top of page

कर्मकांड / Karmakand (Ritualism)


सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,

मनाने जर तुम्ही देवाची उपासना केली तर संतांना ती जास्त प्रिय असते. जगामध्ये जे जे मोठे संत होऊन गेले त्यांची चरित्र तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी कोणीही कोणतेही कर्मकांड केलेले नाही. आपण जेव्हा कर्मकांड करतो नां, तेव्हा आपल्या ठिकाणी कर्मठपणा निर्माण होतो आणि हा

कर्मठपणा निर्माण झाला की हळूहळू कडवटपणा निर्माण होतो आणि असा हा कडवटपणा निर्माण झाला की मग त्या माणसाचं जीवन तर कडू होतेच पण तो इतरांचे जीवन देखील कडू करून टाकतो.


*कर्मकांड म्हणजे काय*

कर्मकांड याचा प्रचलित अर्थ आहे धार्मिक किंवा सांस्कृतिक रितीरीवाज, विधी किंवा अनुष्ठानांची परंपरा आणि त्याचे पालन करण्याची पद्धत. उदाहरणार्थ एखादी पूजा करण्यासाठी आवश्यक असलेली सामग्री आणि ती सामग्री मांडण्याची विशिष्ट पद्धत व त्यासाठीचे विशिष्ट मंत्र वा स्तोत्र इत्यादी.


*कर्मकांडाची सुरुवात कशी झाली*

कर्मकांडाची सुरुवात ही मानवी सभ्यतेच्या सुरुवातीच्या काळापासून झाली आहे. त्या काळात जीवनातील प्रत्येक गोष्ट निसर्गाशी जोडलेली होती- पाऊस, सूर्यप्रकाश, हवा, पाणी अन्न, मिळविणे या सर्व गोष्टींच्या आधारावरच धार्मिक श्रद्धा तयार झाल्या. मानवाने निसर्गाच्या शक्ती ओळखल्या त्या शक्तींचे सामर्थ्य लक्षात आल्यानंतर त्या शक्ती आपल्याला सहाय्यभूत व्हाव्यात म्हणून माणसाने त्यांच्याविषयी कृतज्ञता दाखविण्याकरता त्यांची प्रार्थना पूजा करण्यास सुरुवात केली आणि यातूनच विविध विधी परंपरा विकसित होत कर्मकांडाची प्रक्रिया उदयास आली.

काळाच्या ओघात प्राचीन संस्कृतीच्या श्रद्धा आणि परंपरा मानवी जीवनात खोलवर रुजल्या त्यामुळे कर्मकांडाचे स्वरूप बदलत गेले आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये विविध प्रकारचे विधी आणि रीतिरिवाज तयार झाले. हे विधी आणि रिवाज पार पाडण्याकरता समाजात एक वर्ग तयार झाला. या समाजाने या कर्मकांडाची सूत्रे आपल्या हातात घेतली. यातून एक पुजारी, देवर्षी, तंत्र मंत्र करणाऱ्यांची सत्ता निर्माण झाली. या वर्गाला समाजात प्रतिष्ठा निर्माण झाली. या वर्गाने आपले हितसंबंध व आर्थिक लाभ यांची जपणूक करण्याकरता सामान्य जनता जी बहुसंख्येने अशिक्षित होती अशा जनतेच्या मनामध्ये लोभ व भीती निर्माण केली. उदाहरणार्थ अमुक कामाकरिता अमुक पूजा करणे कसे गरजेचे आहे आणि त्यासाठी अमुकच गोष्टी कशा आवश्यक आहेत आणि जर असे केले नाही तर त्याचा तुमच्या जीवनावर कसा विपरीत परिणाम होईल असे सांगून साध्या सरळ सहज पूजा विधीच्या प्रक्रियेस अनिष्ट वळण दिले आणि प्रत्यक्ष पूजेपेक्षा कर्मकांडाला महत्व प्राप्त झाले.


वास्तविक पाहता ज्यांच्यावर समाजाला योग्य दिशा दाखविण्याची जबाबदारी होती त्यांनीच समाजाला चुकीचे मार्गाने जाण्यास भाग पाडले.


वास्तविक पाहता प्रत्येक धर्मासाठी कर्मकांडाचे तत्त्वज्ञान हे मानव आणि दैवी शक्तीतील संबंध दृढ करणे, समाजात नैतिकता प्रस्थापित करणे आणि अध्यात्मिक उन्नती साध्य करणे या उद्दिष्टांवर आधारित आहे.

