top of page

आत्मविश्वास - यशस्वी जीवनाचे आणि प्रगतीचे रहस्य / Self-Confidence – The Secret to a Successful and Progressive Life

प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन यशस्वी व्हावे असे वाटत असते. आयुष्यभर माणूस त्यासाठी धडपडत असतो. माणूस जीवनात यशस्वी झाला की अयशस्वी हे कसे ठरविणार?

जेव्हा माणूस आपले जीवनातील ध्येय पूर्ण करतो तेव्हा तो माणूस यशस्वी झाला असे म्हणता येते. ही जीवनातील ध्येये जी विविध स्वरूपाची आणि वेगवेगळ्या मुदतीसाठी म्हणजेच लघुकालासाठी किंवा दीर्घकालासाठी असू शकतात, ती निश्चित करून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी लागते. पण बहुतेक वेळा असे होते की, आम्ही काहीच ध्येय निश्चित केलेले नसते. आमचे जीवन जे By Design घडायला हवे ते By Default घडत असते. याचे कारण आम्हाला याबाबत कधी शिकविले जात नाही. आमचे लक्ष हे कायम अंतिम यशावर असते. पण ते यश प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे? याचे ज्ञानच आम्हाला नसते. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी लहान लहान ध्येयांचा पाठपुरावा करावा लागतो.

सद्गुरु श्री वामनराव पै "तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात" या ग्रंथात म्हणतात, तुमचा उत्कर्ष घडवून आणण्यासाठी म्हणजेच तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सात पायऱ्या चढून जाणे आवश्यक आहे. या सात पायऱ्या म्हणजे -

कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा आणि कृतज्ञता.

या प्रत्येक पायरीचे सुंदर असे विश्लेषण आणि मार्गदर्शन सद्गुरूंनी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या ग्रंथात केले आहे. या सात पायऱ्यांमधील प्रत्येक पायरी महत्त्वाची आहेच पण कौशल्य आणि कल्पकता या दोन पायऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत. कौशल्य आणि कल्पकता नसेल तर यश हे सामान्य यश ठरते जर असामान्य यश प्राप्त करायचे असेल तर कौशल्य आणि कल्पकता असणे आवश्यक असते. कौशल्य आणि कल्पकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कौशल्य आणि कल्पकता एकत्र आल्या की यशाच्या प्रवासाला योग्य दिशा मिळते. कौशल्य मिळवावे लागते आणि त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे इच्छाशक्ती, विद्या शक्ती आणि क्रिया शक्ती. यासाठी प्रथम निर्माण आणि विकसित करावा लागतो तो आत्मविश्वास. यासाठी काय केले पाहिजे?


आपला आत्मविश्वास जागृत व वृद्धिंगत करण्यासाठी बेंजामिन फ्रँकलिन पद्धत.

अठराव्या शतका फिलाडेल्फिया येथे एक वीस वर्षाचा सच्चा तरुण आपल्या स्वतःतील उणिवा आणि कमतरतांमुळे हताश निराश झालेला होता. पण याच तरुणाने हार न मानता स्वतःला सुधारण्याचा निश्चय केला. आणि त्याने एक अतिशय सोपी पण अतिशय परिणामकारक व्यवस्था तयार केली. ज्यायोगे तो एक संघर्षशील मुद्रकापासून एक आदरणीय राजकारणी, शास्त्रज्ञ आणि तत्ववेत्ता बनला.

कोण होता हा तरुण?


तर हा तरुण होता बेंजामिन फ्रँकलिन. जे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

बेन फ्रँकलिन याने अभ्यासाने आणि चिंतनाने वैयक्तिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली तेरा मूल्ये ओळखली. संयम, शांतता, सुव्यवस्था, संकल्प, मितव्ययीपणा, उद्योग, प्रामाणिकपणा, न्याय, संयम, स्वच्छता, शांतता, पवित्रता आणि नम्रता.

यातील मितव्ययीपणा हा शब्द कदाचित तुम्हाला अपरिचित आणि समजण्यास थोडा अवघड असेल तर मितव्ययीपणा याचा अर्थ आहे की किफायतशीर राहण्याची आणि अनावश्यक खर्च टाळण्याची सवय, मग तो पैसा असो, संसाधने (resources) असो किंवा वेळ असो.


त्यानंतर त्याने या मूल्यांना एक कल्पक दृष्टिकोन दिला. त्याने एकाच वेळी या सर्व मूल्यांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने काय केले तर दर आठवड्याला एका गुणावर लक्ष केंद्रित केले आणि सतत सोबत एक डायरी ठेवली आणि त्यात त्याने प्रगतीचा बारकाईने मागोवा घेतला. ज्यात त्याने जेव्हा तो डळमळीत झाला तेव्हा एक काळा ठिपका आणि सफलतेसाठी सफेद रंगाचा वापर केला. आठवड्या मागून आठवडे, महिन्या मागून महिने आणि वर्षा पाठोपाठ वर्षे त्याने जिद्दीने हे काम केले.

