top of page

कृपा / Grace

Writer: ME Holistic CentreME Holistic Centre

सद्गुरु म्हणतात, कृपा म्हणजे काय? तर कृपा म्हणजे कर आणि पहा. कर म्हणजे जे सांगितले आहे त्याचं आचरण कर आणि मग पहा कृपा होते की नाही.

*भारतीय संस्कृतीतील देव देवता व उत्सव यांच्या पाठीमागील शास्त्र व विज्ञान*

भारतीय संस्कृतीत देवदेवता पुजा अर्चा यांना प्रचंड महत्त्व आहे. सद्गुरु म्हणतात देवपूजा करणे वाईट नाही परंतु अंधश्रद्धेने काहीतरी मिळविण्यासाठी केवळ नशिबावर अवलंबून राहून दैववादी बनणे याला सद्गुरूंचा विरोध आहे. सद्गुरु म्हणतात, भारतीयांना परकीय सत्तेच्या अंमलाखाली 1200 वर्षापेक्षा जास्त काळ राहावे लागले त्याचे कारण म्हणजे त्या काळातील माणसे ही दैववादी होती. सद्गुरु म्हणतात माणसाने प्रयत्नवादी असले पाहिजे.

भारतीय संस्कृतीत ऋषीमुनींनी फार चिंतन करून आपली जीवनशैली कशी असावी त्याचा आदर्श मार्ग ठरवून दिलेला आहे. योगीक जीवन पद्धती हीच खरी शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु योग म्हणजे केवळ आसने नव्हेत. ज्यावेळी योगाच्या अष्टांगाचा विचार करून जीवन आचरले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनयोग साधला जातो.

या जीवनशैलीचाच एक भाग म्हणजे पूजाअर्चा होय. रोज पूजा करणे हा जाणिवेला दैनंदिन जाणीवपूर्वक दिलेला शॉक होय. म्हणजे दिवसभराचे कार्य हे *स्मरणात* सुरळीतपणे चालू राहावे हा उद्देश होता.


देव देवतांचे मूर्ती चे स्वरूप, देवदैवतांचे आसन, त्यांची वाहने, आयुधे या प्रत्येकातून त्या त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये तर प्रतीत होतातच पण या प्रत्येकातून माणसाला जीवन उपयोगी संदेश दिलेला आहे. देवतांचे गुण आपल्या अंगी बाणावेत यासाठी देवतेची पूजा केली जाते. ज्यावेळी या उद्देशाने पूजा केली जाते तेव्हाच खऱ्या अर्थाने ते पूजन होते अन्यथा ते केवळ कर्मकांड होते आणि सद्गुरूंचा अशा कर्मकांडाला विरोध आहे.

भारत हा शेतीप्रधान देश होता व आहे. त्यामुळे भारतीय मानवी जीवनशैली ही शेतीवर आधारित होती. सर्व सणांची रचना ही शेतीच्या कामाच्या काळाशी निगडित आहे. पूर्वी तर भारत वर्षात 365 दिवस हे उत्सवाचे अथवा कोणत्या ना कोणत्या तरी सणांचे मानले जायचे. जसे, आपण आज वर्षभर कोणता ना कोणता डे साजरा करत असतो.


नुकतीच आपण महाशिवरात्र साजरी केली. थोड्याच दिवसात होलिका उत्सव येईल व लगेच पाडवा सण साजरा केला जाईल.

या प्रत्येक सणाच्या देवता वेगवेगळ्या आहेत. आज आपण महाशिवरात्र म्हणजेच शिवपार्वतीचा उत्सव साजरा करण्यामागे काय भूमिका आहे ते बघू .

महाशिवरात्रि विषयी आपण यापूर्वी स्वतंत्र लेखात चर्चा केलेली आहे. आज आपण *शिव* या देवतेचे आसन जे व्याघ्रासन यातून काय शिकवण दिलेली आहे ते बघू. ही शिकवण आपण अध्यात्मिक दृष्टीने न बघता व्यवहारात्मक दृष्टीने बघणार आहोत.

शिव हा व्याघ्रासनावर बसलेला आहे. वाघ हा प्रतिमात्मक आहे. वाघ हा नेहमी आक्रमक असतो. आपल्याला आपले अज्ञान नाहीसे करण्यासाठी देखील आक्रमक असले पाहिजे.

वाघाचे पहिले गुणवैशिष्ट्य म्हणजे त्याची नजर - विजन. जेव्हा वाघ एखादे हरीण शिकारीसाठी हेरतो, तेव्हा तो आपले संपूर्ण लक्ष त्या हरणावरच केंद्रित करतो. आक्रमण करतेवेळी जरी एखादे दुसरे हरिण त्याच्या जवळ आले तरी तो विचलित होत नाही. त्याची दृष्टी ही केवळ त्याच हरणावर असते ज्याची त्याने शिकार करावयाची ठरविलेले असते. इतर कोणताही प्राणी त्याचे लक्ष विचलित करू शकत नाही. आपण आपल्या जीवनाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले असताना इतर काही प्रलोभणे आली तर आपले लक्ष विचलित होते.

