
सर्व स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
पहिला महिला दिन 1911 मध्ये अनेक देशांमध्ये साजरा झाला. 1917 च्या रशियन क्रांतीतील स्त्रियांच्या भूमिकेचा सत्कार करण्यासाठी व्लादिमीर लेनिन, रशियन क्रांतिकारक आणि राजकारणी यांनी 1922 मध्ये 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला.
आज महिला दिनाची सुरुवात होऊन शंभर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे.आज जगभर 08 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
महीलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, स्त्री पुरुष समानतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ८ मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
*2025 च्या महिला दिनाचा विषय - संकल्पना*
सर्व महिला आणि मुलींसाठी समानता आणि सबलीकरण. या वर्षाचा विषय हा महिलांसाठी समान हक्क, समान सत्ता आणि समान संधी निर्माण करण्याचे आवाहन करीत आहे.
यावर्षीच्या महिला दिनाचे रंग आहेत जांभळा, हिरवा आणि पांढरा. जांभळा रंग हा न्याय, प्रतिष्ठा आणि उद्देशांशी एकनिष्ठता दर्शवितो. तर हिरवा रंग आशेचे प्रतीक आहे. आणि पांढरा रंग हा शुद्ध चारित्र्याचे प्रतिनिधित्व करतो.
आज महिला दिनाची सुरुवात होऊन 100 पेक्षा अधिक वर्षांचा काळ लोटला आहे.ज्या परिस्थितीत महिला दिनाची सुरुवात झाली ती परिस्थिती आज नाही. आज स्त्रियांना शंभर वर्षा पूर्वीपेक्षा सर्वच बाबतीत कितीतरी जास्त स्वातंत्र्य आहे. परंतु आपण हे समजून घेतलं पाहिजे की स्त्रीला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते काही स्त्री मुक्ती चळवळीमुळे किंवा पुरुषांच्या मानसिक बदलांमुळे आलेले नाही, तर ते मिळाले आहे केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे. आज स्त्री कोणत्याही ठिकाणी जाऊन कोणत्याही व्यावसायिक प्रांतात काम करू शकते. आणि आपण बघतोच आहोत की स्त्री आज सर्वच क्षेत्रात अतिशय उत्तम काम करत आहे.
असं असलं तरी खरोखर स्त्री पुरुष समानता आलेली आहे का? तर नाही. कारण मुळातच स्त्री पुरुष हा भेद करणेच चुकीचे आहे.आज आपण स्त्री-पुरुष भेदभावावर मानव प्रजातीची विभागणी करत आहोत हे खरोखरच दुर्दैवी आहे.
गतकाळात विविध समाजातील स्त्रियांचे वेगवेगळ्या स्वरूपात शतकानुशतके शोषण झाले. परंतु येथे एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे की त्या काळात मानव जातीला केवळ आपल्या अस्तित्वाची चिंता होती. जेव्हा जगणे हाच केवळ एकमात्र उद्देश असतो तेव्हा आपल्याला हवं ते मिळविण्यासाठी, हडप करण्या कडे आपला कल असतो. यातूनच भांडणे, मारामाऱ्या आणि लढाया व युद्ध होतात. अशा समाज रचनेत साहजिकच पुरुष वर्चस्व कायम राहते. जेव्हा संघर्ष हाच मानवी समाज जीवनाचा मार्ग असतो तेव्हा साहजिकच केवळ शारीरिक सामर्थ्यामुळे पुरुष राज्य करतात.
समान पातळीवर समाजाची रचना करायची असेल तर समाज रचनेत एक विशिष्ट स्थैर्य प्रस्थापित झाले पाहिजे. केवळ जगणे हाच जीवनाचा मुख्य उद्देश न राहता, जगणे हा जीवनाचा एक छोटासा भाग झाला पाहिजे. आजही केवळ जगणे हाच मानवी जीवनाचा मुख्य उद्देश राहिला आहे.
