आज 21 मार्च *जागतिक वन दिन* / International Day of Forests: A Celebration of Earth's Lungs
- ME Holistic Centre
- Mar 21
- 5 min read

आपल्या पृथ्वीच्या फुफुसांचा उत्सव साजरा करण्याचा दिन म्हणजेच आंतरराष्ट्रीय वन दिन.
कल्पना करा... या पृथ्वीतलावर एकही वृक्ष अस्तित्वात नाही. कल्पनाच करवत नाही ना? कारण वृक्ष नाहीत अशी कल्पना करण्याकरता देखील आपले अस्तित्व वृक्षाविना शिल्लकच राहणार नाही. वृक्ष हे आपल्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग आहे. वृक्षांशिवाय आम्ही जगू शकत नाही.
सद्गुरु श्री वामनराव पै म्हणतात,
*वृक्ष हे महादेव आहेत.* परमेश्वराने या सृष्टीची रचना करताना प्रत्येक प्राणिमात्राला या निसर्गाचे अविभाज्य अंग बनविलेले आहे म्हणजे एकाशिवाय दुसरा पूर्णच होऊ शकत नाही. परमेश्वराने माणसाची शरीर रचना करताना शरीराचा आणि शरीराला आवश्यक असलेले बहुतांश भाग हे शरीराच्या बाहेर ठेवलेले आहेत. परमेश्वराने आपल्या फुफुसांचा अर्धा भाग हा आपल्या शरीरात ठेवला आहे तर अर्धा भाग हा शरीराचे बाहेर झाडावर लटकवलेला आहे. वृक्ष प्राणवायू निर्माण करतात जो आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे तर मनुष्य हा कार्बन डाय ऑक्साईड तयार करतो जो वृक्षांना त्यांच्या वाढीसाठीची ऊर्जा पुरवीतो. परस्परावलंबित्व हेच निसर्गाचे सूत्र आहे. ही परस्परावलंबातील कृतज्ञेची भावना व्यक्त करण्यासाठी भारतीय परंपरेत सर्व सणांची रचना करताना निसर्गाला मध्यवर्ती ठेवले आहे.
परमेश्वराने प्रत्येक प्राणिमात्राला निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम दिलेले आहे. निसर्गातील प्रत्येक घटक केवळ माणूस वगळता हे काम प्रामाणिकपणे करत आहे. परमेश्वराने मानवाला बुद्धीचे वरदान दिलेले आहे आणि ती बुद्धी स्वतंत्रपणे वापरण्याचे स्वातंत्र्य देखील दिलेले आहे. या बुद्धीचा वापर विकासासाठी करायचा की विनाशासाठी करायचा हे ज्याचे त्यालाच ठरवायचे आहे. बुद्धी चांगली चालली तर विकास आणि बुद्धी चांगली चालली नाही तर विनाश. म्हणूनच सद्गुरूंनी विश्वप्रार्थनेत ईश्वराकडे प्रथम मागणे मागितले आहे *"हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे"* विश्वप्रार्थनीतील पुढील सर्व गोष्टी प्राप्त होण्यासाठीची पूर्व अट ही चांगली बुद्धी आहे.
शंभर वर्षांपूर्वी पृथ्वीवरील जवळजवळ ५०% जमीन जंगलांनी व्यापलेली होती. आज पृथ्वीवरील फक्त ३० टक्के जमीन जंगलांनी व्यापलेली आहे. गेल्या शंभर वर्षात आम्ही २०% जमिनीवरील जंगले नष्ट केले आहेत. ६० कोटी हेक्टर्स जंगलांपैकी २० कोटी हेक्टर जमिनीवरील जंगले आम्ही नेस्तनाबूत केले आहेत.
जंगल म्हणजे केवळ वृक्ष नाहीत तर जंगल ही एक निसर्गाची व्यवस्था असते. ज्याला आपण Eco-system म्हणजे परिसंस्था म्हणतो, जी एक परिपूर्ण जीवसृष्टी असते, ज्यात वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. एक वृक्ष तोडला की ही सगळी जीवसृष्टी धोक्यात येते. भारतीय संस्कृतीत एक सुंदर वचन आहे, *"जीवो जीवस्य जीवनम्"* याचा अर्थ आहे प्रत्येक जीव हा इतर सजीवांच्या सहाय्याने आणि त्यांच्याशी समन्वयानेच जिवंत राहू शकतो. आपल्या आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर या सर्वांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. एक रेन फॉरेस्ट तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात आणि आम्ही गेल्या चारशे वर्षात ४०% रेन फॉरेस्ट उद्ध्वस्त केले आहे. याला विकास म्हणायचे की विनाशा कडची वाटचाल. सद्गुरु म्हणतात, *"विकासाला विवेकाची जोड नसेल तर विकासाऐवजी आमची वाटचाल भकासाकडेच होणार."*
खरोखरच आजची परिस्थिती भयानक आणि चिंताजनक आहे. गेल्या दहा वर्षात तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. औद्योगिक क्रांतीपूर्व तपमान आणि आजचे तपमान यात १.५ डिग्री सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. ही वाढ भयानक आहे.
आपल्या शरीराचे नॉर्मल तापमान हे ३७ डिग्री म्हणजेच ९८.६ सेल्सिअस असते. यात १ डिग्रीने वाढ झाल्यास आपण आजारी पडतो. २ डिग्रीने वाढ झाल्यास आपल्याला अंथरून धरावे लागते. ३ डिग्रीने वाढ झाल्यास हॉस्पिटलला भरती व्हावे लागते. आणि ४ डिग्री वाढ झाल्यास जीवावर बेतते. म्हणजेच ४१ डिग्री तापमान हे जीव घेणे असते. आज उन्हाळ्यात भारतातील अनेक प्रांतांमध्ये तपमान हे ४६ डिग्रीच्या वर असते. असंच चालू राहिलं तर २०५० मध्ये तापमान ५० डिग्रीच्या वर असेल. ५० डिग्री तापमानात काय होईल याची कल्पना देखील करवत नाही. तेव्हा हीच आत्ताची वेळ आहे जागे होण्याची.
