top of page

आनंदाचे डोही आनंद तरंग / In the Ocean of Bliss, Waves of Joy Arise

संत तुकाराम महाराज आपल्या पूर्णत्वाच्या अभंगांमध्ये म्हणतात,

"आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे"

या अभंगात तुकाराम महाराज ईश्वराच्या सानिध्यात मिळणाऱ्या अंतरिक आनंदाचे वर्णन करतात. भक्तीची परम सीमा गाठल्यानंतर सर्वत्र आनंदी आनंदच आहे. आत बाहेर सर्वत्र आनंदच आनंद आहे.

सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे"

माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट म्हणजे दुःखमुक्त जीवन आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती. परमात्म्याचे वर्णन सच्चितआनंद असे करतात. सत म्हणजे सत्तारूपाने, चित् म्हणजे चैतन्य रूपाने असा जरी असला तरी जीवाला त्याचे स्वरूप कळते ते आनंद रूपाने. परमेश्वर सर्वत्र वास करून राहिलेला आहे म्हणजेच सर्वत्र आनंदी आनंद आहे. मग जर सर्वत्र आनंदच आहे तर आम्ही सुद्धा जे त्या परमेश्वराचे स्वरूप आहोत तर आम्ही देखील आनंद स्वरूपच आहोत नां? मग तरी देखील माणूस आयुष्यभर आनंद मिळविण्याची धडपड का करत असतो? याचे कारण म्हणजे आपल्याला पडलेला स्व स्वरूपाचा विसर. "तुज आहे तुज पाशी,परी तू जागा चुकलाशी" अशी आपली अवस्था झालेली आहे. अशी आपली अवस्था होण्याचे काय कारण?

तर आम्हाला असलेल अज्ञान. काय अज्ञान आहे? तर आम्ही कोण? याचेच आम्हाला ज्ञान नाही.

*कोण आहोत आपण?*


सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "शरीर साक्षात परमेश्वर आहे" का बरं सद्गुरु असे म्हणतात? सद्गुरूंनी परमेश्वराची प्रथमच व्याख्या केली आहे. सद्गुरु परमेश्वराची व्याख्या करतात, ती म्हणजे "निसर्ग नियमां सहित स्वयंचलित स्वयं नियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर"

निसर्गाची व्यवस्था स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, आणि पद्धतशीर तर आहेच पण संपूर्ण व्यवस्था निसर्ग नियमांवर आधारित आहे. सद्गुरु म्हणतात, निसर्गाचे नियम अगणित आहेत पण आपल्याला त्यापैकी फारच थोडे नियम माहित आहेत. या माहीत असलेल्या नियमांमध्ये ज्याला निसर्ग नियमांचा राजा असे सद्गुरु म्हणतात तो नियम म्हणजे *क्रिया कशी प्रतिक्रिया* हा एक नियम जरी आपण लक्षात ठेवून त्या नियमाचे पालन केले तरी जीवनात आनंदी आनंदच निर्माण होईल.


निसर्गाचा एक अध्यारुत प्रस्थापित नियम आहे. ज्या नियमाचे पालन निसर्ग अगदी काटेकोरपणे करत असतो. आणि तो म्हणजे *आनंद वाटण्याची प्रक्रिया* निसर्ग सतत कोणतीही अपेक्षा न ठेवता, विना अपेक्षा सतत आनंद वाटण्याचे काम करत आहे. निसर्गाच्या या आनंद वाटण्याच्या क्रियेमुळेच आज पृथ्वीतलावरील सर्व जीव सुखनैव नांदत आहेत.


सद्गुरु म्हणतात, मानव हा परमेश्वराचा पुत्र म्हणजे परमेश्वरच आहे. परमेश्वर जसा आनंद स्वरूप आहे तसाच निसर्गही आनंद स्वरूप आहे, आणि

मनुष्यप्राणी हा देखील आनंद स्वरूपच आहे. फरक एवढाच आहे की निसर्ग सतत आनंदाचे प्रक्षेपण करत आहे आणि मानव मात्र सतत आनंदाचे ग्रहण करण्यातच मग्न आहे. आपण स्वतः आनंदाचा डोह आहोत याचेच मानवाला विस्मरण झालेले आहे. जेव्हा हे स्मरण माणसाला होते तेव्हा त्याची अवस्था संत तुकाराम महाराज म्हणतात तशी "आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे" अशी होते. आनंद आणि आपण यात वेगळेपण शिल्लकच राहत नाही.