वाघापासून आपल्याला पहिली गोष्ट कोणती शिकली पाहिजे तर आपले आपल्या ध्येयावर संपूर्ण लक्ष पाहिजे. लक्षाप्रती आपण एकाग्र झाले पाहिजे.


आपण विचारांच्या दृष्टिकोनातून याकडे बघितले तर आपल्या असे लक्षात येईल की आपण एक विचार केला की तो विचार निश्चयापर्यंत येण्याआधी आपल्या मनात अनेक विचार येतात. आपले लक्ष मूळ विचारांपासून परावृत्त व्हायला लागते. आपण त्या मूळ विचारावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. विचाराला अनेक शाखा फुटतात परंतु आपण त्या शाखांच्या चक्रात अडकता कामा नये.

वाघाचे दुसरे गुणवैशिष्ट्य म्हणजे शक्ती. वाघाची शक्ती प्रचंड असते. आपल्यात बांधीलकीची शक्ती असली पाहिजे. We should have a power of commitment. जीवनाच्या कोणत्याही प्रांतात यशस्वी व्हायचे असेल तर बांधिलकी असली पाहिजे. आपण प्रयत्न भरपूर करू पण जर बांधीलकी नसेल तर ते प्रयत्न हे ढोर मेहनत होतात.


वाघाचे तिसरे गुणवैशिष्ट्य म्हणजे वेग गती. आपण देखील आपले ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या गतीचा सराव केला पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर जग ज्या गतीने चाललेले आहे त्या गतीशी आपली गती मिळतीजुळती असली पाहिजे.

संत कबीर म्हणतात,

कल करे सो आज कर, आज करे से अब,

पल मे प्रलय होयेगी

बहुरी करेगा कब.


कोणत्याही कामाला उद्यावर ढकलू नका. वेळच्या वेळी काम पूर्ण करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे.


वाघाचे चौथे गुणवैशिष्ट्य आहे रणनीती. आपल्याला सुद्धा जीवनातील ध्येय गाठण्यासाठी रणनीती आखणे आवश्यक असते. तुकाराम महाराज म्हणतात,

रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग.

जीवन हे एक युद्ध आहे आणि या युद्धात यशस्वी व्हायचे असेल तर रणनीती आवश्यक असते. सर्वात जास्त ताकदवान आपला शत्रू कोण असेल तर ते आहे आपले अज्ञान. अज्ञानाचा नाश करावयाचा तर ज्ञानी होणे आवश्यक आहे.रणनीती हा शब्द समजायला अवघड आहे त्याचा प्रतिशब्द म्हणजे स्ट्रॅटेजी.


वाघाचे पाचवे गुणवैशिष्ट्य म्हणजे कौशल्य skill. वाघाच्या गतीमध्ये, आक्रमणामध्ये, पवित्रा घेण्यामध्ये या सर्वांमध्ये विशेष कौशल्य असते. प्रत्येक प्राण्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य असते. जे त्या प्राण्यांसाठी जीवन जगायचे साधन असते. म्हणूनच योगासनात सगळी आसनं प्राणी किंवा निसर्गाच्या वर आधारित आहेत. जसे की, भुजंगासन, पर्वतासन, नौकासन, ताडासन, मच्छ्यासन,इत्यादी. कौशल्य मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. सद्गुरु म्हणतात,

जीवन जगणे ही एक कला आहे आणि कलेत प्राविण्य मिळवायचे असेल तर कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या युगात शांतपणे कोणताही ताण न घेता आपल्या लक्ष्याची पूर्तता करण्यासाठी कौशल्य असलेच पाहिजे.

तर ही आहेत वाघाची पाच गुणवैशिष्ट्ये :

१. दृष्टी, लक्ष, नजर Vision

२. शक्ती. Power

३. वेग गती Speed

४. रणनीती Strategy

५. कौशल्य Skill

जी आपल्या जीवनाचे ध्येयपूर्तीसाठी आवश्यक आहेत. आणि याचसाठी शिवाचे पूजन आणि ध्यान केले पाहिजे. म्हणजेच या गुणवैशिष्ट्यांचे ध्यान साधले पाहिजे.


*कर आणि पहा म्हणजे कृपा झाल्याशिवाय राहणार नाही*


धन्यवाद.

*सद्गुरु नाथ महाराज की जय*


जयंत जोशी

जीवन विद्या मिशन


.............


Grace


Sadguru says, what is grace? Grace means “do and see.” “Do” means to perform exactly what is advised, and then observe whether grace manifests.


The Science and Scriptures Behind the Deities and Festivals of Indian Culture


In Indian culture, the worship and rituals associated with deities hold immense importance. Sadguru explains that worshipping gods is not wrong; however, practicing blind superstition or relying solely on fate to obtain results—and thereby becoming fatalistic—is something he opposes. According to him, Indians had to live under foreign rule for more than 1200 years because the people of that era were fatalistic. Sadguru emphasizes that one must be proactive and industrious.