आज अर्थकारण, संरक्षण हे पैलुच समाजावर राज्य करत आहे. कला, संगीत, सौंदर्यशास्त्र हे जीवनाचे पैलू खरंतर तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने केवळ अर्थकारणाला आणि संरक्षणाला वाजवीपेक्षा जास्त महत्व न देता जीवनाच्या इतर मूल्यांना तितकेच महत्त्व देणारी संस्कृती प्रस्थापित झाली तरच स्त्रीला समाजात मानाचे आणि हक्काचे स्थान मिळेल. अन्यथा एकतर स्त्रियांवर अत्याचार होतच राहतील किंवा तिचे शोषण होतच राहील.
स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक समाज जीवनाचा, कुटुंब व्यवस्थेचा पाया आहेत. दोघेही या रचनेत योगदान देत असतात. जोपर्यंत या दोघांचे योगदान हे आपल्या जीवनात समान महत्त्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समानता असलेली संस्कृती उदयास येणार नाही. मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीचा समान भाग म्हणून स्त्री चा स्वीकार झाला पाहिजे.
ज्या समाजाला, राष्ट्राला किंवा कुटुंबाला स्त्रियांशी कसे वागावे? स्त्रियांचा सन्मान कसा करावा? स्त्री ची कदर कशी करावी? आणि स्त्री चे आपल्या जीवनात योगदान किती महत्त्वाचे आहे हे कळत नसेल, समजत नसेल आणि उमजत नसेल तर त्या राष्ट्राला समाजाला आणि कुटुंबाला सुंदर सुगंधी जीवन पुष्पाचा खरा अर्थच कळणार नाही. आज आपण अर्थशास्त्राला आपल्या जीवन अस्तित्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवलेले आहे.
जोपर्यंत आपण जगणे हा केवळ आपल्या जीवनाचा एक पैलू आहे आणि जगणे म्हणजे समग्र जीवन नव्हे याची सामाजिक जाणीव निर्माण करत नाही तोपर्यंत कोणत्याही समाजात स्त्रीला तिच्या हक्काचे मानाचे स्थान मिळणार नाही. आज स्त्रीला तिची हक्काची, मानाची जागा मिळवायची असेल तर तिला पुरुषासारखं वागून झगडावं लागत आहे. आणि जेव्हा स्त्री ही पुरुषासारखं वागू लागते तेव्हा शोषणापेक्षाही स्त्रीत्वाचे मोठे नुकसान होते. कारण यामुळे समाजातून स्त्रीलिंगच नाहीसे होण्याचा धोका संभवतो.स्त्रीला पुरुषी साच्यात बसवणे मुळात चुकीचेच आहे.
आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी समाज हा मसल पावर कडून बौद्धिक शक्तीकडे वळत आहे. ज्या समाजात मसल पावरलाच महत्त्व असते त्या समाजात साहजिकच पुरुष राज्य करतात. पण ज्या समाजात बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, आकलन शक्ती हे जीवनाचे सर्वात महत्त्वाचे पैलू असतात त्या समाजातच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता येईल.
आजवर स्त्री स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या स्त्रिया लढल्या ते खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु एका विशिष्ट टप्प्यापर्यंत लढणे योग्य असते त्यापलीकडे लढणे योग्य नाही. कारण लढल्याने अधिकाधिक भेद निर्माण होतात, विषमता वाढीस लागते. स्त्री हा सह जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे याची जाणीव पुरुषोत्त्वाला होण्याची गरज आहे. केवळ भरपूर पैसा कमावला किंवा प्रचंड काहीतरी साध्य केले म्हणून आयुष्य सुखी, समाधानी आणि समृद्ध होणार नाही. यासाठी प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था, शिक्षण व्यवस्था यांनी एकत्रित रित्या समाजाला जागृत करण्याचे विशेष प्रयत्न करायला हवेत.