परंतु हा आनंदाचा डोह आहे. डोह शांत असतो. डोह शांत असल्याने त्यात तरंग निर्माण होत नाहीत. पण म्हणूनच तुकाराम महाराज अभंगात पुढे म्हणतात, "काय सांगू झाले काहीचीयाबाही" म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, की या आनंदाचे डोहाची ठिकाणी अकल्पित घडले आणि या डोहात आनंदाचे तरंग निर्माण झाले आणि अंतरबाह्य आनंदच आनंद झाला.

या डोहात असलेला हा आनंद म्हणजे परमेश्वर प्रगट कसा करायचा? तर, ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात तसा *मंथोनी नवनीता तैसे घे अनंता.* अनंता म्हणजे परमेश्वर. आणि परमेश्वराचे स्वरूप म्हणजे आनंद. थोडक्यात आनंद प्रगट होणे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी जसे देवांनी समुद्रमंथन केले किंवा जसे लोणी पाहिजे असेल तर दह्याचे मंथन करावे लागते तसे आनंद प्रगट होण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे.

हे मंथन कसले करायचे? तर हे मंथन म्हणजे विचारांचे मंथन. आणि या मंथनासाठी रवी हवी ती ज्ञान,भक्ती,आणि वैराग्य यांची.


सद्गुरु म्हणतात, तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवितात. सद्गुरू पुढे असेही म्हणतात, *विचार बदला नशीब बदलेल.* हे विचार बदलायचे म्हणजेच विचारांचे मंथन करून नवनीतरुपी विचारांची प्रतिष्ठापना करणे.

डॉक्टर ब्रूस एच लिप्टन म्हणतात, मानवी शरीर हे खर्वावधी पेशींपासून बनलेले आहे. माणसाच्या शरीरात एकूण पेशी किती असतात? तर, साधारणपणे ५२ ट्रिलियन. म्हणजे किती तर ५२ वर बारा शून्य. म्हणजे ५२० खर्व पेशींचा समूह म्हणजे मानवी शरीर. ज्याला आपण मी मी म्हणतो तो मी म्हणजेच या खर्वावधी पेशींचा समूह. या पेशींच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व अवलंबून असते. या पेशीच आपल्या संपूर्ण शरीराचे नियंत्रण करतात.

या पेशींचा मेंदू म्हणजेच पेशी भोवतीच पटल. ज्याला इंग्रजीमध्ये Cell Membrane म्हणतात. डॉक्टर लिप्टन त्याची फोड Mem-Brain अशी करतात. या पटलाचे म्हणजेच Mem Brain यांच्या साह्याने आपल्या शरीरातील पेशी वातावरणातील सिग्नल ओळखतात, आणि त्याचे रूपांतर आपल्या वर्तणुकीत करतात. पेशी पटल हे रचनेच्या आणि कार्याच्या दृष्टीने एखाद्या सिलिकॉन चीप सारखे आहे. जसं कॉम्प्युटरला आपण प्रोग्राम करू शकतो तसेच पेशींनाही करू शकतो. जीवशास्त्रीय वर्तणूक आणि जनुकांचं कार्य हे पेशीच्या सभोवतालच्या वातावरणातल्या माहितीशी गतिशीलपणे जोडलेले असते. वातावरणातील ही माहिती पेशीत उतरते आणि मग पेशी त्यानुसार काम करते. आपल्या आयुष्याचं एकूण नियंत्रण काही आपल्या निर्मितीच्या क्षणी आपल्या जनुकांवर नोंदलेले नसतं तर ते आपल्या हातात असतं. आपल्या अस्तित्वाचे आपणच कर्ते असतो, नियंत्रक असतो. याचाच अर्थ असा की "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".

आपलं शरीर आणि मन यांना वेग वेगळ अस्तित्व नाही. शरीर आणि मन यांना वेगवेगळे, स्वतंत्र समजण्याची चूक पाश्चात्य वैद्यकशास्त्र शतकानू शतके करत आले आहेत. आपल्या शरीराचा आपल्या मनावर परिणाम होत असतो तसेच आपल्या मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. पेशींची कार्य करणारी प्रथिने निर्माण करणे किंवा न करणे यावर आपल्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो. रचनात्मक किंवा विध्वंसक अशा कोणत्याही प्रकारचा हा परिणाम असू शकतो. चांगले सकारात्मक विचार रचनात्मक परिणाम घडवितात, तर नकारात्मक विचार विध्वंसक परिणाम घडवितात.