महर्षी व्यास हे भारतीय तत्त्वज्ञान, धर्म आणि साहित्य यामधील एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. प्राचीन काळात वेद, उपनिषदे व इतर पौराणिक साहित्याचे ज्ञान देण्याची पद्धत ही मौखिक पद्धत होती. एक पिढी संपूर्ण पाठांतर करून पुढच्या पिढीला ज्ञान देत असे. मौखिक पद्धत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे ज्ञान सांगितले जाई. या मौखिक पद्धतीमुळे मूळ ज्ञानातील काही भाग वगळला जाईल तर काही अतिरिक्त भाग जोडला जाई. यामुळे व्यासांच्या काळात हे सर्व ज्ञान मूळ स्वरूपात एका ठिकाणी समग्र स्वरूपात उपलब्ध नव्हते. महर्षी व्यासांनी या सगळ्या साहित्यांचे संकलन केले, संपादन केले आणि नवीन स्वरूपात त्याची पुर्न:मांडणी केली. महर्षी व्यासांनी वेदांचे वर्गीकरण केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद व्यवस्थित केले. तसेच महाभारत, भगवद पुराण यासारख्या महान ग्रंथांचे संकलन आणि रचना केली. महर्षी व्यासांनी या सर्व साहित्याचे दोन भाग केले. एका भागाला त्यांनी नाव दिले *कर्मकांड* आणि दुसऱ्या भागाला नाव दिले *ज्ञानकांड*. कांड याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे प्रकरण. व्यासांच्या या महान कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा संबोधले जाते आणि कुठल्याही कार्यक्रमाची जी बैठक असते तिला व्यासपीठ म्हटले जाते.

"ज्ञानकांड व्यक्तीच्या अंतर्मुख प्रवासाला प्रोत्साहन देते तर कर्मकांड मात्र व्यक्तीच्या बाह्यवर्तुणकीवर लक्ष केंद्रित करते."


महर्षी व्यासांनी ज्ञानकांडाच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की, "जोपर्यंत तुम्ही कर्मकांडात प्राविण्य मिळवत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञानकांडाकडे जाण्याचा अधिकार नाही." कर्मकांड म्हणजे कोणतेही कर्म विशिष्ट पद्धतीने कसे करायचे त्याची प्रक्रिया. थोडक्यात सांगायचे तर कर्मकांड म्हणजे आजच्या व्यवस्थापन शास्त्रातील एस. ओ. पी. Standard Operating Procedure. याला आपण आधुनिक कर्मकांड म्हणू शकतो.


कर्मकांडाच्या पाठीमागचा उद्देश अतिशय उदात्त होता व आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट योग्य रीतीने करण्याची शिस्त तुमच्या अंगी रुजत नाही तोपर्यंत तुम्ही सखोल ज्ञान प्राप्त करू शकणार नाही. आज हेच झालं आहे. आज प्रत्येकाला एकदम ज्ञान पाहिजे आहे परंतु ते ज्ञान प्राप्त करण्याकरता जे तप आवश्यक आहे ते तप करण्याची कोणाची तयारी नाही. मग असे मिळविलेले ज्ञान हे केवळ वरवरचा दिखाऊपणा होतो. सखल आणि समग्र ज्ञान होत नाही.

कर्मकांडाचा उद्देश हा ज्ञानकांडापर्यंत जाण्याचे साधन म्हणून आहे. परंतु आपण साध्य, साध्य करणे ऐवजी नेहमीच साधनात अडकून पडतो. नाम हे स्वरूपाची ओळख होण्यासाठीचे साधन आहे. योग्य वेळी साधन सोडता आले पाहिजे. आपण साधनाला चिटकून राहतो. उंच उडी मारण्याकरता बांबू हे साधन आहे. हा बांबू योग्य उंचीवर आल्यावर सोडला नाही तर पलीकडे जाऊ शकत नाही. तद्वतच कर्मकांड हे साधन आहे. ते योग्य वेळी सोडता आलं पाहिजे. परंतु ज्ञान प्राप्त न करता केवळ कर्मकांडच करत राहिल्यामुळे कर्मठपणा येतो आणि सद्गुरूंचा

कर्म करण्याला- कर्मकांडाला विरोध नाही तर कर्मकांडातून जो कर्मठपणा निर्माण होऊन परिणामी कडवटपणा येतो त्याला विरोध आहे.


व्यासांच्या मतानुसार कर्मकांड ही शिस्त आणि प्रक्रिया शिकविते, ज्यामुळे मनुष्याला आध्यात्मिक शुद्धी आणि नैतिकता प्राप्त करता येते. एकदा ही शिस्त निर्माण झाली आणि नैतिकता प्राप्त झाली की, व्यक्ती ज्ञानकांडाच्या अधिक खोल तत्वज्ञानात प्रवेश करण्यास प्राप्त ठरते.

कर्म म्हणजे Action तर कर्मकांड म्हणजे Activity- क्रिया कलाप. Action आणि Activity यावर पुढे कधीतरी विशेष स्पष्टीकरण करु.


