top of page

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी / A new perspective of life

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

*जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी*

सद्गुरूंनी 1981 मध्ये दृष्टी या ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ लिहिण्यामागे सद्गुरूंचा उद्देश आहे तो म्हणजे जीवनाकडे वेगळ्या म्हणजे नवीन दृष्टीने पाहता यावे, जीवनातील ताण तणाव कमी करण्याचा आणि मन आणि जीवन यावर प्रभुत्व मिळविण्याचा.

दृष्टी या ग्रंथात सद्गुरूंनी प्रापंचिक व पारमार्थिक विषयांकडे पाहण्याची नेमकी दृष्टी काय असली पाहिजे? याविषयी अनेक प्रकरणातून चर्चा केली आहे. सद्गुरूंना प्रापंचिक आणि परमार्थिक अशा दोन्ही विषयांच्या शिकवणुकीचे समृद्ध आत्मज्ञान आहे.


सद्गुरूंच्या ग्रंथरुपी उपस्थितीत आपल्याला जीवनाचे पुस्तक नव्याने उलगडत जाते. सद्गुरु आपल्याला केवळ एक मानवी प्राणी नव्हे तर एक अध्यात्मिक प्राणी बनविण्यासाठी मार्गदर्शन करतात. सद्गुरु म्हणतात, जीवन जगणे ही एक कला आहे. ही जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याची नवीन दृष्टी सद्गुरु आपल्याला देतात.


सद्गुरूंच्या अनेक ग्रंथांनी अनेकांना जीवन जगण्याचे नवीन मार्ग दाखविले आहेत.

दृष्टी या ग्रंथामुळे जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाल्याने आपले जीवनाविषयीचे जुने भ्रम दूर होण्यास मदत होते. हा ग्रंथ आपल्याला जीवन नव्याने उलगडण्याची जादुई चावी प्रदान करतो.


सद्गुरूंचा दृष्टी हा ग्रंथ आपल्याला जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्यास भाग पाडतो. स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव नाही तर बंधनासह स्वातंत्र्य म्हणजे सदाचार म्हणजेच पुण्य आणि बंधनाशिवाय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार म्हणजे पाप. सदाचाराने जीवन जगण्याची नवीन दृष्टी आपल्याला दृष्टी या ग्रंथामुळे प्राप्त होते.


सद्गुरु आपल्याला वर्तमानात जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याचा मार्ग दाखवितात. वर्तमान क्षणात जागरूक राहिल्याने आपल्या जीवनाला नवा आकार प्राप्त होतो. आनंदी जीवन जगण्यासाठी सद्गुरु आपल्याला शहाणपणाचा मार्ग दाखवितात. स्वतः आनंदाने जगून इतरांचे जीवन आनंदी करण्यासाठी सद्गुरु आपल्याला प्रोत्साहित करतात.


मानवी जीवन सर्वांगाने समृद्ध यशस्वी सुखी समाधानी व्हावे म्हणून सद्गुरूंनी जीवनभर सातत्याने, आत्मीयतेने, निरपक्षपणे समाज प्रबोधनाचे कार्य केले. या कार्याचा भाग म्हणून मानवाला अखंड मार्गदर्शनाकरता सद्गुरूंनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली.


सद्गुरु म्हणतात, ग्रंथाला मर्यादा असते. सर्वज्ञान ग्रंथरूपाने देता येत नाही. याकरिता ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. सद्गुरूंचे ग्रंथ हे जणू सूत्ररूपाने आहेत म्हणजेच सद्गुरूंचे ज्ञान ग्रंथामध्ये एकाग्र स्वरूपात म्हणजेच concentrated आहे. ते ज्ञान उलगडण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे.

सद्गुरु म्हणतात खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला शब्दार्थ भावार्थ,आणि गुह्यार्थ समजावून घेतला पाहिजे. सद्गुरु म्हणतात,तुम्हाला between the lines मला काय सांगावयाचे आहे ते समजले पाहिजे. त्यासाठी ग्रंथातील एकेक शब्दाची उकल करता आली पाहिजे.उकल केल्याशिवाय आकलन होणार नाही. आणि आकलन केल्याशिवाय आचरण होणार नाही. शब्दाची उकल करणे यासाठी मुळापासून अभ्यास केला पाहिजे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि त्या प्रश्नांना समर्पक उत्तरे शोधण्याचा तुमचे तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे.


सद्गुरूंच्या दृष्टी हा ग्रंथ हातात घेतल्यावर मला जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या मथळ्यातील पाहण्याची या शब्दाविषयी पहिला प्रश्न पडला. सद्गुरूंनी पाहण्याची हाच शब्द का वापरला?