In our culture, sages and seers have given deep thought to determining the ideal way of life. The yogic lifestyle is the true key to maintaining good physical and mental health. Yet, yoga is not merely about performing postures. When life is practiced in accordance with the eight limbs of yoga, one truly engages in the yoga of living.


A part of this lifestyle is the practice of worship and rituals. Daily worship serves as a continuous reminder, keeping one mindful throughout the day. It ensures that all daily activities proceed smoothly and with awareness.


The forms of the deities—their images, thrones, vehicles, and weapons—not only reveal their unique qualities but also convey practical life messages. Deities are worshipped so that these qualities can be internalized. Only when worship is performed with this intent does it become true worship; otherwise, it remains a mere ritual, which Sadguru disapproves of.


India has always been, and continues to be, an agrarian country. Consequently, the Indian way of life is based on agriculture. Every festival is aligned with the agricultural calendar. In earlier times, all 365 days of the year were considered festive or marked by some celebration—just as today we find some day of the year being celebrated.


We have just celebrated Mahashivaratri. In a few days the Holika festival will arrive, followed immediately by the Padwa festival. Each festival is associated with a different deity. Today, let us examine the role behind celebrating Mahashivaratri, which is essentially the festival of Shiva and Parvati.


We have previously discussed Mahashivaratri in a separate article. Today, we will explore the lesson imparted by the posture of Shiva—depicted as seated on a tiger (vyaghraasana). This lesson will be considered not from a purely spiritual perspective, but from a practical, everyday viewpoint.


Shiva is depicted as sitting on a tiger. The tiger is symbolic and inherently aggressive. To eliminate our ignorance, we too must be aggressive. The first characteristic of the tiger is its vision. When a tiger eyes a deer for hunting, it concentrates its entire attention on that particular target. Even if another deer comes close during its attack, the tiger remains undistracted; its focus is solely on the chosen target, and no other creature can divert its attention. In our own lives, we often find that while we are focused on our goal, distractions may arise. The first lesson we learn from the tiger is that we must have unwavering focus on our objectives.


From the perspective of thought, when a single idea emerges, numerous other thoughts often crowd in before the original idea is fully realized. Our attention then tends to stray from the primary thought. We must remain concentrated on that original idea rather than getting entangled in its many offshoots.


The tiger’s second quality is power. A tiger’s strength is immense, and similarly, we must possess a strong commitment. To succeed in any field, commitment is essential. Even if we exert great effort, without commitment those efforts amount to nothing more than mere labor.


The third quality of the tiger is speed. Likewise, we should cultivate the necessary swiftness to achieve our goals. In today’s competitive era, our pace must match the speed at which the world moves. As Sant Kabir advises:

“Do tomorrow’s work today; if you delay, when will it be done?”

Never postpone any task. Timely completion of work is the key to success.


The fourth quality is strategy. Just as the tiger employs tactics, we too must devise strategies to achieve our life goals. Tukaram Maharaj says,

“Day and night, we face the scenario of war.”

Life is a battle, and to succeed, strategy is indispensable. Our greatest adversary is our own ignorance; to overcome it, one must become wise. Though the concept of strategy might seem complex, its essence is straightforward.


The fifth quality is skill. A tiger exhibits exceptional skill in its speed, attack, and maneuvers. Every creature possesses its own unique skills, which serve as the means for survival. This is why many yoga postures are modeled after animals or elements of nature—such as Bhujangasana, Parvatasana, Naukasana, Tadasana, and Macchyasana. Acquiring skill requires proper guidance. Sadguru remarks that life is an art, and to excel in any art, one must develop skill. In today’s hectic world, it is essential to have the requisite skill to achieve one’s goals without undue stress.


Thus, the five qualities of the tiger are:

1. Vision, focus, and sight

2. Power

3. Speed

4. Strategy

5. Skill


These qualities are essential for fulfilling the goals of life, and for that very reason, one should engage in the worship and meditation of Shiva—that is, one should cultivate these qualities through meditation.


“Do and see” means that grace will not remain absent.


Thank you.

Victory to Sadguru Nath Maharaj.

Jayant Joshi

Jeevan Vidya Mission

 
 
 

Recent Posts

See All

होळी पौर्णिमा / Holi Purnima

*होळी पौर्णिमा* होळी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!! होळी हा सण पारंपारिक पद्धतीने भारताच्या सर्व प्रांतातच नव्हे तर सर्व...

जीवनशिल्प / Life Sculpting

*जीवनशिल्प* सद्गुरु म्हणतात, जीवन फार सुंदर आहे. पण हे जीवनाचे सुंदर शिल्प घडविण्यासाठी आवश्यक ते ज्ञान असणे जरुरीचे आहे. जीवन शिल्प...

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page