अनेक वर्षानंतर बेन असे म्हणतो,

" Tho' I never arrived at the perfection, I had been so ambitious of obtaining, but fail short out of it, yet I was, by the endeavour, a better and a Happier man then I otherwise should have been if I had not attempted it."

बेन म्हणतो, मी जरी त्या परिपूर्णतेपर्यंत पोहोचू शकलो नाही जिची मला तीव्र इच्छा होती आणि यासाठी मी कमी पडलो, तरीही त्या प्रयत्नांमुळे मी ते प्रयत्न केले नसते तर जितका चांगला आणि आनंदी असतो त्यापेक्षा अधिक चांगला आणि आनंदी माणूस झालो.


हे केवळ सदाचारी होणे इथपर्यंत मर्यादित नव्हते तर हे होते सातत्यपूर्ण, जाणीवपूर्वक, सराव करून आत्मविश्वास निर्माण करणे. आजच्या जगात आम्हाला सहज यश पाहिजे असते. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, *तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त* म्हणजे कठोर साधना, भक्ती आणि शिस्तशिर जीवनशैली याशिवाय कृपा होत नाही. याचा गर्भित अर्थ असा की प्रामाणिकता, सातत्य आणि निष्ठा यांचे सक्रियपणे पालन केल्याशिवाय जीवनात उन्नती साधता येत नाही. आजच्या या जमान्यात आम्ही अंतिम झगमगणारे यश पाहतो पण त्याच्या पाठीमागील प्रक्रियेचा, तपश्चर्येचा आम्ही कधीच विचार करत नाही.


यामुळे मोठी समस्या निर्माण होते.

आम्ही आत्मविश्वासाकडे आमच्याकडे असलेल्या किंवा नसलेल्या गुणांच्या दृष्टिकोनातून बघतो. पण यासाठीचे कौशल्य आम्ही विकसित करू शकतो या दृष्टीने बघत नाही. प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी आपला आपल्यावर विश्वास नसतो. वास्तविक पाहता प्रत्यक्ष कृती हीच आत्मविश्वास वाढविण्याची गुरुकिल्ली आहे, हे आमच्या लक्षातच येत नाही.


मग यावर काय उपाय?

बेन फ्रँकलिन यांनी जसे सदगुणांच्या विकासाच्या प्रगतीचे पुस्तक ठेवले होते तसेच एक कॉन्फिडन्स जर्नल आम्ही ठेवले तर आपले लक्ष अशा कृतींवर केंद्रित होईल ज्या आम्हाला आमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्यास मदत करतील.


हे आपण कसे करू शकतो?

आपल्या जीवनाशी संबंधित ५, ६ अशा कृती ओळखा जेथे आपल्याला आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक वाटते किंवा अशा गोष्टी ओळखा ज्या आपण आत्मविश्वास नसल्यामुळे करण्याचे टाळत आहोत. या गोष्टी अत्यंत छोट्या असू शकतात. जसे की, अपरिचित व्यक्तीशी संवाद साधणे, मीटिंगमध्ये बोलणे, नवीन रेसिपी ट्राय करणे.


प्रत्येक दिवशी एक नवीन कृती निवडा, त्याची आपल्या कॉन्फिडन्स जर्नल मध्ये नोंद करा. दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी आपल्याला काय अनुभव आला? आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा केला का? आपल्याला कसं वाटलं? आपण त्यातून काय शिकलो? याचा विचार करा. हे पुन्हा पुन्हा करा. कालांतराने आपल्या असे लक्षात येईल की काही क्षेत्र अशी आहेत की जिथे आपला आत्मविश्वास वाढला आहे आणि काही क्षेत्र अशी आहेत की ज्या ठिकाणी अजून आपल्याला संघर्ष करावा लागत आहे.

यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे आपल्या आत्मविश्वास वाढीच्या प्रगतीसाठी उचललेल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या नोंदीचा ठोस पुरावा असेल.


आत्मविश्वास हे कौशल्य आहे तो काही व्यक्तिमत्त्वाचा सहज गुण नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि आत्मविश्वासाला नैसर्गिक प्रतिभेपेक्षा तो सवयीने प्राप्त होणारा गुण मानणे ही आपली क्षमता वृद्धिंगत करण्याची गुरुकिल्ली आहे.