आपला आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर स्त्रीलिंग म्हणजेच स्त्रीत्वाचा पैलू आपल्या सोबत असायला हवा. ज्याला आपण पुरुषी आणि स्त्रीलिंगी असे संबोधतो ते निसर्गातील दोन मूलभूत गुण आहेत. त्याचा आपल्या समाजातील लिंगाशी काहीही संबंध नाही. असे पण पुरुष असू शकतात जे बहुतेक स्त्रियांपेक्षा स्त्री गुणांना जास्त आत्मसात करतात आणि अशाही स्त्रिया असू शकतात ज्या पुरुषापेक्षा पुरुषोत्त्वाला अधिक चांगले मूर्त रूप देतात. शरीर स्त्री किंवा पुरुष असू शकते पण एखाद्याची गुणवत्ता स्त्रीलिंगी किंवा पुरुषी असू शकते किंवा दोन्हीचे मिश्रण असू शकते, हे समाजाने ओळखायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे.
भारतीय संस्कृतीत या गोष्टीचा आपल्या ऋषीमुनींनी फार पूर्वीच विचार केला आहे. प्रत्येक व्यक्तीत मग ती स्त्री असो अथवा पुरुष या दोघांमध्ये स्त्रीत्व आणि पुरुषोत्त्व समान प्रमाणात अस्तित्वात असते आणि म्हणूनच आमच्या देवतांना देखील तसेच दाखविले गेले आहे. शिव अर्धनारी नटेश्वर म्हणून दर्शविलेला आहे. प्रत्येक माणूस असाच बनलेला असतो. मात्र अत्यंत विषम सामाजिक संस्कृतीमुळे स्त्रिंया अतिस्रीलिंगी तर पुरुष अतिपुरुषी होत चालले आहेत. त्यामुळे समाजात विकृती निर्माण होत आहे.
यादृष्टीने विचार करता आजच्या या दिवसाला महिला दिन या ऐवजी *स्त्री सन्मानदिन* म्हणणे योग्य आणि संयुक्तिक आहे. प्रत्येक मानवी शरीरात पुरुषी आणि स्त्रीलिंग या दोन्ही गोष्टी खेळल्या पाहिजेत. तरच आपण लिंगाकडे केवळ एक निसर्गाची व्यवस्था म्हणून पाहू शकू. स्त्री पुरुष असा भेद नष्ट झाल्याशिवाय समाजात स्त्री पुरुष समानता येणार नाही.
सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाज रचना कशी असावी याचे फार सुंदर वर्णन पसायदानात केलेले आहे. माऊली म्हणतात,
*भूता परस्परजडो मैत्र*
*जिवांचे*
यासोबत खाली भारतीय प्रशासनातील एक अधिकारी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे महिला दिनानिमित्त चे भाषण पाठविलेले आहे.आपण सर्वांनी आवर्जून ते ऐकावे ही विनंती. म्हणजे मला नेमके काय म्हणायचे आहे ते आपणास कळेल.
धन्यवाद
सद्गुरु नाथ महाराज की जय.
.......
International Women's Day
Heartfelt greetings to all women on International Women's Day!
The first Women's Day was celebrated in 1911 in several countries. To honor the role of women in the 1917 Russian Revolution, Vladimir Lenin, the Russian revolutionary and politician, declared March 8 as International Women's Day in 1922. More than a hundred years have passed since the inception of Women's Day, and today, March 8 is celebrated as Women's Day worldwide.
Women's Day is observed every year to honor women's achievements, raise awareness about gender equality, and promote women's empowerment.
Theme for Women's Day 2025
Equality and empowerment for all women and girls. This year's theme calls for equal rights, equal power, and equal opportunities for women.
The colors of this year's Women's Day are purple, green, and white. Purple represents justice, dignity, and commitment to purpose, green symbolizes hope, and white stands for purity of character.
More than 100 years have passed since the beginning of Women's Day. The conditions under which Women's Day was initiated are no longer the same today. Women have far greater freedom in all aspects compared to a hundred years ago. However, it is important to understand that this freedom was not granted solely due to women's liberation movements or changes in men's mindsets, but primarily due to advancements in technology. Today, women can go anywhere and work in any professional field, and we see them excelling in every sector.