आपल्या प्रत्येकाला वाटतं की मी एकटा काय करू शकणार आणि माझ्या एकट्याने काय फरक पडणार ? पण जर हाच विचार प्रत्येकाने केला तर काहीच होऊ शकणार नाही.
पण जर प्रत्येकाने मी स्वतः कृती करणार आणि ती मी माझ्यापासून सुरू करणार असा विचार केला तर बघता बघता चांगला विचार आकार येईल. म्हणूनच आदरणीय दादांनी आपल्या सद्गुरू जन्मशताब्दी वर्षात आपल्याला एक महान विचार दिला आहे तो म्हणजे,
*"प्रत्येक कृती*
*राष्ट्रहिताची* *"विश्वशांतीची"*
मी एकटा काय करू शकतो ? :
१. झाडे लावा झाडे जगवा
२. कागदाचा वापर कमी करा. जास्तीत जास्त डिजिटल व्हा.
३. टिकाऊ उत्पादने निवडा. पूर्नवापर केलेली उत्पादने वापरा.
४. शाकाहारी व्हा.किंवा मांसाहार कमी करा. पशुपालन हा जंगलतोडीचे प्रमुख कारण आहे.
५. वन अनुकूल व्यवसायांना पाठिंबा द्या.जे ब्रांड्स जंगलतोडीस हातभार लावत नाहीत त्यांना प्राधान्य द्या.
६. इतरांना शिक्षित करा. जंगलाचे महत्त्व आणि शाश्वत जगण्याची गरज याबद्दल कुटुंबातील सदस्य आणि मित्रांमध्ये जागरूकता वाढवा.
लक्षात ठेवा, पुढील पिढीला जगण्यायोग्य वातावरण निर्माण करणे आणि ते टिकविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
धन्यवाद.
सद्गुरुनाथ महाराज की जय
जयंत जोशी
International Day of Forests: A Celebration of Earth's Lungs
Imagine… a world without trees. Difficult to even conceive, isn’t it? Because without trees, our very existence would be impossible. Trees are an inseparable part of our lives; we cannot survive without them.
Sadhguru Shri Vamanrao Pai says,
"Trees are Mahadev (Lord Shiva)."
When creating this universe, the Supreme Being designed every living creature to be an integral part of nature—one cannot exist without the other. While designing the human body, God placed some of its essential components outside the body. He kept half of our lungs inside us, while the other half is suspended outside in the form of trees. Trees generate oxygen, which is vital for our survival, while humans produce carbon dioxide, which trees utilize for their growth. This interdependence is the fundamental principle of nature. Recognizing this mutual reliance, Indian traditions have centered festivals around nature.
Every living being has been entrusted with the duty of protecting and preserving nature, maintaining environmental balance. Every element of nature fulfills this duty—except humans. God has gifted humans with intelligence and the freedom to use it independently. How this intelligence is used—whether for development or destruction—is up to the individual. If used wisely, it leads to progress; if not, it leads to devastation. That is why, in the Vishwaprarthana (Universal Prayer), Sadhguru first asks the Lord for "Good sense for all." This is the prerequisite for achieving all other goals mentioned in the prayer.
A hundred years ago, nearly 50% of Earth's land was covered by forests. Today, only 30% remains. In the past century, we have destroyed 20% of the world's forests, amounting to 200 million hectares of land.
A forest is not just a collection of trees; it is a self-sustaining ecosystem comprising plants, animals, and microorganisms. Cutting down a single tree disrupts this entire ecosystem. Indian philosophy beautifully states, "Jeevo Jeevasya Jeevanam"—Every life form exists through mutual coexistence. If we wish to preserve our own existence, we must protect the existence of all living beings. A rainforest takes millions of years to form, but in the last 400 years, we have destroyed 40% of the world’s rainforests. Is this progress, or are we moving towards destruction? Sadhguru warns, "Development without wisdom leads to desolation."
The current situation is alarming. Over the last decade, global temperatures have risen significantly. Since the Industrial Revolution, the Earth's temperature has increased by 1.5°C, which is a severe warning.
To understand its impact, consider our normal body temperature—37°C (98.6°F).
If it rises by 1°C, we feel unwell.
A 2°C increase forces us to rest.
A 3°C increase requires hospitalization.
A 4°C increase can be fatal.
At 41°C (105.8°F), survival becomes critical. Today, summer temperatures in many parts of India exceed 46°C (114.8°F). If this continues, by 2050, temperatures could surpass 50°C (122°F). We can hardly imagine the consequences. The time to act is now!
Many people think, "What can I do alone?" But if everyone thinks this way, nothing will change. However, if each person decides, "I will take action, starting with myself," then a small step can lead to a greater movement.
That is why, in honor of our revered Sadhguru’s Birth Centenary Year, Respected Dada has given us a profound principle:
"Every action
for national interest,
for world peace."
What Can I Do?
1. Plant and protect trees.
2. Reduce paper use. Go digital whenever possible.
3. Choose sustainable products. Use recycled materials.
4. Adopt a vegetarian diet or reduce meat consumption. Livestock farming is a major cause of deforestation.
5. Support eco-friendly businesses that do not contribute to deforestation.
6. Educate others. Spread awareness about the importance of forests and sustainable living among family and friends.
Remember, it is our moral responsibility to provide a livable planet for future generations.
Thank you.
Sadhguru Nath Maharaj Ki Jai!
- Jayant Joshi
Comments