आम्ही प्रथमच गिटार हातात घेतल्यावर आम्ही जीमी हेंड्रीक्स सारखी गिटार वाजविण्याची अपेक्षा करू शकत नाही. आम्हाला कल्पना आहे की, चांगले गिटारिस्ट होण्यासाठी अनेक वर्षांच्या सरावाच्या, तपश्चर्येची आवश्यकता आहे. तरी देखील जेव्हा आत्मविश्वासाचा प्रश्न येतो तेव्हा अनेकदा आपल्याला असं वाटतं की गिटार वाजविता येणे ही नैसर्गिक देणगी आहे. सर्वच कलांच्या बाबतीत हे सत्य आहे की, तुम्ही सरावाने कला आत्मसात करू शकता. त्यासाठी मी हे करू शकेन असा आत्मविश्वास मात्र हवा. पण आत्मविश्वास निर्माण होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करण्याचा निर्धार केला तर निश्चितच आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

*केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.*


आत्मविश्वास निर्माण होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आत्मविश्वास हा विकसित करता येतो असा आपल्या दृष्टिकोनातील बदल आपल्या यशाचे नियंत्रण आपल्या हातात सोपवितो.

जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भीती वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीत बोलणे टाळण्याकडे तुमचा कल असू शकतो, पण जर तुम्ही नेटाने छोट्या संभाषणाने सुरुवात केली सराव केला तर हळूहळू कदाचित तुम्ही पाच २५ लोकांसमोर सहजरित्या बोलू शकाल. हे तुम्ही तुमच्या कॉन्फिडंट जर्नल मध्ये नोंद करून ठेवा. काही दिवसातच तुम्ही मोठ्या समुदायासमोर आरामशीर बोलू शकाल. हा बदल तुमच्या लक्षातही येणार नाही. थोडक्यात सातत्यपूर्ण, जाणीवपूर्वक, कृतीचा सराव करून कोणीही आपला आत्मविश्वास वाढवू शकतो.

लक्षात ठेवा आत्मविश्वास म्हणजे कधीच भीती न वाटणे किंवा शंका निर्माण न होणे नाही तर या भावना असून सुद्धा कृती करण्याचे धैर्य असणे आहे. आत्मविश्वास म्हणजे कोणतीही परिस्थितीत हाताळण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आहे.

तर मग चला तर... ...

१. बेंजामिन फ्रँकलिन च्या कॉन्फिडन्स जर्नल मधील एक पान उघडा तुमचे जर्नल सुरू करा.

२. आपल्याला ज्या गोष्टीत आत्मविश्वास वाढवायचा आहे ती निवडा.

३. प्रक्रियेसाठी वचनबद्ध व्हा.

४. छोट्या छोट्या पण सातत्यपूर्ण पावलांच्या शक्तीवर विश्वास ठेवा.


आत्मविश्वास वाढविण्याच्या तुमच्या या प्रवासाला

*हार्दिक शुभेच्छा !!!*


धन्यवाद.

सद्गुरु नाथ महाराज की जय


-Jayant Joshi



..........


Self-Confidence – The Secret to a Successful and Progressive Life


Every individual desires a successful life and strives for it throughout their lifetime. But how do we determine whether a person is successful or not?


A person is considered successful when they achieve their life goals. These goals can be of different types and timeframes—short-term or long-term. Setting and pursuing these goals is essential, but often, we fail to define them. Our lives should be designed with purpose, but instead, they often unfold by default. This happens because we are never taught how to approach success. We focus solely on the final achievement, but we lack knowledge of the process required to attain it.


To achieve great success, one must pursue smaller goals first.


The Seven Steps to Success by Sadguru Shri Vamanrao Pai


Sadguru Shri Vamanrao Pai, in his book "Tumcha Utkarsh Tumchya Hatat" (Your Progress is in Your Hands), states that to achieve success and fulfill our goals, we need to climb seven steps:


1. Hard Work



2. Duty



3. Skill



4. Creativity



5. Appreciation



6. Compassion



7. Gratitude




Each of these steps is important, but skill and creativity are particularly crucial. Without these two, success remains ordinary. To achieve extraordinary success, both skill and creativity must be cultivated. They are two sides of the same coin—when combined, they guide us toward the right path of success.


To develop skills, one needs willpower, knowledge, and action power. The foundation for all of this is self-confidence. But how do we develop self-confidence?



---


Benjamin Franklin's Method for Building Self-Confidence


In 18th-century Philadelphia, a 20-year-old young man was frustrated and discouraged by his shortcomings and weaknesses. However, instead of giving up, he resolved to improve himself. He developed a simple yet highly effective system that transformed him from a struggling printer into a respected politician, scientist, and philosopher.