सद्गुरु म्हणतात, या मी तुम्हाला परमेश्वर पाहायला शिकवतो. बुद्धांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे इहो पासीगो. या मी तुम्हाला पाहायला शिकवतो. भारतीय संस्कृतीत वेदांताला दुसरे नाव हे दर्शनशास्त्र आहे.


*पाहणे आणि बघणे यातील फरक.*


सामान्यता आपण व्यवहारात पाहणे आणि बघणे हे शब्द समान अर्थाने वापरतो. जसे इंग्रजीमध्ये look आणि See हे दोन्ही शब्द समान अर्थाने वापरले जातात.


आपण अनेक वेळा सहलीला जातो.कधी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी तर कधी धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी. त्यावेळी आपण त्या स्थळाला बघतो की पाहतो? विचार करा. आल्यानंतर कोणी आपल्याला त्याच स्थळाबद्दल काही विचारले तर आपण काय सांगतो. कल्पना करा, हिमाचल प्रदेशातील एका प्रसिद्ध निसर्ग चमत्कार असलेल्या ठिकाणी तुम्ही गेला आहात.जे राष्ट्रीय आकर्षण आहे. ज्या ठिकाणाला वर्षभरात लाखो लोक भेट देतात. तुम्ही आणि तुमचे मित्र त्या देखाव्याच्या काठावर उभे आहात. एकमेकांचे फोटो काढता, ग्रुप फोटो देखील काढता आणि पंधरा-वीस मिनिटातच कोणीतरी तुमच्यातील म्हणतो चला जाऊ या. आणि तुम्ही सगळेजण तिथून प्रस्थान करता. अद्भुत दृश्याचा नजारा पाहणे त्याचा मनमुरात आस्वाद घेण्याऐवजी तुम्ही इतरच गोष्टीत मग्न असता. मग मला सांगा तुम्ही बघितले की पाहिले? स्पष्टपणे सांगायचे तर तुम्ही ते निसर्गस्थळ बघितले पण पाहिले नाही. हो की नाही ?

आपण एखाद्या गोष्टीकडे खरोखरच किती वेळा बघतो पण प्रत्यक्षात पाहत नाही. उदाहरणार्थ आत्ता तुम्हाला विचारलं की तुमच्या मनगटावरील घड्याळाचे अंक रोमन लिपीत आहेत की इंग्रजीत आहेत ? तुमच्या शेजारी राहणाऱ्यांचा घराचा दरवाजा कोणत्या रंगाचा आहे? तर तुम्हाला चटकन याचे उत्तर देता येणार नाही. फक्त विचार करा. आपण कधी पाहिले आहे का? आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या जवळजवळ प्रत्येक गोष्टींबाबत अनभिज्ञ असतो, आपण बघतो पण पाहत नाही.

असं दिसून आला आहे की बघणे आणि पहाणे यातील फरक कधीकधी जीवघेणा ठरू शकतो.

लंडनमधील अभ्यासकांना असं आढळून आल आहे की पाच ते नऊ वयोगटातील मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे कारची धडक. या अभ्यासकांना असं दिसून आलं की, या मुलांना त्यांच्या दिशेने येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत. कारण या वयातील मुलांची आकलन क्षमता हळूहळू विकसित होत असते. ज्यामुळे येणारी कार ते बघतात पण पाहू शकत नाहीत. मुलांनी गाडी पाहणे म्हणजे वाहनाचा वेग, वाहनाचे आणि त्यांच्यामधील अंतर, रस्ता क्रॉस करण्यासाठी उपलब्ध असलेला वेळ या सर्वांची एकत्रितपणे सांगड घालणे. या प्रक्रियेत केवळ डोळ्यांचा समावेश नसतो तर इतर अनेक इंद्रिय एकाच वेळी एकत्रितपणे कार्य करतात तेव्हा आकलन होते.

बघणे आणि पाहणे याच्यातील फरक स्पष्टपणे समजण्यासाठी जादूगाराचे जादूचे प्रयोग हे उत्तम उदाहरण आहे. जादूगर आपल्यासमोरच प्रयोग करत असतो. पण जादू कशी घडली? हे आपल्या लक्षात येत नाही. कारण जादूगार बोलण्यातून, हातवारे करून, चतुराईने दिशाभूल करत आपले लक्ष विचलित करतो आणि नेमका पाहण्याचा क्षण आपण गमावतो. आपलाच मेंदू आपल्याला फसवतो. आपण प्रयोग बघतो पण पाहत नाही.


बघणे आणि पाहणे


मग बघणे आणि पाहणे यात काय फरक आहे?