मन हे केवळ मेंदूत वसलेलं असतं असं नाही तर शरीरातल्या बहुतांश पेशींच्या पटलांमध्ये वसणाऱ्या रिसेप्टर प्रथिनांच्या रूपात ते संपूर्ण शरीरात पसरलेल असतो. संपूर्ण शरीरच मन बनतं. पेशींकडून प्राप्त झालेल्या वातावरणातील संदेशांच पृथ:करणं करून वर्तणुकीचे संदेश देण्याचे कार्य मज्जासंस्था मेंदूच्या नियंत्रणाखाली करते.


उत्क्रांतीत मानवाच्या मेंदूमध्ये एक विशेष भाग विकसित झालेला आहे. ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात.‌ या विशेष विकसित भागामुळे म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्समुळे आपल्याला विचार करणे, नियोजन करणे आणि निर्णय घेणे ही अत्यंत महत्त्वाची कार्ये करता येतात. या भागाला सजग मन म्हणतात. आपल्या सुप्त मनात कोरल्या गेलेल्या वर्तणुकीचे आराखडे आपले सजग मन बदलू शकते आणि हाच आपल्या मुक्त इच्छाशक्तीचा पाया आहे.


सूप्तमन, सजगमन, या मनांची कार्ये, तसेच त्यांच्या मर्यादा याविषयी अधिक माहिती हवी असल्यास डॉक्टर ब्रूस यांच्या द बायोलॉजी ऑफ बिलीफ या मूळ पुस्तकाचा किंवा त्या पुस्तकाचे मराठीतील अनुवादित पुस्तक द बायोलॉजी ऑफ बिलीफ हे साकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले पुस्तक अवश्य वाचावे. या पुस्तकात आपले विचार आपले आयुष्य कसे नियंत्रित करतात, आणि आपले विचारच आपले आयुष्य कसे घडवितात या पाठीमागचे विज्ञान अतिशय सुंदर वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखविलेल आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने आपल्याला संगतीचे महत्त्व, तसेच बाह्य वातावरण चांगले ठेवण्याची आवश्यकता, तसेच सकारात्मक विचारांचे महत्त्व, विचार बदलण्यासाठी काय केले पाहिजे या गोष्टींचा उत्तम उलगडा होईल.


आपले दृष्टिकोन याच आपल्या धारणा असतात. आणि धारणांच सजीवतेचे नियंत्रण करतात. धारणा संसर्गजन्य असतात. म्हणजे आपल्या धरणांवर बाह्य वातावरणाचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ जाहिरातींचा प्रचंड मारा आपल्या धारणा बदलतात. जेव्हा मनाची काही एक धारणा होते तेव्हा त्या धारणेचा शरीरावर निश्चितच परिणाम होतो. आपल्या धारणा म्हणजे जणूकाही आपण कॅमेरावर लावतो ते फिल्टर्स... जसा फिल्टर लावाल तसं जग दिसेल. आपल्या धारणांना आपलं शरीरही प्रतिसाद देत. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या धारणा शक्तिशाली आहेत तेव्हा आपल्या हाती मुक्तीची गुरुकिल्लीच येते. आपल्या जनुकीय रचना तर आपण बदलू शकत नाही पण आपलं मन मात्र आपण हवं तसं घडवू शकतो. आपल्या मनावर प्रेम भावनेचा चष्मा लावून आपण आपलं पूर्ण आयुष्य आनंदमय करू शकतो. तुम्ही जगाकडे प्रेमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शरीर आरोग्यपूर्ण आनंदी होईल. "आनंदाची अंग आनंदाचे" हे प्रत्यक्षात येईल. पण तेच जर तुम्ही जगाकडे भीतीच्या, निराशेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमचं शरीर बचावात्मक पवित्र्यात राहायला लागेल आणि आरोग्य खालावेल. सकारात्मकतेकडे आनंदमय जीवनाकडे आपली वाटचाल होण्यासाठी मनाला कसं घडवावं हे शिकणं यातच आपल्या सुखी आनंदी जीवनाचा गुपित आहे. सकारात्मक आनंदी दृष्टिकोन ठेवून आयुष्याला सामोरे जाणं हेच अत्यंत योग्य आहे. आनंदी आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर विचार सकारात्मक असणे अनिवार्य आहे. नव्हे, नव्हे आनंदी आयुष्यासाठीची ती जैवशास्त्रीय पूर्व अटच आहे.