Who was this young man?


He was Benjamin Franklin, an American scientist, researcher, journalist, author, and politician—known for his multifaceted genius.


Through study and reflection, Franklin identified thirteen essential virtues for personal progress:


Temperance, Silence, Order, Resolution, Frugality, Industry, Sincerity, Justice, Moderation, Cleanliness, Tranquility, Chastity, and Humility.



Among these, Frugality may seem unfamiliar. It means developing the habit of being economical and avoiding unnecessary expenses—whether it be money, resources, or time.


How did Franklin Implement These Virtues?


Instead of trying to master all virtues at once, Franklin took a creative approach. He focused on one virtue per week and kept a journal to track his progress. He would mark a black dot whenever he failed and left the space blank when he succeeded.


Week after week, month after month, year after year—through persistence and dedication, Franklin improved himself.


Years later, he said:


"Though I never arrived at the perfection I had been so ambitious of obtaining, yet I was, by the endeavor, a better and a happier man than I otherwise should have been if I had not attempted it."


(Meaning: Even though I never reached the level of perfection I aspired to, the effort itself made me a better and happier person than I would have been had I not tried at all.)


This was not just about becoming virtuous—it was about consistent, conscious practice to build self-confidence.



---


The Misconception About Success


In today's world, we expect instant success.


Saint Dnyaneshwar Maharaj, in his Haripath, says:


"Tapewina daivat, didhalyavin prapt"


(Meaning: Without intense effort, devotion, and disciplined life, divine grace cannot be attained.)


The hidden message here is that without sincerity, persistence, and commitment, one cannot progress in life.


We often see the final glamorous success but never think about the hard work and dedication behind it.


This mindset creates a big problem.


We view self-confidence as something people either have or don’t, rather than seeing it as a skill that can be developed.


Action is the key to building confidence—but most people fail to realize this. They wait to "feel" confident before taking action, not understanding that confidence grows through action itself.



---


How Can We Build Confidence?


Benjamin Franklin kept a Virtue Journal—similarly, we can maintain a Confidence Journal.


Here’s how:


1. Identify 5-6 situations in your life where you lack confidence.



2. Recognize activities you avoid due to low confidence—these can be small things like:


Talking to a stranger


Speaking in a meeting


Trying a new recipe




3. Each day, choose one new action, note it in your Confidence Journal.



4. At the end of the day, reflect on your experience:


Did you follow through?


How did it feel?


What did you learn?





Repeat this process consistently.


Over time, you’ll notice growth in certain areas and challenges in others.


Most importantly, your journal will be solid proof of the small steps you’ve taken toward greater confidence.



---


Final Thoughts on Self-Confidence


Self-confidence is a skill, not an inborn trait.


Believing that confidence is built through habit rather than natural talent unlocks your potential.


We don’t expect to play like Jimi Hendrix the first time we pick up a guitar. We know it takes years of practice.


Yet, when it comes to confidence, we assume it’s something people are born with.


The truth is—all skills can be mastered through practice, and confidence is no different.


Instead of waiting for confidence to appear magically, we should start taking action today.


Samarth Ramdas Swami wisely said:


"Kelyane hot ahe re, adhi kelechi pahije."


(Meaning: Anything is possible, but you must first make an effort.)


Rather than waiting for confidence to develop naturally, a shift in mindset puts the power of success in our own hands.



---


Practical Action Plan


1. Open a page in your "Confidence Journal."



2. Choose an area where you want to build confidence.



3. Commit to the process.



4. Believe in the power of small, consistent steps.





---


Wishing You Success in Your Confidence-Building Journey!


Thank you.

Sadguru Nath Maharaj Ki Jai!


– Jayant Joshi





 
 
 

Recent Posts

See All
स्वाभाविक जीवनशैली: डिफॉल्टने नव्हे तर डिझाईनने जगा! / Live by Design, Not by Default: Reclaiming the 120-Year Life

*हे ईश्वरा सर्वांना* *चांगली बुद्धी दे,* *आरोग्य दे ll* माणसाच आयुष्यमान - जीवन किती ? सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात, "माणूस एक दिवस...

 
 
 
Mind: Your Greatest Ally or Your Toughest Enemy?

Bhagavad Gita – Chapter 6, Verse 5 (Sanskrit with Meaning) Verse 6.5: उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो...

 
 
 
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मीवल्लभ तया जवळी / The Simple Way to Bring God into Your Life Daily

ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात, नित्य नियमाने भगवंताचे नामस्मरण करतो अशी व्यक्ती आढळणे अत्यंत दुर्मिळ. जी व्यक्ती नित्यनेमाने भगवंताचे...

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page