वेबस्टर डिक्शनरी नुसार बघणे किंवा दिसणे याचा अर्थ नजर कोणाकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे वळविणे. परंतु पाहणे म्हणजे आपल्या डोळ्यांचा वापर करून एखाद्याची किंवा एखाद्या गोष्टीची जागरूकपणे नोंद घेणे. जागरूकता आवश्यक आहे. ही जागृती म्हणजे पाहण्यासाठी आवश्यक असलेल्या इंद्रियांची जागृती. ही एक अनुभवात्मक प्रक्रिया आहे. काही जणांसाठी ही प्रक्रिया नैसर्गिक असते. परंतु आपल्यापैकी बहुतेक लोकांसाठी हे कौशल्य असते. इतर अनेक गोष्टींमध्ये जसे आपण कौशल्य विकसित करतो तसेच पाहण्याचे देखील कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे.


बघणे ही सहज क्रिया आहे. मात्र पहाणे ही एक गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे. पाहणे म्हणजे केवळ एखादी गोष्ट लक्षात घेणे एवढेच मर्यादित नाही. सद्गुरूंनी येथे पाहणे हा शब्द आकलन या दृष्टीने म्हणजेच perceiving यादृष्टीने वापरलेला असावा. बघणे ही भौतिक रासायनिक प्रक्रियांची साखळी आहे जे आपले मेंदू सतत करत असतो. पण आकलन यात मेंदूला प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण करणे, त्या माहितीचे वर्गीकरण करणे, पूर्वी जी माहिती प्राप्त झाली व जी स्मृतीत साठवलेली आहे त्या माहितीशी नव्याने प्राप्त झालेल्या माहितीची तुलना करणे व नव्याने अर्थ लावणे अशा जटील क्रियांचा समावेश असतो. आणि यासाठी वेळ, संयम आणि तपशील या कडे लक्ष द्यावे लागते. या दृष्टीने आपण दृष्टी या ग्रंथातील प्रकरणांचा नव्याने अभ्यास केला पाहिजे.

कोणत्याही गोष्टीचे पूर्ण ज्ञान होण्यासाठी त्या गोष्टीच्या आकलनाचे म्हणजेच पाहण्याचे कृत्य समर्पकपणे होण्यासाठी आपणास पाहण्याची कला अवगत केली पाहिजे.


विचार करा. जेव्हा आपण एखादे चित्र प्रदर्शन पाहायला जातो तेव्हा त्या चित्रकृतींचे आपण किती वेळ निरीक्षण करतो. असे दिसून आले आहे की, जगप्रसिद्ध मोनालिसाचे पेंटिंग लोक जास्तीत जास्त पंधरा सेकंद बघतात. जगातल्या सर्वात प्रसिद्ध चित्राचे पंधरा सेकंदात काय अवलोकन होणार?

लक्षात घ्या, आपण केवळ आपल्या डोळ्यांनी पाहत नाही तर पाहण्याच्या क्रियेत आपले डोळे आणि मेंदू यांचा सक्रिय सहभाग असतो. जे बघितलं आहे त्याचा परिपूर्ण अर्थ लावण्यासाठी जेव्हा डोळे आणि मेंदू एकत्रितपणे कार्य करतात तेव्हा ते बघणे पाहणे होते.


आपण काय बघतो ते महत्त्वाचे नाही तर आपण काय पाहतो हे महत्त्वाचे आहे.


या सर्व विवेचनाचा आणि जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथाचा काय संबंध यावर विचार करा. आणि आपली मते नोंदवा. बघणे आणि पाहणे याची दैनंदिन वापरातील उदाहरणे द्या.


धन्यवाद


सद्गुरु नाथ महाराज की जय


Jayant Joshi,

Jeevanvidya Mission



A New Perspective on Life


In 1981, Sadguru wrote the book Drishti. The purpose behind writing this book was to help people see life from a different, new perspective, to reduce stress and tension in life, and to gain mastery over the mind and life itself.


In Drishti, Sadguru discusses through various chapters the precise perspective one should have on both worldly and spiritual matters. Sadguru possesses profound self-knowledge in both these areas.


Through the presence of Sadguru’s writings, the book of life unfolds before us in a new way. Sadguru guides us not just to be human beings but to become spiritual beings. Sadguru says that living life is an art, and through Drishti, he provides us with a new perspective on mastering this art.


Many of Sadguru’s books have shown people new ways of living. The book Drishti helps clear old illusions about life, giving us a magical key to unlock life anew.


Drishti compels us to look at life from a different perspective. Freedom is not the absence of restrictions; rather, freedom with discipline is virtue, while unrestricted freedom is recklessness, which leads to vice. Through Drishti, we acquire a new vision for a virtuous life.


Sadguru teaches us to enjoy the present moment fully. By being aware in the present, life takes on a new shape. To live a joyful life, Sadguru shows the path of wisdom. By living happily, he encourages us to spread happiness to others.


Throughout his life, Sadguru selflessly worked for the upliftment of society, ensuring that human life becomes successful, content, and fulfilled. As part of this mission, he wrote numerous books to provide continuous guidance to humanity.