महात्मा गांधींच्या शब्दात सांगायचं तर

१. तुमच्या धारणातून तुमचे विचार बनतात.

२. तुमच्या विचारातून तुमचे शब्द निर्माण होतात.

३. तुमच्या शब्दातून तुमच्या कृती घडतात.

४. तुमच्या कृतींमुळे तुमच्या सवयी तयार होतात.

५. तुमच्या सवयी ही तुमची मूल्य बनतात.

६. तुमच्या मूल्यांनीच तुमचं नशीब घडतं.

सद्गुरु म्हणतात, जशी संगती तशी मती, जशी मती तशी गती, आणि जशी गती तशी नियती. यामध्ये सद्गुरु म्हणतात, सर्वप्रथम आपण संगतीच्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. जशी आपली संगती असेल, मग ती संगत घरातील असो समाजातील असो कार्यालयातील किंवा कुठलीही असो या संगतीनेच आपल्या आजूबाजूचे वातावरण तयार होते. आणि आपण वर बघितलं की आपल्या पेशी ज्या आपल्या आयुष्याचे नियंत्रण करतात त्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा ही वातावरणाकडूनच मिळत असते. मग जर आमची संगत ही कायम आनंदी वातावरणाची असेल तर आमचे संपूर्ण जीवनच आनंदमय होईल. परंतु ही वातावरण निर्मितीची जबाबदारी कोणाची आहे? तर, ती जबाबदारी आहे आपली स्वतःचीच. आम्ही जर आनंदाचे प्रक्षेपण करत नसू तर आमच्या भोवतालचे वातावरण आनंदी कसे राहू शकेल? म्हणूनच आपण प्रत्येकाने हा निश्चय केला पाहिजे की मी कायम आनंद वाटेन. माझ्या संपर्कात, सहवासात, संगतीत जो कोणी येईल त्या प्रत्येकाला मी -

*कायेन वाचेन*

*मनसेंद्रिर्यवा*

*बुद्ध्यात्मना वा प्रकृती*

*स्वभावात*

*करो मी यद्दं सकलम* *परस्मयी*

*नारायणायती*

*समर्पयामी.*

थोडक्यात मी शरीर, वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी किंवा आत्म्याद्वारे किंवा स्वाभाविक प्रवृत्तीने जी काही कृती करेल ती प्रत्येक कृती ही नारायणाला म्हणजेच इतर सर्वांना आनंदी करण्यासाठीच समर्पित करेन.


*आनंद वाटता वाटता*

*आनंद लुटण्यातच*

*जीवनाचे सार्थक*

*आहे.*

धन्यवाद.

सदगुरुनाथ महाराज की जय.

जयंत जोशी


...



You're absolutely right—and thank you for pointing that out. Here's the full translation, now including the closing section and your name:

In the Ocean of Bliss, Waves of Joy Arise

Saint Tukaram Maharaj, in his verses of spiritual fulfillment, says:

“In the ocean of bliss, waves of joy arise; every limb is soaked in bliss.”

In this verse, Tukaram Maharaj describes the inner joy attained in the proximity of the Divine. Once one reaches the highest limit of devotion, there is joy all around—within and without.

Sadguru Shri Vamanrao Pai says,“The purpose of human birth is to distribute and experience bliss.”

The goal of human life is a life free from sorrow and attainment of eternal bliss. The Divine is described as Sat-Chit-Ananda—Existence, Consciousness, and Bliss. Though God exists as Existence (Sat) and Consciousness (Chit), it is through Bliss (Ananda) that the soul truly experiences Him. Since the Divine resides everywhere, there is bliss everywhere. And if we too are of the same essence as the Divine, then we too are embodiments of bliss, aren't we?


Yet, why does man struggle throughout life in pursuit of happiness?

The reason is our forgetfulness of our true nature. “That which you seek is already within you, but you have forgotten your way.” This is our current state. What causes this condition? Our ignorance. And what is that ignorance? It’s the lack of awareness of who we truly are.

Who are we?

Sadguru Shri Vamanrao Pai says, “The body itself is God.” Why does the Sadguru say this?

