड अस्वस्थ करणारे आहे. कारण मला काही माहीत नाही हे स्वीकारणे अवघड आहे. तसेच शिकण्यासाठी मुर्खासारखे वाटणारे प्रश्न विचारणे आणि चारचौघात उघडपणे चुका करणे आणि त्या चुका मान्य करणे या सोप्या गोष्टी नाहीत. पण जेव्हा अशी अस्वस्थता निर्माण होते तेव्हाच तिथे प्रतिभेचा जन्म होतो आणि प्रगतीकडे वाटचाल सुरू होते.


तेव्हा आता जागे व्हा. पुढील आठवड्यात आपल्या जीवनातील एक असे क्षेत्र निवडा जिथे आपण निस्तब्ध झाला आहात. थबकला आहात. हतबल झाला आहात. असे एखादे कौशल्य असू शकते जे शिकण्याची आपल्याला नेहमीच इच्छा होती. असा एखादा नातेसंबंध असू शकतो किंवा आपण दुर्लक्ष केलेला एखादा छंद असू शकतो. नव मनाने त्याला सामोरे जा. कुतुहल बाळगा. प्रश्न विचारा. चुका करा.‌ पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवीन शिकण्याच्या प्रक्रियेचा मनापासून आनंद घ्या. लक्षात असू द्या, लिओनार्दो प्रतिभावंत गौरविलेला प्रसिद्ध कलाकार असून देखील त्याने नवीन शिकणे कधीच थांबवले नाही. लिओनार्दोला जगप्रसिद्ध बनविणाऱ्या कुतूहल आणि नाविन्याचा ध्यास या भावनांचा आम्ही देखील आमच्या जीवनाच्या यशस्वीतेसाठी उपयोग करू शकतो.

तर मग... काय आपण तयार आहात का? आपल्या अंतरंगातील लिओनार्दोला प्रकट करण्यास. हे आपल्या अंतरिक नवशक्तीला आलिंगन देणे आणि शाश्वत आनंदाचा शोध घेणे आहे.


धन्यवाद.

सद्गुरु नाथ महाराज की जय.


Jayant Joshi

Jeevanvidya Mission



"Knowledge is Bondage"


Learning Every Moment


This is Education


Sadguru Vamanrao Pai says,


"Learning every moment means education."


Everyone is always a student. There is no age restriction for learning. Every moment of life, every person we come into contact with, and every event that happens in our life teaches us something. However, it is important to remain aware of every moment. Staying aware of every moment means living in the present. People lose the present in the worries and thoughts of the past and future. The joy and happiness of life exist only in the present. If you are not happy and content at this very moment, you will never truly experience happiness and joy. Not even Lord Brahma can make you happy if you do not embrace happiness in the present.


In reality, the ocean of knowledge is infinite. We have only crossed a tiny part of this vast ocean. Despite this, we develop the false pride that we know everything, and this becomes a major obstacle to our learning. That is why the Shiva Sutras say, "Jnanam Bandhanam" – meaning "Knowledge is bondage." Our knowledge itself becomes the reason for our limitations. As long as we believe that we already understand everything, we cannot learn anything new. Only when we accept that we know nothing can we truly begin to learn. To learn something new, we must have a fresh perspective toward life.


In a busy workshop in 15th-century Florence, a middle-aged man stood watching intently as a skilled craftsman poured molten bronze into a mold.


In 1489, Leonardo da Vinci was assigned the task of creating a grand bronze statue of a horse for the Duke of Milan. However, Leonardo faced a challenge—he had never worked with bronze before. He had no prior knowledge or experience in bronze casting. In such a situation, most established artists would have either declined the work or sought assistance from someone else.


But Leonardo did neither.


Leonardo da Vinci was a polymath of the 15th century. He was active as a painter, draftsman, engineer, scientist, theorist, sculptor, and architect. He was also known for his notebooks, which contained drawings and notes on anatomy, astronomy, botany, cartography, painting, and paleontology.


His painting, Mona Lisa, is the most famous painting in the world.


Leonardo accepted the challenge and did something extraordinary—he became an apprentice once again, despite being over 40 years old. Imagine a world-renowned artist rolling up his sleeves and learning alongside teenage apprentices.


For months, Leonardo immersed himself in the world of bronze casting. He studied new techniques, asked countless questions to his teachers, and made mistakes along the way. But with each mistake, he learned, grew, and evolved as an artist.


The result?


Due to political upheavals, the grand horse statue was never completed. However, Leonardo's desire to learn transformed him. He applied his newfound knowledge of metallurgy to his paintings, sculptures, and even his designs for flying machines. He developed his own techniques. His humble approach to learning and his eagerness to face new challenges became the invisible force behind his creative genius.


Leonardo once wrote:


"Learning never exhausts the mind."


In today’s world of instant success and the urge to highlight ourselves on social media, we have lost the ability to be beginners. We expect to become experts and wealthy overnight. We avoid challenges because we fear looking foolish. We cling to our limited knowledge, afraid of appearing incompetent or ignorant.


Does this sound familiar?


Perhaps you hesitate to learn a new skill because you fear looking foolish. Maybe you have decided to stay where you are because learning something new seems too difficult.


The greed to become someone and the fear of being nobody—this is the real tragedy of our lives.


The fear of learning something new, the lack of effort required to do so—these are the main reasons holding us back from progress in life. We remain trapped in our comfort zones and are not mentally prepared to step out of them.


So, is there a solution to this?


Yes, there is!


And the answer is simple: Be a beginner. Change your mindset. Embrace challenges.


Being a beginner means having an open mind. It requires letting go of preconceived notions. Sadguru says:


"To learn something new, you must unlearn previous learning and relearn."


Just like you cannot write on a cluttered slate without erasing it first, you must clear your mental slate before learning something new.


Now, you might be wondering—how do I do this?


Here’s a trick for you. It will help you develop a unique perspective. And that is—playing a game. Yes, a game! It can be a board game, a video game, or any other game—it doesn’t matter. The only condition is that



 
 
 

Recent Posts

See All

होळी पौर्णिमा / Holi Purnima

*होळी पौर्णिमा* होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!! होळी हा सण पारंपारिक पद्धतीने भारताच्या सर्व प्रांतातच नव्हे तर सर्व...

जीवनशिल्प / Life Sculpting

*जीवनशिल्प* सद्गुरु म्हणतात, जीवन फार सुंदर आहे. पण हे जीवनाचे सुंदर शिल्प घडविण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणे जरुरीचे आहे. जीवन शिल्प...

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page