Even so, has true gender equality been achieved? The answer is no, because fundamentally, differentiating between men and women is itself incorrect. It is unfortunate that we are dividing humanity based on gender discrimination.
For centuries, women in different societies have faced exploitation in various forms. However, we must consider that in earlier times, human existence was primarily about survival. When survival is the only goal, people tend to seize what they need. This leads to conflicts, fights, battles, and wars. In such a societal structure, male dominance naturally prevails, as physical strength determines control.
To build a society based on equality, social structures must establish stability. Living should not remain the sole purpose of life; instead, it should be just one aspect of it. Today, survival remains the primary objective of human life. Economy and security dominate society, whereas arts, music, and aesthetics, which are equally important aspects of life, are undervalued. Unless we create a culture that values all aspects of life equally, women will not receive the respect and rights they deserve. Otherwise, they will continue to face oppression or exploitation.
Both men and women are fundamental pillars of social life and family structures. They both contribute to this system. Until we recognize that their contributions are equally significant, a truly egalitarian culture will not emerge. Women must be accepted as an equal part of every aspect of human life.
A society, nation, or family that does not understand how to respect and value women, or fails to recognize the importance of their contributions, will never grasp the true essence of a beautiful and fulfilling life. Today, we have made economics the most important part of our existence. Until we create a social consciousness that life is not just about survival but has multiple dimensions, women will not achieve their rightful and dignified place in society.
Today, if women want to claim their rightful place, they are often compelled to act like men and struggle for it. However, when women start behaving like men, it not only leads to exploitation but also damages the essence of womanhood. This could even lead to the disappearance of femininity from society. Forcing women into a masculine mold is inherently wrong.
With technological advancements, human society is shifting from muscle power to intellectual power. In societies where muscle power is paramount, men naturally dominate. However, true gender equality will only be achieved in societies where intelligence, sensitivity, and understanding are the most valued qualities.
The efforts of women who have fought for their freedom so far are truly commendable. However, fighting is necessary only up to a certain point; beyond that, it may create more division and increase inequality. Men need to realize that women are an integral part of life. Simply earning a lot of money or achieving great things does not guarantee happiness, contentment, or prosperity. The media, social institutions, and education systems must work together to create awareness in society.
If we want to make life truly beautiful, femininity must be embraced alongside masculinity. What we call masculine and feminine are actually two fundamental qualities of nature, unrelated to gender. There can be men who embody more feminine qualities than most women, and there can be women who exemplify masculinity better than men. A person’s body may be male or female, but their qualities may be masculine, feminine, or a blend of both. Society must start recognizing this.
Ancient Indian sages considered this long ago. Every person, whether male or female, possesses both masculine and feminine energies in equal measure. This is why our deities are also depicted this way. Lord Shiva is shown as Ardhanarishvara, representing the union of both aspects. Every human being is created in this way. However, due to extreme societal imbalances, women have become excessively feminine, and men have become overly masculine, leading to distortions in society.
Considering this perspective, it would be more appropriate to call this day "Women’s Honor Day" instead of Women's Day. Both masculine and feminine aspects should be harmonized within every human being. Only then can we perceive gender as a natural arrangement rather than a basis for discrimination. True gender equality will not be achieved until the division between men and women is eliminated.
Seven hundred years ago, Saint Dnyaneshwar beautifully described how society should be in his "Pasaydan" prayer, saying:
"May there be friendship among all beings."
Attached below is a speech by Deputy Collector Anjali Dhanorkar on the occasion of Women's Day. I sincerely request everyone to listen to it, as it will help you understand my perspective.
Thank you.
Sadguru Nath Maharaj Ki Jai.
Jayant Joshi
Jeevan Vidya Mission
Congratulations for giving beautiful explanation. It really enhances mental strength to our female gender.