Sadguru says that a book has its limits—it cannot contain all knowledge. Therefore, one must study books carefully. Sadguru’s writings are like condensed wisdom, requiring deep study to fully grasp their meaning.


Sadguru emphasizes that to truly gain knowledge, one must understand not just the literal meaning of words but also their deeper implications. He says that one must grasp the meaning "between the lines" and analyze each word carefully. Without analysis, there can be no understanding; without understanding, there can be no application in life. To truly grasp wisdom, one must study from the root, raise questions, and seek meaningful answers.


When I held Drishti in my hands, the first question that came to my mind was why Sadguru used the word "seeing" (pahanyachi) in the phrase "A New Perspective on Life."


Sadguru says, "I teach you how to see the Divine." A famous saying by Buddha is Ehipassiko, meaning, "Come, I will teach you how to see." In Indian philosophy, Vedanta is also known as Darshan Shastra—the science of seeing.


The Difference Between Seeing and Looking


In daily life, we often use the words "seeing" and "looking" interchangeably, just as "look" and "see" are used similarly in English.


We frequently go on trips—to historical places, religious sites, or natural wonders. But do we really see them, or do we just look at them? Think about it. When we return, if someone asks us about those places, how much detail can we provide?


Imagine you visit a famous natural wonder in Himachal Pradesh, a place that attracts millions of tourists every year. You and your friends stand near the scenic spot, take photos, capture group pictures, and within 15-20 minutes, someone says, "Let’s go," and you all leave. Instead of truly experiencing the breathtaking beauty, you remain preoccupied with other things. Now, tell me, did you see the place or just look at it? Clearly, you only looked at it but did not see it, right?


We often look at many things but rarely truly see them. For example, if I ask you right now whether the numbers on your wristwatch are in Roman or standard numerals, or what color your neighbor’s door is, would you be able to answer immediately? Most of us remain unaware of nearly everything happening around us. We look but do not see.


Sometimes, the difference between seeing and looking can even be life-threatening.


Researchers in London have found that the leading cause of death among children aged 5-9 is being hit by cars. The study revealed that these children do not see oncoming vehicles because their cognitive abilities are still developing. They may look at a car, but they do not see it in a way that helps them judge its speed, distance, and the time required to cross the road. Seeing is not just about using the eyes; it involves multiple senses working together for proper understanding.


A great example of the difference between seeing and looking is a magician’s tricks. The magician performs right in front of us, yet we fail to notice how the trick is done. Through speech, gestures, and distractions, the magician diverts our attention, making us miss the crucial moment of seeing. Our own brain deceives us. We look at the trick but do not see how it happens.


Seeing vs. Looking


So, what is the difference between looking and seeing?


According to Webster’s Dictionary, looking means directing one’s gaze at something, whereas seeing means noticing something with full awareness. Awareness is crucial. This awareness is the activation of sensory perception necessary for seeing. It is an experiential process.


For some, this process is natural, but for most of us, it is a skill that must be developed—just like we develop skills in other areas.


Looking is a simple action, but seeing is a complex process. Seeing is not just noticing something; it involves understanding (perceiving) what we observe. Looking is a series of physical and chemical processes in the brain, while seeing involves analyzing, categorizing, comparing with past memories, and deriving meaning. This requires time, patience, and attention to detail.


With this perspective, we must re-examine the chapters in Drishti.


To gain complete knowledge of anything, one must develop the skill of seeing rather than merely looking.


Think about it. When we visit an art exhibition, how much time do we spend observing each painting? Studies show that people look at the world-famous Mona Lisa painting for only about fifteen seconds. Can we truly appreciate the most famous painting in the world in just fifteen seconds?


Remember, we do not see with our eyes alone. The act of seeing involves active participation from both the eyes and the brain. When the brain works with the eyes to interpret what we look at, it becomes true seeing.


It is not just about what we look at—it is about what we truly see.


Reflect on this and consider how it relates to Drishti and its message about developing a new perspective on life. Share your thoughts and provide examples of seeing vs. looking in daily life.


Thank you.


Sadguru Nath Maharaj Ki Jai


Jayant Joshi,

Jeevanvidya Mission



 
 
 

Recent Posts

See All

होळी पौर्णिमा / Holi Purnima

*होळी पौर्णिमा* होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!! होळी हा सण पारंपारिक पद्धतीने भारताच्या सर्व प्रांतातच नव्हे तर सर्व...

जीवनशिल्प / Life Sculpting

*जीवनशिल्प* सद्गुरु म्हणतात, जीवन फार सुंदर आहे. पण हे जीवनाचे सुंदर शिल्प घडविण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणे जरुरीचे आहे. जीवन शिल्प...

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page