He has redefined the concept of God. He says,"God is the automatic, self-regulated, natural, and orderly system governed by the laws of nature."

Nature’s system is self-regulated and orderly, strictly abiding by its own laws. There are countless laws of nature, of which we know only a few. Among them, Sadguru refers to one as the king of all natural laws:"Action and reaction."Even if we follow just this one law properly, it can lead to a life filled with joy.

Nature follows another implicit, profound rule—the process of sharing bliss. Nature constantly gives bliss without expecting anything in return. This unending act of giving is the reason all beings on Earth thrive harmoniously.


Sadguru says, “Man is the son of God, and therefore, he is God himself.” Just as God is bliss, and nature is bliss, so too is man essentially bliss. The only difference is—nature constantly transmits bliss, while man is busy only in receiving it. Man has forgotten that he himself is an ocean of bliss. When this remembrance dawns, Saint Tukaram’s state is experienced:

“In the ocean of bliss, waves of joy arise; every limb is soaked in bliss.”There remains no separation between man and bliss.


But remember—this bliss is like a calm ocean. Being still, it has no waves. That’s why Tukaram Maharaj later says:"How do I explain? The inexplicable has occurred."He expresses that something unexpected stirred the still waters of bliss, and waves of joy rose, flooding inside and out with divine ecstasy.


How to manifest this bliss which resides in us?As Sant Dnyaneshwar says in Haripath:"Churn the infinite as you would churn curd to extract butter."The Infinite (Ananta) refers to God, and God's essence is bliss. But just like butter requires churning curd, bliss too requires churning—mental churning.


What kind of churning? Churning of thoughts.And for that, the fire or energy of knowledge, devotion, and detachment is essential.


Sadguru says:"Your thoughts shape your life."He also says:"Change your thoughts, and your destiny will change."

Changing thoughts means churning them to establish new, enlightened, butter-like thoughts.


Scientific Support from Dr. Bruce H. Lipton:

Dr. Bruce H. Lipton explains that the human body is made up of trillions of cells—about 52 trillion to be exact. The "I" we refer to is just a cluster of these cells. Our very existence depends on them. These cells are the real controllers of our body.


The brain of each cell is its membrane—called the cell membrane in English. Dr. Lipton cleverly refers to it as the Mem-brain. Through this membrane, cells receive signals from the environment and convert them into our behavior. This membrane acts like a silicon chip in a computer and can be reprogrammed.


Gene expression and behavior are not rigidly determined at birth. Instead, they dynamically respond to the information from the surrounding environment. Hence, you are the architect of your own life.


Mind and Body: A Unified System

The body and mind are not separate entities. Western medicine has mistakenly separated the two for centuries. In truth, the body affects the mind, and the mind affects the body. Our thoughts have a major impact on protein formation in cells—either constructive or destructive.


Positive thoughts result in constructive effects, while negative ones cause damage.


The mind is not confined to the brain. It exists as receptor proteins in the membranes of almost all cells in the body. Essentially, the whole body becomes the mind. The nervous system processes the environmental messages received by the cells and sends instructions to the body.


Humans have evolved a special part of the brain—the prefrontal cortex, which allows us to think, plan, and make decisions. This is our conscious mind. The subconscious patterns engraved in us can be changed by this conscious mind—and this forms the basis of our free will.


If you want to understand more about the conscious and subconscious mind, their functions, and limitations, you must read Dr. Bruce Lipton’s book "The Biology of Belief" (also available in Marathi from Saket Publications). This book beautifully unravels the science behind how our thoughts shape and control our lives. It will help you understand the importance of good company, a healthy external environment, and how to adopt positive thinking.


Our Perceptions and Beliefs Control Our Lives

Our perspective is shaped by our beliefs, and beliefs control our biology. Beliefs are contagious—they are influenced by the environment. For example, relentless advertising can change our beliefs. Once the mind forms a belief, it definitely impacts the body.


Our beliefs are like camera filters—the filter you choose determines how the world appears. Your body responds accordingly.


When you understand this power, you realize:

"You are the sculptor of your own life."


Sadhguru maharaj ki jai.


– Jayant Joshi

 
 
 

Recent Posts

See All
कर्मकांड / Karmakand (Ritualism)

सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, मनाने जर तुम्ही देवाची उपासना केली तर संतांना ती जास्त प्रिय असते. जगामध्ये जे जे मोठे संत होऊन गेले...

 
 
 

Comentários


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page