धन्यवाद.

सद्गुरुनाथ महाराज की जय.

जयंत जोशी



.........



Karmakand (Ritualism)


Sadguru Shri Vamanrao Pai says:


If you worship God with a true heart, saints value it more. If you study the lives of great saints, you will find that none of them were bound by rituals. When we engage in rituals, we develop rigidity, and this rigidity gradually turns into intolerance. Once intolerance sets in, not only does a person’s own life become bitter, but they also spread bitterness into the lives of others.


What is Karmakand?


The commonly accepted meaning of Karmakand (ritualism) is the tradition of religious or cultural customs, rites, or ceremonies, along with the prescribed ways of performing them. For example, in a puja (worship), the specific materials required, the method of arranging them, and the recitation of specific mantras or hymns all constitute Karmakand.


How Did Karmakand Begin?


Karmakand has existed since the dawn of human civilization. In ancient times, every aspect of life was deeply connected to nature—rain, sunlight, air, water, and food. Religious beliefs developed based on these essential elements. Once humans recognized the power of natural forces, they began worshiping them out of gratitude, hoping for their continued blessings. Over time, various rituals and traditions emerged, forming the foundation of Karmakand.


As centuries passed, these ancient cultural beliefs and traditions became deeply embedded in human life, leading to the evolution of diverse religious rites and practices. A specific group in society took responsibility for conducting these rituals, gaining influence as priests, sages, and ritualists. Over time, this class secured prestige and used fear and greed to ensure people adhered to their prescribed rituals. They promoted the idea that certain rituals were essential for specific outcomes, and failure to perform them would bring negative consequences. This manipulation shifted the focus from genuine worship to rigid ritualism.


In reality, those who were entrusted with guiding society on the right path ended up misleading it.


The True Purpose of Karmakand


Every religion originally designed Karmakand as a means to strengthen the connection between humans and divine forces, establish moral values in society, and facilitate spiritual progress.


Maharshi Vyasa is one of the most influential figures in Indian philosophy, religion, and literature. In ancient times, knowledge from the Vedas, Upanishads, and other scriptures was transmitted orally. Each generation memorized and passed down this knowledge. However, due to regional variations, parts of this knowledge were lost or altered over time. To address this, Maharshi Vyasa compiled, edited, and restructured this vast knowledge, organizing the Vedas into four divisions: Rigveda, Yajurveda, Samaveda, and Atharvaveda. He also compiled great texts like Mahabharata and Bhagavata Purana.


Maharshi Vyasa categorized this knowledge into two sections:


1. Karmakand (Ritualistic Section)



2. Jnanakand (Philosophical Section)




The term Kanda simply means a chapter or section. Out of gratitude for his work, Guru Purnima is also called Vyas Purnima, and the platform from which teachings are delivered is known as Vyaspeeth.


"Jnanakand encourages an inward journey, while Karmakand focuses on external practices."


At the beginning of Jnanakand, Maharshi Vyasa states:

"Unless you master Karmakand, you are not qualified to enter Jnanakand."


Karmakand is essentially a process that outlines how a particular action should be performed. In modern terms, it can be compared to Standard Operating Procedures (SOPs) in management. We could call this the modern Karmakand.


The Purpose of Karmakand and Its Misinterpretation


The original intention behind Karmakand was and remains noble. It was meant to instill discipline in individuals, preparing them for deeper wisdom. However, in today's world, people seek instant knowledge without undergoing the necessary discipline and self-transformation. As a result, the knowledge they acquire is often superficial and lacks true depth.


Karmakand was meant to be a stepping stone towards Jnanakand. However, people often become fixated on the means rather than the goal. Just as a bamboo pole helps an athlete jump higher but must be released at the right moment, Karmakand serves as a tool to reach wisdom but should not become a permanent attachment.


Sadguru does not oppose rituals (Karmakand) themselves but rather the rigidity (Karmathpan) that leads to intolerance.


According to Maharshi Vyasa, Karmakand teaches discipline and methodical execution, which fosters spiritual purification and morality. Once these qualities are established, an individual is ready to explore the deeper philosophy of Jnanakand.


Action vs. Activity


'Karma' means action, whereas 'Karmakand' refers to structured activities (rituals). This distinction will be explored in detail another time.


Thank you.


Sadgurunath Maharaj Ki Jai!


— Jayant Joshi



 
 
 

Recent Posts

See All
मानव धर्म / Human Dharm

*मानव धर्म* सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हाच खरा मानव धर्म आहे." माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे...

 
 
 
The True Wealth: A Lesson from Life

In today’s world, people relentlessly chase money, believing it to be the ultimate source of happiness and security. But what if wealth,...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page